सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन करून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी तिजोरी उघडली आहे. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने भात, नाचणी, बाजरी, ज्वारी, मका आणि कापूस यासह 14 खरीप पिकांच्या एमएसपी (MSP) मध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
14 खरीप पिकांसाठी वाढवला एमएसपी..
मंत्रिमंडळ बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “आजच्या मंत्रिमंडळात काही अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयांचा समावेश आहे. खरीप हंगामासाठी मंत्रिमंडळाने 14 निर्णयांना मंजुरी दिली आहे. धानासाठी नवीन एमएसपी (MSP) प्रति क्विंटल 2,300 रुपयांनी मंजूर करण्यात आला आहे.
कोणत्या पिकावर किती वाढला MSP ?
धानाचा एमएसपी 2300 रुपये प्रति क्विंटल असेल जो गेल्या वर्षीच्या तुलनेत 117 रुपये अधिक आहे.
तूरीचा एमएसपी 7550 रुपये प्रति क्विंटल असेल जो गेल्या वर्षीच्या तुलनेत 550 रुपये अधिक आहे.
उडदाचा एमएसपी 7400 रुपये प्रति क्विंटल असेल जो गेल्या वर्षीच्या तुलनेत 450 रुपये अधिक आहे.
मुगाचा एमएसपी 8682 रुपये प्रति क्विंटल असेल जो गेल्या वर्षीच्या तुलनेत 124 रुपये अधिक आहे.
भुईमुगाचा एमएसपी 6783 रुपये प्रति क्विंटल असेल, जो गेल्या वर्षीच्या तुलनेत 406 रुपये अधिक आहे.
कापसाचा एमएसपी 7121 रुपये प्रति क्विंटल असेल, जो गेल्या वर्षीच्या तुलनेत 501 रुपये अधिक आहे.
ज्वारीचा एमएसपी 3371 रुपये प्रति क्विंटल असेल, जो गेल्या वर्षीच्या तुलनेत 191 रुपये अधिक आहे.
बाजरीचा एमएसपी 2625 रुपये प्रति क्विंटल असेल, जो गेल्या वर्षीच्या तुलनेत 125 रुपये अधिक आहे.
मक्याचा एमएसपी 2225 रुपये प्रति क्विंटल असेल जो गेल्या वर्षीच्या तुलनेत 135 रुपये अधिक आहे.
केंद्रीय मंत्री म्हणाले की, महाराष्ट्रातील 76 हजार कोटी रुपयांच्या वाधवन बंदर प्रकल्पालाही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींची तिसरी टर्म अत्यंत महत्त्वाची आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या हितावर भर देण्यात आला आहे..