शेतीशिवार टीम, 11 जानेवारी 2022 : ताडीचे अतिसेवन केल्याने दोन युवकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीतील कोपर परिसरात घडली आहे. सचिन पाडमुख (वय 22) व स्वप्नील चोळके (वय 30) अशी दोन्ही मृत युवकांची नावे आहेत.
यामधील स्वप्नील चोळके हा युवक डोंबिवली शहर वाहतूक विभागात वॉर्डन म्हणून कार्यरत होता. परंतु दुसरा मित्र हा दोन महिन्यांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे सुट्टीवर होता.
हे दोघे मोटर काल सायंकाळी मित्रांसह कोपर गाव रेल्वे रुळालगत असलेल्या ताडी सेंटरवर ताडी पिण्यासाठी गेले होते. ताडी पिऊन आल्यानंतर नऊ वाजण्याच्या सुमारास सचिन पडमुख व स्वप्नील चोळके घरी परतत होते परंतु अचानक त्यांचं पोट दुखू लागल्याने त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
मात्र रुग्णालयात पोहचण्यापूर्वी या दोघांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच विष्णूनगर पोलिसांनी ताडीविक्रेता रवी भटनेविरोधात गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरू केला आहे.
दरम्यान, या दोघांचा मृत्यू ताडीचे अतिसेवन केल्याने झाला असल्याची माहिती डॉक्टरांनी दिल्याचे विष्णूनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भालेराव यांनी सांगितले.