Take a fresh look at your lifestyle.

Agniveer Air Force : अग्निवीर स्कीमला विरोध पण, फक्त 2 चं दिवसांत तब्बल ‘इतके’ अर्ज ; पहा, लास्ट डेट, अर्ज प्रोसेस, पगार आणि बरचं काही…

0

शेतीशिवार टीम, 27 जून 2022 : IAF Agniveer Recruitment 2022 : भारतीय हवाई दलात अग्निवीर (Agnivir vayu) च्या भरतीसाठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू आहे. विरोधी पक्ष आणि भारतातील तरुणांचा विरोध असूनही, या योजनेंतर्गत सोमवारपर्यंत सुमारे 56,960 अर्ज प्राप्त झाले आहेत.

अग्निवीर वायु भरतीसाठी इच्छुक उमेदवार agnipathvayu.cdac.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 जुलै निश्चित करण्यात आली आहे.

भारतीय हवाई दलाने ही माहिती ट्विट करून दिली आहे. ज्यात असं लिहिलं आहे की, आतापर्यंत एकूण 56960 अर्ज प्राप्त झाले आहेत. या ट्विटमध्ये भरती प्रक्रिया, प्रशिक्षण, सर्व्हिस इन्फॉर्मेशन, फायनान्शिअल पॅकेज, तर इतर फायदे दर्शविणारा फोटो देखील ट्विट केला आहे.वायुसेनेच्या योजनांबद्दल सांगितलं आहे. अग्निपथ योजनेंतर्गत भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलात 4 वर्षांसाठी सैनिकांची भरती केली जात आहे.

ही भरती प्रक्रिया 24 जून रोजी सुरू झाली असून त्यासाठी तीन दिवसांत 50000 हून अधिक अर्ज आले आहेत. या योजनेची कामगिरी पाहता या हिंसक निदर्शनांमध्ये सहभागी असलेल्यांना या भरतीत सामावून घेतले जाणार नसल्याचेही सांगण्यात आलं आहे. सरकारची ही हुकूमशाही भरती योजना असल्याचे काँग्रेसचे म्हणणं असून, सोमवारी काँग्रेसने देशभरातील प्रत्येक विधानसभेत निदर्शने केली.

काँग्रेस प्रवक्ते शक्तीसिंह गोहिल म्हणाले की, काँग्रेस एक जबाबदार पक्ष असल्याने देशातील प्रत्येक तरुणाच्या पाठीशी उभा आहे. अग्निपथ भरती योजना तात्काळ मागे घेण्यात यावी, अशी मागणी आम्ही केंद्र सरकारकडे केली आहे.

अर्ज कुठे आणि कसा कराल ?

उमेदवार अधिकृत वेबसाइट careerindianairforce.cdac.in किंवा https://indianairforce.nic.in वर भरतीशी संबंधित अधिक माहिती पाहू शकतात. हवाई दलाकडून अग्निवीरांची ही भरती ऑनलाइन घेतली जाणार आहे.

ऑनलाइन अर्ज आणि परीक्षा शुल्क :-

हवाई दलाने अग्निविरांच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. उमेदवार अधिकृत वेबसाइट careerindianairforce.cdac.in वर ऑनलाइन अर्ज भरू शकतात. अर्जाची फी 250 रुपये आहे. जे उमेदवारांना ऑनलाइन नोंदणी दरम्यान भरावे लागतील. डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे फी भरली जाऊ शकते.

वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रता :-

अग्निविरांसाठी 17 ते 23 वर्षे वयोगटातील तरुण अर्ज करू शकतात. (29 डिसेंबर 1999 ते 29 जून 2005 दरम्यान जन्मलेले या भरतीसाठी पात्र असणार आहे)

उमेदवारांनी मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळातून 10वी किंवा 12वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

3 वर्षांचा अभियांत्रिकी डिप्लोमा असावा.

12 वी सायन्स विद्यार्थ्यांसाठी इंग्लिश, भौतिकशास्त्र आणि गणित विषयांसह 50% मार्क्स असावेत.

कसं होणार सिलेक्शन :-

अग्निपथ योजनेंतर्गत भरती झालेल्या अग्निवीरांना ऑनलाइन टेस्ट द्यावी लागणार आहे. परीक्षेनंतर पुढील प्रक्रिया होईल. 24 जुलैपासून ऑनलाइन परीक्षा होणार आहे. या परीक्षेत निगेटिव्ह मार्किंगही असणार आहे. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण वजा केले जातील. कमिशन्ड ऑफिसर, पायलट, नेव्हिगेटर म्हणून निवडीसाठी सिलेक्शन टेस्ट होणार नाही…

परीक्षेशी संबंधित महत्त्वाची तारीख :-

ऑनलाइन रजिस्ट्रेशन 24 जून 2022 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल.

ऑनलाइन रजिस्ट्रेशनची अंतिम तारीख 5 जुलै 2022 आहे. त्या दिवशी सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे.

24 जुलैपासून ऑनलाइन परीक्षा सुरू होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.