Take a fresh look at your lifestyle.

राज्य कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस – DA चे मोठं अपडेट! ‘या’ कर्मचाऱ्यांना तब्बल 50,000 रुपयांचा बोनस जाहीर, पहा डिटेल्स..

महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनसबाबत एक मोठं अपडेट समोर आलं आहे. राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनसची तयारी जवळपास पूर्ण केली असून बोनस जाहीर केला आहे. तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत डीएबाबत घोषणा केली असून महागाई भत्यात 2 टक्यांच्या वाढीला मंजुरी दिली आहे.

आधीच जून महिन्यात 4 टक्क्यांची वाढ झाली असताना आता पुन्हा 2 टक्क्यांनी वाढ केल्याने कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 44 टक्क्यांवर पोहचला आहे. सदरचा वाढीव डी.ए हा जुलै 2023 पासुनच लागु करण्यात येणार असल्याने, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोंबर या चार महिन्यातील डी.ए फरकाचा लाभ रोखीने अदा करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.

तसेच राज्य सरकारकडून दरवर्षी दिवाळी सणानिमित्त सण अग्रिम व दिवाळी बोनस जाहीर करण्यात येतो, राज्य सरकारी शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांना यावर्षी सर्वाधिक दिवाळी सण बोनस जाहीर केले असून त्यापाठोपाठ राज्यातील पालिका प्रशासनांकडून दिवाळी बोनस जाहीर करण्यात आलेले आहेत.

सिडकोच्या (CIDCO Bonus) 50 हजारांचा बोनस जाहीर..

सिडकोने राज्यातील इतर महामंडळे व शासकीय कार्यालयांपेक्षा सर्वाधिक बोनस जाहीर केला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. बोनसची घोषणा होताच कर्मचाऱ्यांनी फटाके फोडून, मिठाई वाटून आनंद व्यक्त असून तब्बल 50 हजारांचा दिवाळी बोनस जाहीर करण्यात आला आहे.

BMC कर्मचाऱ्यांसाठी बोनसची घोषणा..

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना भेट दिल्याची घोषणा केली. कर्मचाऱ्यांना गेल्या वर्षीच्या तुलनेत 3500 रुपये अधिक बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.

गतवर्षी दिवाळी अनुदान सब्सिडीत प्रथमच 3500 रुपयांची वाढ करण्यात आली होती. यावर्षी ती वाढवून 26 हजार रुपये करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आणि अनुदान देण्याचा निर्णय घेतला. या वेळी रोजंदारीवर काम करणाऱ्या बहुउद्देशीय कामगारांना कल्याणकारी अनुदान देण्याच्या मागणीवरून पालिका आयुक्तांना रुग्णालयातील बहुउद्देशीय कामगार व शिक्षकांची दिवाळी भेट घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

ठाणे महापालिकेकडून 21,500 हजार रुपयांचा बोनस जाहीर..

ठाणे महापालिकेने गेल्या वर्षाच्या तुलनेत सानुग्रह अनुदानासह बोनसमध्येही 20 टक्के वाढ केली असून 21 हजार 500 रुपये दिवाळी बोनस जाहीर करण्यात आला आहे. तसेच आशा सेविकांना यंदा 6000 रुपयांची भाऊबीज जाहीर करण्यात आली आहे.

KDMC नेही 18,500 चा बोनस केला जाहीर..

कल्याण डोंबिविली पालिका प्रशासनांमधील कर्मचाऱ्यांना 18,500/- रुपये दिवाळी बोनस जाहीर करण्यात आले आहेत , जे कि मागील वर्षी 16,500/- रुपये इतकी रक्कम जाहीर करण्यात आलेली होती.

नवी मुंबई पालिका कर्मचाऱ्यांना 24,000 रुपये बोनस..

नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी कर्मचाऱ्यांना नऊ दिवस आधीच सानुग्रह अनुदानाची भेट दिली आहे. पालिका आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना 30 हजार तसेच करार तात्पुरत्या स्वरूपातील कर्मचाऱ्यांना 24 हजार व आशा सेविका यांना 14 हजार रुपयांच सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे.