शेतीशिवार टीम, 3 डिसेंबर 2021 : एकीकडे ओमिक्रॉनचा धोका वाढल्याने राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली आहे, तर दुसरीकडे कर्नाटकमध्ये ओमिक्रॉनचे दोन नवीन रुग्ण आढळल्यानंतर महाराष्ट्राची आरोग्य यंत्रणा ही ऍक्शन मोडवर आली आहे. परंतु मुंबई विमानतळावर आत्तापर्यंत 800 जणांची RTPCR चाचणीमध्ये 28 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने धोका वाढला आहे.
हे 28 जण ओमिक्रॉन व्हायरसने संक्रमित असल्याची भीती असून या 28 जणांचे नमुने जिनोमिक सिक्वेसिंगसाठी पाठवण्यात आले असून पुढील 24 तास अतिमहत्त्वाचे असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
अति जोखीम असलेल्या देशांमधून भारतात परतलेल्या लोकांचे नमुने पॉझिटिव्ह आढळले असून त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांची चाचणी केल्यानंतर त्यांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत.
मुंबईत 10-11-2021 ते 2-12-2021 पर्यंत 2868 प्रवासी मुंबईत पोहोचले होते. त्यापैकी आंतरराष्ट्रीय विमानातून मुंबईत आलेल्या 485 प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. 485 पैकी 9 प्रवाशांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
अलीकडच्या एक महिन्यात बाहेरील देशातून आलेल्या प्रवाशांचे सर्वेक्षण करण्याचं काम सुरू असल्याचे देखील त्यांनी सांगितलं आहे. कर्नाटक सिमेवर सध्या कोणतेही निर्बंध घातले जाणार नसून केंद्र घेईल त्या निर्णयाप्रमाणे राज्य निर्णय घेईल असं आवाहन त्यांनी केलं आहे. याशिवाय नागरीकांनी काळजी घ्यावी असंही टोपे म्हणाले.