Take a fresh look at your lifestyle.

नांदेड – लातूरमार्गे थेट गाठता येणार मुंबई ! बिदर – नांदेड व बोधन – लातूर रेल्वे मार्गाच्या अंतिम सव्हेक्षणास मंजूरी, पहा स्टेशन्स अन् Route Map..

गेल्या 30 ते 35 वर्षांपासून प्रलंबीत असलेल्या नव्या रेल्वे मार्गाचा प्रलंबीत प्रश्न निकाली निघाली आहे त्यामुळे नांदेड – लातूर जिल्ह्यातील जनतेला दिलासा मिळाला आहे. नांदेड कनेक्टिव्हिटीचे मोठे 4 प्रकल्प मंजूर झाले आहे. बोधन – बिदर व नांदेड – लोहा लातूरसह बोधन – मुखेड लातूर नव्या रेल्वे मार्गाच्या अंतिम सर्व्हेक्षणास मंजूरी मिळाली असल्याची माहिती खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे सतत पाठपुरावा करुन चिखलीकर यांनी नांदेड – बीदर या नव्या रेल्वे मार्गाची मंजूरी मिळवून राज्य शासनाकडून 750 कोटी रुपयांचे बजेट मंजूर करुन घेतले. नांदेड जिल्ह्यातील रेल्वेचे 4 मोठे प्रकल्प मंजूर करुन घेण्यासाठी केंद्रात सतत प्रयत्न केल्याची माहिती खा. चिखलीकर यांनी दिली.

बोधन – बिदर, नांदेड – लोहा – लातूर, बोधन- मुखेड – लातूर या तीन नव्या रेल्वे मागांचे अंतिम सव्र्व्हे करण्याचे आदेशानुसार आदेश दिले आहेत. रेल्वे मंत्र्याच्या सहाय्यक बोर्डाचे संचालक अभिषेक जगावत यांनी दक्षिण मध्य रेल्वेच्या जनरल मॅनेजरला दि .6 फेब्रुवारी 2024 रोजी पत्र पाठवून या तिन्ही नव्या रेल्वे मार्गाचे अंतिम (फायनल) सर्व्हे करण्याचे आदेश जारी केले आहेत.

बोधन – बिदर या 114 कि.मी. नव्या रेल्वे मार्गासाठी 285.25 कोटी रुपये तर नांदेड – लोहा – लातूर या 103 कि.मी. नव्या रेल्वे मार्गासाठी 275.95 कोटी रुपयांचा निधीही रेल्वे बोर्डाने या रेल्वे प्रकल्पासाठी मंजूर केल्याचे आपल्या पत्रात नमूद केले आहे.

कसा आहे लातूर – नांदेड ब्रॉडगेज रेल्वे मार्ग..  

मुंबई – लातूर – नांदेड ब्रॉडगेज रेल्वे मार्ग हा मराठवाड्यातील प्रमुख शहरे लातूर व नांदेडला रेल्वे मार्गाने थेट जोडण्यासाठीचा प्रकल्प आहे. या रेल्वे प्रकल्पाची लांबी 103 कि.मी.असून अंदाजे किंमत 3 हजार 12 कोटी एवढी आहे. तसेच वर्धा – यवतमाळवरूनही ब्रॉडगेज रेल्वेमार्ग नांदेडपर्यंत येणार आहे.

याशिवाय लातूरमार्गे मुंबईला जाण्यासाठीही हा नवीन मार्ग असणार आहे. वर्धा ते यवतमाळ या प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्णत्वास आला आहे, तर दुसऱ्या टप्प्यात भूसंपादन करण्यात आले असून, पूल बांधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. नवीन मार्गासाठी भांडवली निधीतून 450 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. रेल्वेने सुरक्षा निधीतून 300 कोटी रुपये ठेवले आहेत..

कसा आहे, नांदेड – देगलूर – बिदर ब्रॉडगेज रेल्वे मार्ग.. 

या रेल्वे प्रकल्पासाठी जमिनीच्या खर्चासह 1500 कोटी 98 लाख रुपये खर्च येणार आहे. त्यापैकी 50 टक्के रक्कम म्हणजे 750 कोटी 49 लाख रुपये राज्य सरकार देणार आहे. नांदेड-बिदर हा 157 किलोमीटरचा नवीन रेल्वे मार्ग होणार आहे. त्यापैकी 100.75 किमीचा मार्ग महाराष्ट्रात असेल तर उर्वरित 56.30 किमीचा मार्ग कर्नाटकात असेल. या रेल्वे मार्गावर एकूण 14 स्टेशन्स बांधण्यात येणार आहेत. या थेट रेल्वे मार्गामुळे बिदर ते नांदेड हे अंतर 145 किमीने कमी होणार आहे.