Take a fresh look at your lifestyle.

Good News: 3% DA वाढीनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या हातात येणार ₹ 20,484; एकूण 2 लाख 79 हजार 948 रुपये मिळणार, पहा कॅल्क्युलेशन..

0

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी या वर्षातील सर्वात मोठी आनंदाची बातमी आता काही दिवसांवर आली आहे. 31 जानेवारीची सकाळ त्याच्यासाठी खास ठरणार आहे. कारण, या दिवशी कर्मचाऱ्यांच्या पुढील जानेवारी महिन्यातील डीए (DA) वाढीचं चित्र स्पष्ट होणार आहे.

कर्मचाऱ्यांना दरवर्षी दोन वेळा महागाई भत्त्याचं गिफ्ट मिळतं. या वर्षात पहिल्यांदाच महागाई भत्ता जाहीर केला जाणार आहे. त्यांच्या डीए (DA) मध्ये 3% वाढ होणार आहे. अशा स्थितीत त्याचा एकूण डीए (DA) 41% वर पोहचणार आहे. सध्या कर्मचाऱ्यांना 38% DA मिळत आहे. महागाई भत्ता जाहीर होताच केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे.

महागाई भत्ता (DA) 41% पर्यंत वाढणार..

महागाई भत्त्याची बातमी जानेवारीमध्ये जानेवारी 2023 जाहीर केली जाणार असून मार्चमध्ये मंत्रिमंडळाकडून मंजुरी मिळणे अपेक्षित आहे. आत्तापर्यंत आलेल्या औद्योगिक कामगारांच्या महागाईच्या आकड्यांवरून हे स्पष्ट झालंय की, त्यात 3% वाढ होणार आहे. यापूर्वी जुलै 2022 चा महागाई भत्ता जाहीर करण्यात आला होता, त्यात 4% वाढ झाली होती. वाढत्या महागाईला तोंड देण्यासाठी कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याचं गिफ्ट मिळालं आहे. त्यांचा डीए 34 टक्क्यांवरून 38% करण्यात आला आहे.

3 टक्के वाढल्याने पगारात किती होणार वाढ ?

7 व्या वेतन आयोगाच्या वेतन मॅट्रिक्सनुसार, लेव्हल – 3 मधील केंद्रीय कर्मचाऱ्यांची मूळ वेतन श्रेणी 18,000 रुपये ते 56,900 रुपये आहे. जानेवारीमध्ये DA 3% ने वाढल्यास एकूण DA 41% वर पोहोचेल..

41% DA वर कॅल्क्युलेशन पहा..

1. कर्मचार्‍याचे मूळ वेतन :- रु. 18,000
2. अंदाजे महागाई भत्ता (41%) :- रु. 7,380 / महिना
3. नवीन महागाई भत्ता (38%) :- रु. 6,840 / महिना
4. महागाई भत्त्यात किती वाढ :- 7380 – – 6,840 = 540 रुपये / महिना
5. वार्षिक पगारात वाढ :- 540 X 12 = रु. 6,480

याचा अर्थ 18,000 रुपये मूळ वेतन असलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याचा पगार 540 रुपयांनी वाढणार आहे. वार्षिक आधारावर तो 6480 रुपये असेल.

कमाल पगाराच्या ब्रॅकेट मध्ये बघितलं तर किती वाढणार पैसे..

41% DA वर कॅल्क्युलेशन पहा.. 

1. कर्मचार्‍यांचे मूळ वेतन :- रु 56,900
2. अंदाजे महागाई भत्ता (41%) :- रु. 23,329 / महिना
3. आत्तापर्यंतचा महागाई भत्ता (38%) :- रु. 21,622 / महिना
4. महागाई भत्त्यात किती वाढ :- 23,329 – 21,622 = रु 1,707 / महिना
5. वार्षिक पगारात वाढ 1,707 X 12 = रु. 20,484

लेव्हल – 3 च्या कमाल बेसिक सॅलरी ब्रॅकेटमध्ये येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारात दरमहा 1707 रुपयांची वाढ होणार आहे. तसं वार्षिक आधारावर पाहिलं तर 20,484 रुपयांची वाढ होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.