आता फक्त 8 लाखांत 7- सीटर SUV ; थेट देणार Maruti Ertiga ला टक्कर, फीचर्स अन् लूक पाहून दिवाने व्हाल !

0

7 – सीटर कारच्या लिस्टमध्ये आता आणखी एका न्यू मॉडेल लॉन्च होणार आहे. फ्रेंच कार निर्माता कंपनी Citroen आपली नवीन 7 – सीटर कार इंडियन मार्केट मध्ये लॉन्च करण्याच्या विचारात आहे, अलीकडेच या कंपनीची नवीन कार Citroen C3 टेस्टिंग दरम्यान दिसली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लवकरच ही कार येथील मार्केटमध्ये विक्रीसाठी सादर केली जाणार आहे.

इंडियन मार्केट मध्ये ही कार थेट मारुत सुझुकीच्या एर्टिगा (Maruti Ertiga) सारख्या मॉडेलशी टक्कर देणार आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीने न्यू Citroen C5 लॉन्च केल, ज्याची स्टार्टींग प्राईस 36.67 लाख रुपये आहे.

आपल्या डीलरशिपचा विस्तार करण्याव्यतिरिक्त,Citroen ने नुकतीच C3 कॉम्पैक्ट हॅचबॅक भारतात लॉन्च केली आहे, आणि येत्या काही वर्षांत C3 वर आधारित इलेक्ट्रिक कार सादर करण्याची विचार आहे. ब्रँड आधीपासून मिड साईज SUV ची टेस्टिंग करताना दिसला होता,आता C3 चा नवीन 7-सीटर प्रोटोटाइप रोड टेस्टिंगमध्ये दिसली आहे. बाजारात C3 ची किंमत 5.71 लाख ते 8.06 लाख रुपये आहे. अशा परिस्थितीत,आता ही कार 7 सीटसह ऑफर केली जाईल, त्यामुळे अशी अपेक्षा आहे की, ही कार प्रामुख्याने Ertiga ला बाजारात टक्कर देईल.

या 7- सीटर SUV च्या साईझ आणि व्हीलबेस अद्याप माहित नसला तरी, असे मानले जाते की, ते फक्त Datsun GO-Plus ची मार्केट कव्हर करेल. समोरच्या बाजूस, याची फ्रंट ग्रिल थोड अपडेट केली गेली आहे, त्याशिवाय फॉग लॅम्प आणि हाउजिंगची पोझिशन देखील बदलली आहे. न्यू C3 बेस्ड असल्याने, त्याची किंमत 8 ते 11 लाखांपर्यंत असण्याची शक्यता आहे.

सध्याच्या Citroen C3 मध्ये, कंपनीने 1.2-लीटर नॅचुरल एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन वापरलं आहे जे 82 bhp पॉवर आणि 115 Nm टॉर्क जनरेट करते. या इंजिनला 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन गिअरबॉक्स देण्यात आला आहे.

याशिवाय, टर्बो व्हर्जन 109 bhp पॉवर आणि 190 Nm टॉर्क जनरेट करते. टर्बो व्हेरिएंट 6- स्पीड गिअरबॉक्सने सुसज्ज आहे. 7-सीटर व्हेरियंटमध्ये अधिक पावरफुल इंजिन दिले जाण्याची शक्यता आहे आणि कंपनी ही कार पुढील वर्षी बाजारात विक्रीसाठी देऊ शकते.

Leave A Reply

Your email address will not be published.