2024 मध्ये केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. त्यांचा महागाई भत्ता (DA) 50 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. 1 जानेवारी 2024 पासून त्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. वाढीव महागाई भत्ता एप्रिलमध्ये दिला जाणार आहे.

परंतु, महागाई भत्त्याबरोबरच इतर भत्त्यांमध्येही वाढ झाली आहे. या भत्त्यांमधील सर्वात मोठा बदल हाऊस रेंट अलाऊन्स (HRA) मध्ये झाला आहे.

महागाई भत्ता 50% च्या वर गेल्याने, HRA देखील सुधारित करण्यात आला आहे. सरकारने जानेवारी 2024 पासून महागाई भत्ता वाढवून 50 टक्के केला आहे. DA 50 टक्क्यांपेक्षा जास्त होताच, HRA स्वतः सुधारित झाला. HRA चे वाढलेले दर आता 30%, 20% आणि 10% आहेत. त्याचा लाभ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांना मिळण्यास सुरुवात होणार आहे.

कर्मचाऱ्यांना मिळतं आहे HRA चा लाभ..

कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग – DoPT नुसार, केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी घरभाडे भत्ता (HRA) मध्ये सुधारणा महागाई भत्त्याच्या आधारावर करण्यात आली आहे. सर्व कर्मचाऱ्यांना वाढीव HRA चा लाभ मिळेल. शहराच्या वर्गवारीनुसार 30 टक्के, 20 टक्के आणि 10 टक्के दराने एचआरए दिला जात आहे.

डीएसह ही वाढ 1 जानेवारी 2024 पासून लागू करण्यात आली आहे. सरकारने 2016 मध्ये जारी केलेल्या निवेदनात म्हटले होते की, वाढत्या DA सह HRA मध्येही वेळोवेळी सुधारणा करण्यात येत आहे.

HRA मध्ये कमाल 3% वाढ..

घरभाडे भत्त्यात सर्वाधिक सुधारणा 3% आहे. कमाल दर 27 टक्के होता, तो वाढवून 30 टक्के करण्यात आला आहे. ज्ञापनानुसार, डीए 50% ओलांडल्यास एचआरए 30%, 20% आणि 10% ने सुधारण्याची तरतूद होती. घरभाडे भत्ता (HRA) च्या श्रेणी X, Y आणि Z वर्ग शहरांनुसार आहेत. जे केंद्रीय कर्मचारी X श्रेणीत येतात त्यांना 30 टक्के HRA मिळतो. तसेच, Y वर्ग लोकांसाठी ते 20 टक्के झाला आहे. झेड वर्गातील लोकांसाठी ते 9 टक्क्यांवरून 10 टक्के झाला आहे.

कसे केले जाते HRA चे कॅल्क्युलेशन..

7 व्या वेतन मॅट्रिक्सनुसार, वेतन श्रेणी लेव्हल -1 मधील केंद्रीय कर्मचाऱ्यांचे कमाल मूळ वेतन दरमहा 56,900 रुपये आहे, त्यानंतर त्याचा HRA 30 टक्के मोजला जातो. साध्या हिशोबात समजले तर..

HRA = रु 56,900 x 27/100 = रु. 15,363 प्रति महिना
30% HRA सह = रु. 56,900 x 30/100 = रु. 17,070 प्रति महिना
HRA मध्ये एकूण फरक : रु. 1707 प्रति महिना
वार्षिक HRA मध्ये वाढ – रु. 20,484

HRA बाबत कोणता बनवला होता नियम ?

जेव्हा 7 वा वेतन आयोग लागू करण्यात आला तेव्हा HRA 30, 20 आणि 10 टक्क्यांवरून 24, 18 आणि 9 टक्के करण्यात आला. तसेच त्याच्या 3 श्रेणी X, Y आणि Z तयार करण्यात आल्या. त्या काळात DA शून्य करण्यात आला. त्या वेळी, डीओपीटीच्या अधिसूचनेत असे नमूद करण्यात आले होते की, जेव्हा DA 25 टक्क्यांपेक्षा जास्त असेल तेव्हा HRA स्वतःच 27 टक्क्यांपर्यंत सुधारित केले जाईल आणि जेव्हा महागाई भत्ता 50 टक्क्यांपेक्षा जास्त असेल तेव्हा एचआरए देखील 30 टक्के होईल..

HRA मध्ये X, Y आणि Z श्रेणी काय आहेत ?

50 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेली शहरे X श्रेणीत येतात. या शहरांमध्ये तैनात असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 27 टक्के एचआरए मिळेल. तर Y श्रेणीतील शहरांमध्ये हे प्रमाण 18 टक्के आणि Z श्रेणीत 9 टक्के असेल..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *