Take a fresh look at your lifestyle.

ब्रेकिंग : ‘ड्रोन’ खरेदीबाबत सरकारचा महत्वपूर्ण निर्णय | ड्रोन खरेदी करण्यापूर्वी करावं लागणार हे काम, अन्यथा…

शेतीशिवार टीम, 6 एप्रिल 2022 :- शेतकरी मित्रानो, सरकारकडून सध्या शेतीमध्ये ड्रोनचा वापर करण्यावर भर दिला जात आहे. या ड्रोन मार्फत आधुनिक शेतीसाठी मागील बजेटमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेट सादर केलं होतं. भारतीय शेतीला हायटेक बनवण्याचा यामागे सरकारचा उद्देश आहे.

ड्रोनच्या वापरामुळे शेतकऱ्यांना कमी वेळेत अधिक उत्पादन घेता येणार आहे. आता कृषी यंत्रांच्या यादीत ड्रोनचा ही समावेश करण्यात आला असून त्यासाठी शासनाकडून शेतकऱ्यांना अनुदान दिलं जात आहे. हे अनुदान तिथल्या सरकारने ठरवून दिलेल्या निकषांनुसार राज्यानुसार बदलू शकतं.

शेतकऱ्यांनी आधुनिक युगामध्ये अधिक आधुनिक करण्याकरता प्रगत करण्याकरता आपल्या शेतामध्ये ड्रोनच्या माध्यमातून फवारणी करण्या करता ड्रोन खरेदीसाठी अर्थसहाय्य देण्यात येत आहे. यासाठी अर्ज सुरु झाले आहे. परंतु सरकारला यामध्ये अनियमितता आढळून आली आहे. त्यामुळे नियमितता रहावी यासाठी कृषी संस्थांना आधी पूर्वसंमती घ्यावी लागणार आहे आणि त्यानंतरच ड्रोन मिळणार आहे. याबाबत कृषी राज्य कृषी आयुक्तालयाने स्पष्ट निर्देश दिले आहे.

जर तुम्ही पूर्वसंमतीशिवाय द्रोण खरेदी केले तर तुम्हाला अनुदान मिळणार नाही व तसेच दिलेल्या नियमांनुसारचं तुम्हाला प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे. तुम्ही तालुका / जिल्हा कृषी ऑफिसला केलेल्या प्राप्त अर्जांना राज्य आणि केंद्राची परवानगी मिळाल्यानंतर आता ड्रोन खरेदीची परवानगी दिली जाणार आहे.

उद्देश :-

ड्रोनच्या माध्यमातून फवारणी हा शेतकऱ्यांसमोर आलेला नवीन पर्याय असून कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये औषधाची बचत करून या ठिकाणी फवारणी करणे शक्य होतं आहे.

आपण जर पाहिलं तर सध्या नॅनो युरिया आला आहे येणाऱ्या काळात नॅनो डिफ येतोय अन् अशा प्रकारची लिक्विड खत आल्यामुळे आता फवारणी करायची असेल तर अशा प्रकारची खते फवारणी करण्या करता खूप मोठ्या क्षेत्रांमध्ये हे जर खत फवारणी करायची असली तर ड्रोन हा मोठा पर्याय ठिकाणी उपलब्ध आहे.

सध्या राज्यांमध्येही खाजगी कंपनीच्या माध्यमातून सध्या ड्रोन वापरले जात आहेत याची प्रात्यक्षिके घेतली जात आहेत. परंतु जानेवारी 2022 मध्ये कृषी यांत्रिकरण उपअभियानाच्या अंतर्गत महत्त्वपूर्ण अशा मार्गदर्शक सूचना निर्गमित करुन या योजनांना मंजुरी दिली आणि हीच योजना आता राबवण्यासाठी सुरुवात झाली असून आता महाराष्ट्र मधून सुद्धा अर्ज मागवण्यात आले आहेत.

लाभ :-

1) सध्या शेती सुलभ करण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढू शकते.
2) ड्रोनच्या वापराने रासायनिक खते, युरिया आणि कीटकनाशकांची फवारणी कमी वेळेत मोठ्या क्षेत्रावर सहज करता येते.
3) ड्रोनच्या साहाय्याने पेरणीसाठी बियाणे विखुरण्याचे काम फवारणी पद्धतीने शेतात करता येते

4) ड्रोनच्या साहाय्याने शेताच्या रक्षणाचे कामही करता येते.
5) ड्रोन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे कमी श्रमात आणि वेळेत जास्त काम करणे शक्य होणार आहे.

6) ड्रोनच्या मदतीने शेतीचा खर्च कमी करता येतो.
7) कृषी क्षेत्रात ड्रोनचा वापर केल्यास ग्रामीण भागातील तरुणांसाठी रोजगाराच्या संधी वाढणार आहे.

कृषी विद्यापीठे / शेतकरी सहकारी संस्था / शेतकरी उत्पादक कंपन्यांना मिळळणार अनुदान…

राष्ट्रीय विज्ञान केंद्राच्या अंतर्गत कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत कृषी विद्यापीठांना 100% अनुदानावर ड्रोन मिळणार असून त्याची जास्तीत जास्त मर्यादा ही 10 लाख रुपये असणार आहे.

शेतकरी सहकारी संस्था / शेतकरी उत्पादक कंपन्या / ग्रामीण भागातील नवउद्योजक / कृषी पदवीधारक / यांना 75% अनुदान दिलं जाणार आहे. जे जास्तीत जास्त 7.50 लाख रुपये असणार आहे.

या व्यतिरिक्त इतर शेतकरी सहकारी संस्था शेतकरी उत्पादक कंपन्या खरेदी व्यतिरिक्त फक्त प्रात्यक्षिक करणार असतील तर एखाद्या संस्थेकडून किंवा एखाद्या कंपनीकडून ड्रोन भाड्याने घेतलं तर त्याच्यासाठी सुद्धा प्रति हेक्‍टरी 6 हजार रुपये एवढा खर्च योजनेअंतर्गत अर्थसाह्य म्हणून दिला जाणार आहे.

अर्ज कुठे व कसा कराल ?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज सादर करावा लागणार आहे.

तुम्हाला तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाला भेट द्यावी लागेल. तालुका कृषी अधिकारी यांच्या माध्यमातून हा अर्ज सादर करायचा आहे याच्या सोबत कागदपत्रे ही तुम्हाला सादर करावे लागतील.

ड्रोन खरेदी साठी कागदपत्र पुर्ण असते तर आपल्याला ड्रोन खरेदीसाठी अनुदान मिळेल. यासाठी तुम्ही लवकरात लवकर तालुका कृषी अधिकाऱ्यांची भेट घ्या….