गहू पिकाची या पद्धतीने पेरणी करा आणि मिळावा भरघोस उत्पन्न
हवामान व जमीन : गहू पिकास रात्री थंड आणि दिवसा कोरडे हवामान विशेष करून मानवते. गहू पिकाच्या चांगल्या उत्पन्नासाठीपीक कालावधीत थंडीचे कमीत कमी 100 दिवस मिळणे आवश्यक असते.
महाराष्ट्रातील थंडीचा कालावधी बराच कमी असुन रात्रीच्या तापमानात सुध्दा बरीच तफावत आढळून येते. पीक वाढीच्या काळात अचानक तापमानात वाढ झाली तर पीक लवकर फूलावर येते व पर्यायाने उत्पन्नात घट येते. महाराष्ट्रात खुप मोठ्या प्रमाणात गव्हाचे पीक हे हलक्या ते मध्यम प्रतीच्या जमिनीवर घेतले जाते. त्यामुळे देखील राज्याची सरासरी उत्पादकता कमी आहे.
पूर्व मशागत: शेतात प्रती हेक्टरी 25 ते 30 गाड्या चांगले कुजलेले शेणखत टाकुन कुळवाची पाळी द्यावी. गहू लागवड क्षेत्र शक्यतो समपातळीत असावे, जेणेकरून ओलीत व्यवस्थीत करता येईल. गरज भासल्यास जमीन समपातळीत आणण्यासाठी पाटा मारावा.पेरणीपूर्वी जमिनीची 15 ते 20 सें.मी पर्यंत खोल नांगरणी करावी. त्यानंतर कुळवाच्या 3 ते 4 पाळ्या देऊन जमीन चांगली भुसभुषीत करावी.
पेरणीची योग्य वेळ गहू पिकाची पेरणीची योग्य वेळ साधणे भरघोस उत्पन्न मिळण्याच्या द्रुष्टीने अत्यंत महत्वाची आहे. सर्व साधारणपणे गहू पिकास सुरूवातीचे वाढीस 10 ते 20 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान उपयुक्त ठरते. त्यादृष्टीने पेरणीच्या वेळा खालीलप्रमाणे देण्यात येत आहेत कोरडवाहूगहू पेरणी ऑक्टोंबर महिन्याच्या दुस-या पंधरवाडयात करावी. बियाण्याच्या चांगल्या उगवणीसाठी पेरणीकरतांना जमिनीत पुरेसा ओलावा असणे आवश्यक आहे.
बागायती वेळेवरगहू पेरणी शक्यतो लवकर नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवाडयात करावी जेणेकरुन गहु पिकास थंडीचे जास्तीत जास्त दिवस मिळतील. सर्वसाधारणपणे यावेळी10 ते 20अंश सेल्सीअस पर्यंत तापमान असते व या तापमानात गहू बियाण्याची उगवण चांगली होते. बागायती उशिरागहू पेरणी 15 डिसेंबर पर्यंत आटोपती घ्यावी.
डिसेंबर महिन्याचे 15 तारखे नंतर देखील पेरणी केल्यास हरकत नाही. परंतु उशिराकिंवा अति उशिरापेरणी केली असता उत्पन्नात लक्षणीय घट आढळून येते. कारण असे की, उशिरापेरणी केलेल्या गहू पिकास थंड हवामानाचा कालावधी फारच कमी मिळतो परिणामी फुटव्यांची व ओंबीतील दाण्यांची संख्या कमी मिळते व उत्पन्नात घट येते.