Take a fresh look at your lifestyle.

भोर तालुक्यात शिक्षकाने केला ‘ड्रॅगन फ्रुट’चा यशस्वी प्रयोग । फक्त 20 गुंठ्यात कमावला 5 लाखांचा नफा, सरकार देतंय 1,6000 रु अनुदान, पहा….

शेतीशिवार टीम : 25 जुलै 2022 :- भोरच्या उत्तरेकडील व भाटघर धरण परिसरातील वेळवंडी नदीकिनारी असलेल्या हर्णस या गावात नारायण राजाराम हिरगुडे व त्यांच्या पत्नी संगीता नारायण हिरगुडे यांनी आपल्या शेतात 20 गुंठे क्षेत्रात म्हणजेच अर्ध्या एकरात ड्रॅगन या दुर्मिळ फळाची 1000 फळझाडे लागवड करून आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तालुक्यात एक वेगळा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे.

हर्णस येथे राहणारे नारायण हिरगुडे हे पिंपरी – चिंचवड येथे राजर्षी शाहू विद्यालयात शिक्षक असून त्यांच्या पत्नी या ग्रामपंचायत संगणक ऑपरेटर आहेत. या दाम्पत्याने ड्रॅगन फळ लागवड हा नवीन प्रयोग करून अलौकिक उपक्रम केला आहे.

ड्रॅगन फळ हे सहसा बाजारात उपलब्ध होत नाही. बाहेरच्या देशात आढळणारे हे फळ आता आशियाई देशात आढळून भारतात याची लागवड मोठ्या प्रमाणावर होत चालली आहे. हे फळ पिताहाया कि पिताया नावानेही ओळखले जाते.

पंतप्रधानांनी तर या फळाला कमलम हे नाव दिले आहे. हे फळझाड कोरपड, निवडुंगसारख्या काटेरी वनस्पती वेली प्रकारातील अतिशय उपयुक्त औषधी फळझाड आहे. या फळझाडासाठी उत्तम पाण्याचा निचरा होणारी सेंद्रिययुक्त, वालुकामय सुपीक जमीन लागते.

ड्रॅगन फ्रूटचे फायदे :-

या फळापासून व्हिटॅमिन सी, बी, कॅल्शियम, पोटॅशियम, लोह, फायबर, प्रोटिन अशी जीवनसत्त्वे मिळतात. 90% पाणी असलेल्या या फळाने डायबेटिज, हृदयविकार, कॅन्सर, पोटाचे आजार, कोलेस्ट्रॉल नियंत्रण, लठ्ठपणा व चरबी कमी होण्यास मदत होते. असे सर्वांत जास्त रोगप्रतिकारकशक्ती, पांढऱ्या पेशी वाढविणारे उपयुक्त फळ आहे. डेंग्यू, मलेरिया आजारात या फळाचा उपयोग केल्याने रुग्ण लवकर बरा होतो, असे आरोग्यतज्ज्ञांकडून बोलले जात आहे.

अशा या आरोग्यासाठी उपयुक्त असणाऱ्या फळाची लागवड अकरा महिन्यांत हिरगुडे यांनी यशस्वी केली आहे. या फळाचा बाजारात रस, सरबत, जॅम, जेली काढा, आइस्क्रीम, पिझ्झा व वाइन बनविण्यासाठी होतो.

बाजारात याचा भाव सध्या 200 ते 400 रुपये प्रति किलो आहे. तालुक्यातून तसेच आजूबाजूच्या परिसरातून माठ्या संख्यने पर्यटक प्रवासी ही शेती पाहण्यासाठी येत आहेत , असे शेतकरी नारायण हिरगुडे यांनी सांगितले.

ड्रॅगन फ्रूट लागवड अनुदान योजना : 2022 | ड्रॅगन फ्रूटसाठी हेक्टरी 1,60,000 रु. अनुदानास सुरुवात !