शेतीशिवार टीम : 15 जुलै 2022 :- 7th Pay Commission latest update : सरकार लवकरच फिटमेंट फॅक्टर वाढविण्यास मान्यता देणार असून याबाबत महत्वाचं अपडेट सूत्रांकडून समजलं आहे. यामुळे किमान मूळ वेतन 18,000 रुपयांवरून 26,000 रुपये होणार आहे. सरकारने यापूर्वी 2017 मध्ये एंट्री लेव्हल बेसिक वेतन 7,000 रुपये प्रति महिना वरून 18,000 रुपये केलं होतं.
जर सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ करण्याची घोषणा केली तर त्यांच्या पगारात मोठी वाढ होईल. सध्या कर्मचार्यांना फिटमेंट फॅक्टर अंतर्गत 2.57% पगार मिळतो, तो 3.68% केला तर कर्मचार्यांचे किमान वेतन 8,000 रुपयांनी वाढेल. याचा अर्थ केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे किमान वेतन 18,000 रुपयांवरून 26,000 रुपयांपर्यंत वाढणार आहे. सध्या किमान मूळ वेतन 18,000 रुपये आहे.
इतका वाढणार पगार :-
फिटमेंट फॅक्टर 3.68 टक्क्यांपर्यंत वाढवल्यास कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 26,000 रुपये होईल. आत्ता जर तुमचा किमान पगार रु. 18,000 असेल, तर भत्ते वगळून, तुम्हाला 2.57 फिटमेंट फॅक्टरनुसार 46,260 रुपये (18,000 X 2.57 = 46,260) मिळतील. आता जर फिटमेंट फॅक्टर 3.68 असेल तर तुमचा पगार 95,680 रुपये असेल (26000X3.68 = 95,680).
मूळ वेतन :-
केंद्रीय मंत्रिमंडळाने जून 2017 मध्ये 34 सुधारणांसह सातव्या वेतन आयोगाच्या (7th Pay Commission) शिफारशी मंजूर केल्या होत्या. प्रवेश स्तरावरील मूळ वेतन दरमहा 7,000 रुपये वरून 18,000 रुपये करण्यात आले, तर सर्वोच्च स्तर म्हणजेच सचिवाचे वेतन 90,000 रुपयांवरून 2.5 लाख रुपये करण्यात आले. वर्ग 1 अधिकार्यांसाठी, सुरुवातीचे वेतन 56,100 रुपये होते..