Take a fresh look at your lifestyle.

राज्यातल्या 13 FPO ला ‘या’ कंपनीकडून 3.5 कोटींचं कर्ज । शेतकऱ्यांनो, कृषी व्यवसायासाठी तुम्ही मिळवू शकता 15 लाखांचं अर्थसहाय्य, पहा प्रोसेस…

शेतीशिवार टीम :14 जुलै 2022 :- देशातील अग्रगण्य मल्टी – ॲसेट ॲग्री फायनान्स कंपनी आणि एसएलसीएम (SLCM) समूहाची उपकंपनी असलेल्या किसानधनने (Kisandhan) महाराष्ट्रातून 34 ते 40% एफपीओ (शेतकरी उत्पादक संघटना) व्यवसाय करण्याचे लक्ष्य ठेवून आपल्या कामकाजाची सुरुवात केली आहे.

राज्यभर आपले कामकाज पसरवण्याच्या उद्देशाने कंपनीने नुकताच राज्यातील 13 FPO (Farmer Producer Organization) बरोबर करार केला आहे . त्यानुसार त्यांना 3.5 कोटी रुपयांचे कर्जदेखील वितरित केले आहे.

देशातील FPO वाढवण्यावर केंद्र सरकारने लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळेच शेतकरी उत्पादक संघटना (FPO) मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. 2027-28
पर्यंत 10,000 नवीन FPO सेटअप आणि प्रोत्साहन देण्यासाठी गेल्या वर्षी सरकारने 10,000 शेतकरी उत्पादक संघटनांची निर्मिती आणि प्रोत्साहन या केंद्रीय क्षेत्र योजनेला मंजुरी दिली आहे.

या योजनेचा अर्थसंकल्पीय खर्च 6,865 कोटी रुपये आहे. किसानधन FPO ने जून 2021 मध्ये व्यवसाय सुरू केला आहे. सध्या कंपनीकडे देशभरात ३० पेक्षा जास्त FPO आहेत, ज्याद्वारे कंपनीने 30,000 हुन लहान शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवण्याचे काम केले आहे. येत्या काळात किसानधनने 100 FPO सोबत करार करण्याचे लक्ष्य ठेवले असून याद्वारे ते सरकारचे 15 लाखांच्या अर्थसाहाय्य व्यतिरिक्त स्वतः शेतीसाठी लागेल तेवढं कर्ज उपलब्ध करून देत आहे. ज्याद्वारे 75000 ते 1 लाख अल्पभूधारक शतकऱ्यांच्या जीवनमानावर याचा परिणाम चांगला परिणाम होणार आहे.

परंतु देशासह राज्यातील असे अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत, त्यांच्यापर्यंत या योजनेबद्दची माहिती पोहचत नाही. याबद्दल माहिती पोहचली तर त्या योजनेच्या मुळापर्यंत जात नाही. त्यामुळे ते वंचित राहतात. आता आपण या योजनेद्वारे तुम्ही सरकारकडून कृषी व्यवसायासाठी कर्ज कसं मिळवू शकता ? पात्रता, कागदपत्रे, अनुदान, ऑनलाईन अर्ज प्रोसेस याबद्दलची सर्व माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा लेख शेवट्पर्यंत नक्की वाचा अन् आपल्या गावातही एक FPO बनवा…

शेतकरी पुत्रांनो, आधी FPO म्हणजे म्हणजे नेमकं काय :- 

एफपीओ (FPO) ही एक प्रकारची शेतकरी उत्पादक संस्था आहे जी शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करते आणि कंपनी कायद्यांतर्गत रजिस्टर्ड आहे. पीएम किसान एफपीओ योजनेअंतर्गत कृषी संस्थांना प्रोत्साहन दिलं जातं.

या योजनेच्या माध्यमातून संस्थांना सरकारकडून 15 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार जाते. आता देशातील शेतकऱ्याला शेती व्यवसायाप्रमाणे नफा मिळणार आहे. PM किसान FPO योजनेचा लाभ घेण्यासाठी किमान 11 शेतकर्‍यांना संघटित करून त्यांची कृषी कंपनी स्थापन करावी लागणार आहे. एफपीओ संघटनांनाही सरकारकडून कंपनीला दिलेले सर्व फायदे दिले जातील. या योजनेंतर्गत दिलेली रक्कम टप्प्याटप्याने थेट कृषी कंपनीच्या अकाउंट वर ट्रान्सफर करण्यात येते. या योजनेच्या माध्यमातून देशात 2019-20 ते 2023-24 या पाच वर्षांच्या कालावधीत 10,000 FPO तयार करण्याचे सरकारने लक्ष्य ठेवलं आहे.

पात्रता :-

पीएम किसान एफपीओ (FPO) योजनेची पात्रता :-
अर्जदार हा व्यवसायाने शेतकरी असावा.
अर्जदार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
पठारी भागातील FPOमध्ये किमान 300 सदस्य असावेत.
डोंगराळ भागातील एका SPO मध्ये किमान 100 सदस्य असावेत.
FPO कडे स्वतःची लागवडीयोग्य जमीन असणे बंधनकारक आहे आणि समूहाचा भाग असणे देखील बंधनकारक आहे.

FPO योजनेची महत्वाची कागदपत्रे :-

आधार कार्ड
पत्त्याचा पुरावा
जमिनीची कागदपत्रे
शिधापत्रिका
उत्पन्न प्रमाणपत्र
बँक खाते डिटेल्स
पासपोर्ट आकाराचे 2 फोटो..
मोबाईल नंबर

पीएम किसान एफपीओ (FPO) योजनेअंतर्गत अर्ज करण्याची प्रोसेस :-

सर्वप्रथम तुम्हाला राष्ट्रीय कृषी बाजाराच्या ऑफिशिअल वेबसाईट वर जावे लागेल.
आता तुमच्या समोर होम पेज ओपन होईल.
होम पेजवर तुम्हाला FPO च्या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल.
त्यानंतर तुम्हाला ‘Registration’च्या ऑप्शन वर क्लिक करावं लागेल.
आता तुमच्या समोर ‘Registration’ फॉर्म उघडेल.

आपल्याला फॉर्ममध्ये खालील माहिती प्रविष्ट करणे आवश्यक आहे…

रजिस्ट्रेशन टाइप
रजिस्ट्रेशन लेवल
पूर्ण नाव
लिंग
पत्ता
जन्मतारीख
पिन कोड
जिल्हा
फोटो आयडी प्रकार
मोबाईल नंबर
ई – मेल आयडी
कंपनीचे नाव
राज्य
तहसील
फोटो आयडी क्रमांक
पर्यायी मोबाईल नंबर
परवाना क्र.
कंपनी रजिस्ट्रेशन
बँकेचे नाव
खातेधारकाचे नाव
बँक खाते क्रमांक
IFSC कोड

यानंतर, तुम्हाला स्कॅन केलेले पासबुक किंवा रद्द केलेला चेक आणि आयडी प्रूफअपलोड करावा लागेल.
आता तुम्हाला Submitted ऑप्शनवर क्लिक करावं लागेल.
अशा प्रकारे तुम्ही FPO योजनेअंतर्गत अर्ज करू शकाल…

लॉगिन (Login) प्रोसेस :- 

सर्वप्रथम तुम्हाला राष्ट्रीय कृषी बाजाराच्या ऑफिशिअल वेबसाईट वर जावे लागेल
आता तुमच्या समोर होम पेज ओपन होईल.
त्यानंतर तुम्हाला FPO च्या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.
आता तुम्हाला Login ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.
यानंतर, तुमच्या समोर (Login form) येईल.
आता तुम्हाला युजरनेम, पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकावा लागेल.
त्यानंतर तुम्हाला लॉगिन पर्यायावर क्लिक करावे लागेल.
अशा प्रकारे तुम्ही लॉगिन करू शकाल…

या योजनेशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकता. 1800 270 0224 हा टोल फ्री क्रमांक आहे. याबाबत तुम्ही जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडेही योजनेबद्दल अधिक जाणून घेऊ शकता..