Take a fresh look at your lifestyle.

Ahmednagar Panchayat Election: नगर जिल्ह्यातील 15 ग्रामपंचायतीत काय घडलं ? कोणी मारली बाजी कोणाला बसले धक्के, पहा…

शेतीशिवार टीम :- Maharashtra Gram Panchayat Election Results 2022 : राज्यातील राजकीय चढउतारांच्या दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने पंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर केले आहेत. एक दिवस आधी म्हणजे 4 ऑगस्टला राज्यातील 62 तालुक्यांतील एकूण 271 ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. ग्रामपंचायत निवडणुकीची आज मतमोजणी सुरू आहे. कडेकोट बंदोबस्तात मतमोजणी केंद्रांवर अजूनही मतमोजणी सुरू असून, आतापर्यंत अनेक पंचायतींचे निकाल जाहीर झाले आहेत. मात्र, रात्री उशिरापर्यंत सर्व पंचायतींचे अंतिम निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यांमध्ये ग्रामपंचायत निवडणुका होत आहेत ते नाशिक (40), धुळे (52), जळगाव (24), अहमदनगर (13), पुणे (19), सोलापूर (25), सातारा (10), सांगली (10) आहेत. (1), औरंगाबाद (16), जालना (28), बीड (13), लातूर (9), उस्मानाबाद (11), परभणी (3) आणि बुलढाणा (5).

या निवडणुकांमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला असून शिंदे – ठाकरेंच्या वादात भाजपला फायदा झाल्याचे दिसून येत आहे.

कोणत्या पक्षाच्या किती जागा विजयी ?

भाजप – 82
राष्ट्रवादी काँग्रेस – 53
शिंदे गट – 40
शिवसेना – 27
काँग्रेस – 22
इतर – 47

अहमदनगर जिल्ह्याबद्दल बोलायचं झालं तर जिल्ह्यातील कर्जत, राहुरी, नगर, संगमनेर, शेवगाव मधील 13 ग्रामपंचायती निवडणुकांमध्ये भाजपला सर्वाधिक पाच ग्रामपंचायतीवर विजय मिळाला आहे. तर 2 जागा आधीच बिनविरोध झाल्या होत्या…

कर्जतमध्ये आमदार रोहित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. विधान परिषद आमदार राम शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपने कुळधरण, कोरेगाव, बजरंगवाडी या तीन ग्रामपंचायतीत विजय मिळवला.

कोरेगाव :- 13 पैकी 7 जागांवर भाजप विजयी.
बजरंगवाडी :- 7 पैकी 5 जागांवर भाजप विजयी.
कुळधरण :- 13 पैकी 7 जागांवर भाजप विजयी.

नगर तालुक्यात माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपने नगर तालुक्यातील भातोडी व पिंपळगाव उज्जैनी ग्रामपंचायतीवर सत्ता मिळविली. परंतु हक्काची बाबुर्डी घुमट ग्रामपंचायत ही तानाजी परभणे गटाने खेचून आणली आहे.

राहुरी तालुक्यात मात्र राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं यश मिळालं असून माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्त्वाखाली 3 ग्रामपंचायतीमध्ये वाघाचा आखाडा व जानक मध्ये सत्ता मिळवली तर तांदुळवाडीचा निकाल संमिश्र राहिला.

शेवगावमधील विजयगाव या एकवेळ ग्रामपंचायींमध्ये राष्ट्रवादीने झेंडा फडकवला.

संगमनेर तालुक्यात माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी 3 ग्रामपंचायतीपैकी दरेवाडी व निमज ग्रामपंचायतींवर विजय मिळवला तर मांडवे खुर्दमध्ये स्थानिक आघाडीने सत्ता मिळवली.

भाजप – 5
राष्ट्रवादी काँग्रेस – 3
काँग्रेस – 2
स्थानिक आघाडी – 3

पुणे जिल्ह्यातील एकूण 19 ग्रामपंचायतीपैकी 6 ग्रामपंचायतींत राष्ट्रवादीची सरशी..

राष्ट्रवादी – 6
शिवसेना – 2
भाजप – 2
शिंदे गट – 1
काँग्रेस – 1
बिनविरोध :- 7

शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी, जांबुत, म्हसे बुद्रूक, माळवाडी, सदरवाडी, तांदळी ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादीने झेंडा फडकवला.