Take a fresh look at your lifestyle.

पुणे : राऊत साहेब, लई भारी…! नोकरीला लाथ मारली अन् सुरु केली जरबेराची शेती ; फक्त 25 गुंठ्यातचं घेतलं 18 लाखांचे उत्पन्न…

शेतीशिवार टीम : 26 जुलै 2022 :- भारत हा कृषीप्रधान देश आहे. परंतु शेती परवडत नसल्याचे अनेक शेतकरी बांधव सांगत असतात. परंतु जर तुमच्याकडे इच्छाशक्ती असेल तर शेती नक्की परवडते आणि लाखोंचं उत्पादन सुद्धा घेता येतं, ही किमया करुन दाखवली आहे पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील लवळे मधील शेतकरी ऋषिकेश रामचंद्र राऊत यांनी. जरबेराच्या 10 गुंठे फूल शेतीमधून ते वर्षाकाठी तब्बल 18 लाख रुपयांचे उत्पादन घेतलं आहे.

ऋषिकेश राऊत यांनी 2012 साली जरबेराचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली त्यापूर्वी ते पुण्यात एका संस्थेत नोकरीला होते. मात्र, त्यांचा मूळचा पिंड हा शेतीचा असल्याने त्यांचे तेथे मन रमले नाही.त्यामुळे त्यांनी नोकरीचा राजीनामा देऊन थेट गाव गाठले आणि पूर्णवेळ शेतीत लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला. मात्र शेती करताना त्यामध्ये अनेक विविध आधुनिक प्रयोग राबविले.

त्यांना एकूण चार एकर शेती आहे त्यातील 25 गुंठे मध्ये जरबेराचे उत्पादन घेतात तर इतर शेतीत कांदा, गवार, भेंडी, टोमॅटो, वांगी, मिरची अशी विविध पिके घेतात.

मात्र यामध्ये सर्वाधिक कांद्याचे उत्पादन घेतात कांद्याला हंगामात कमी भाव मिळतो म्हणून ते कांद्याची साठवणूक करून ते ज्या वेळी भाव वाढतील त्यावेळी कांद्याची विक्री करतात. तसेच त्यांच्या आठवडा बाजारात गवार, भेंडी, टोमॅटो, वांगी मिरचीची विक्री करतात.

लॉकडाऊनच्या काळात फुलांना मागणी नव्हती त्यावेळी त्यांना फुले फेकून द्यावी लागली. मात्र त्यावेळी त्यांनी जरबेराच्या एक शेडमध्ये कोथिंबीर, मेथी आणि काकडी यांचे उत्पादन घेतले राऊत यांचा पूर्ण परिवार शेतीमध्ये काम करतो यामध्ये त्यांच्या आई, पत्नी आणि ते स्वतः शेती करतात तसेच त्यांच्याकडे दोन कायमस्वरूपी कामगार आहेत.

कोरोनाच्या काळात किरण ननावरे यांनी मोलाची मदत केली. जरबेरा फुलांचे उत्पादन घेताना गोमूत्र तसेच शेणखताचा वापर केला जातो. तसेच दर तीन महिन्यांनी माती आणि पाणी परीक्षण केले जाते. त्यानुसार कोणती औषधे, खते आणि ती किती प्रमाणात वापरायचे हे ठरवले जाते.

25 गुंठ्यात वर्षाला जरबेराच्या 60 हजार गठ्ठया उत्पादित होतात. महिन्याला दीड लाख रुपये उत्पन्न मिळते तर वर्षाला 18 लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. लग्नसराई तसेच सण उत्सवाच्या वेळी जर त्याला मोठ्या प्रमाणात मागणी असते त्यामुळे भाव चांगले मिळतात.श्रावण महिना व गणेशोत्सव दरम्यान हैदराबाद, बेंगलोर, दिल्ली, औरंगाबाद, अहमदनगरमधून मुलांना मोठ्या प्रमाणात मागणी असते.

पुणे आणि इतर आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पॉलिहाऊस आहे. त्यामुळे मराठवाड्यातून फुलांना चांगली मागणी असते 2012 साठी पॉलिहाऊस केले त्यावेळी शासनाचे 25% अनुदान होते ते मिळाले नंतरच्या काळात 50% अनुदान झाले. मात्र, सध्या ते शासनाने बंद केले आहे.

25 गुंठे क्षेत्रात पॉलिहाऊस करताना 30 लाख रुपये खर्च आला त्यातून साडेआठ लाख रुपयांचे अनुदान मिळाले. दरम्यान पावसाळा सुरू झाल्यानंतर रोग व किडींचा प्रादुर्भाव होत असल्याने त्यावर विविध प्रकारच्या फवारण्या कराव्या लागतात. तसेच हंगाम सुरू होण्यापूर्वी दिवाळीदरम्यान सर्व प्रकारचे मशागत करावी लागली.

जरबेराची शेती करताना विशेष काळजी घ्यावी लागते. 2012 पासून जरबेरा ची शेती करत असून त्यामध्ये चांगले उत्पादन मिळत आहे. मात्र कोरोना दरम्यानच्या काळात मोठे आर्थिक नुकसान झाले. त्यावेळी मात्र काही इतर खरीप पिके घेतलेली सद्यस्थितीत पुन्हा जरबेरा फुलांचे उत्पादन चांगले होत असून परिस्थिती पूर्ण बदलली आहे :- ऋषिकेश रामचंद्र राऊत – शेतकरी लवळे, तालुका मुळशी