Take a fresh look at your lifestyle.

7/12 e-Ferfar : आजपासून फिफो योजना महाराष्ट्रभर लागू, 7/12, पोटहिस्सा दुरुस्तीसह ‘ही’ कामे 3 दिवसांत लागणार मार्गी..

तलाठी व मंडळ अधिकारी यांच्याकडील ई फेरफार मंजूर करतेवेळी प्रथम प्राप्त, प्रथम निर्गत अर्थात ‘फर्स्ट इन फर्स्ट आउट’ (फिफो) ही योजना लागू करण्यात आली होती. आता राज्यातील सर्व तहसीलदारांच्या पातळीवरही प्रथम प्राप्त प्रथम निर्गत ही योजना 1 डिसेंबर अर्थात आजपासून लागू केली जाणार आहे.

या सुविधेमुळे तहसीलदार यांच्याकडील कलम 155 नुसार सात – बारा उताऱ्यातील दुरुस्ती आदेश, पोटहिस्सा निर्माण करणे आदी कामे गतीने मार्गी लागण्यास मदत होणार आहे.

तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांच्या स्तरावर (फिफो) यंत्रणा लागू करण्यात आली. त्याचा चांगला परिणाम दिसून आला फेरफार उताऱ्यावर नोंदी घेण्याचा कालावधी कमी होऊन तीस दिवसांवर आला पूर्वी याच कामांसाठी किमान चाळीस ते पंचेचाळीस दिवसांचा कालावधी लागत होता.

तसेच दाखल अर्जाच्या क्रमांकानुसारच ते कामकाजात एक प्रकाराची शिस्त असल्याचे दिसून आले. त्यामुळ ही यंत्रणा आता तहसीलदारांच्या पातळीवर लागू मागी लागण्याचे प्रमाणदेखील वाढले असून, महसूल करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे . राज्यात 358 तहसीलदार कार्यालये असून, 16 अपर तहसीलदार कार्यालये अशा 374 कार्यालयांमध्ये ही योजना लागू होणार आहे.

कामे गतीने मार्गी लागणार याविषयी भूमिअभिलेख विभागाच्या ई फेरफार प्रकल्पाच्या राज्य समन्वयक सरिता नरके म्हणाल्या, तलाठी, मंडल अधिकारी यांच्या स्तरावर लागू करण्यात आलेली ‘फिफो’ योजना आता तहसीलदारांच्या पातळीवरही एक डिसेंबरपासून लागू करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे नागरिकांची कामे पारदर्शकपणे आणि वेळेत मार्गी लागण्यास मदत होणार आहे.