केंद्रीय कर्मचाऱ्यांना आजचं मिळणार गोड बातमी । Fitment Factor वर आलं मोठं अपडेट, पहा, पगारात होणार ‘इतकी’ वाढ…

0

शेतीशिवार टीम : 6 जुलै 2022 :- 7th Pay Commission latest update : सरकारी कर्मचाऱ्यांना आज एक मोठं गिफ्ट मिळणार आहे. कारण, काल उशिरा याबाबत मोठं अपडेट मिळालं आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी खुशखबर मिळण्याची शक्यता आहे. आज रात्री एक मिळालं असून आज बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक होणार असून फिटमेंट फॅक्टर वाढविण्यावर चर्चा होण्याची शक्यता सूत्रांकडून समजली आहे.

केंद्र सरकारच्या कर्मचारी संघटनांनी फिटमेंट फॅक्टर (Fitment Factor) 2.57 पट वरून 3.68 पट वाढवण्याची मागणी केली आहे, ज्यामुळे किमान मूळ वेतन 18,000 रुपयांवरून 26,000 रुपये होणार आहे. सरकारने यापूर्वी 2017 मध्ये एंट्री लेव्हलचे मूळ वेतन 7,000 रुपये प्रति महिना वरून 18,000 रुपये केलं होतं.

फिटमेंट फॅक्टर वाढणार…

जर सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या फिटमेंट फॅक्टर (Fitment Factor) मध्ये वाढ करण्याची घोषणा केली तर त्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे. सध्या कर्मचार्‍यांना फिटमेंट फॅक्टर अंतर्गत 2.57% पगार मिळतो, तो 3.68% केला तर कर्मचार्‍यांचे किमान वेतन 8,000 रुपयांनी वाढेल. याचा अर्थ केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे किमान वेतन 18,000 रुपयांवरून 26,000 रुपयांपर्यंत वाढणार आहे. सध्या किमान मूळ वेतन 18,000 रुपये आहे.

पगारात होणार मोठी वाढ :-

फिटमेंट फॅक्टर 3.68% पर्यंत वाढवल्यास कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 26,000 रुपये होईल. आत्ता जर तुमचा किमान पगार 18,000 रुपये असेल, तर भत्ते वगळून, तुम्हाला 2.57 फिटमेंट फॅक्टरनुसार 46,260 रुपये (18,000 X 2.57 = 46,260) मिळतील. आता जर फिटमेंट फॅक्टर 3.68 असेल तर तुमचा पगार 95,680 रुपये असेल (26000 X 3.68 = 95,680)

पूर्वी इतकी होती बेसिक सॅलरी :-

केंद्रीय मंत्रिमंडळाने जून 2017 मध्ये 34 सुधारणांसह सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी मंजूर केल्या होत्या. प्रवेश स्तरावरील मूळ वेतन दरमहा 7,000 रुपये वरून 18,000 रुपये करण्यात आले, तर सर्वोच्च स्तर म्हणजेच सचिवाचे वेतन 90,000 रुपयांवरून 2.5 लाख रुपये करण्यात आले. वर्ग 1 अधिकार्‍यांसाठी, सुरुवातीचे वेतन 56,100 रुपये होते.

Leave A Reply

Your email address will not be published.