Take a fresh look at your lifestyle.

E-Nam किसान FPO योजना : 2022 | कृषी व्यवसायासाठी मिळवा 15 लाख रु.अर्थसहाय्य…

शेतीशिवार टीम, 17 मार्च 2022 : देशातील शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी सरकारकडून विविध योजना राबविण्यात येत आहेत. आज आपण अशाच एका योजनेशी संबंधित माहिती जाणून घेणार आहोत त्याचं नाव आहे, PM किसान FPO योजना (PM Kisan FPO scheme). 

हा लेख वाचून तुम्हाला पीएम किसान एफपीओ योजनेशी (PM Kisan FPO) संबंधित सर्व महत्त्वाची माहिती मिळणार आहे. जसे की पीएम किसान एफपीओ योजना काय आहे ?, तिचा उद्देश, फायदे, वैशिष्ट्ये, पात्रता, महत्त्वाची कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया इ.

तर मित्रांनो, जर तुम्हाला PM किसान FPO योजनेशी संबंधित सर्व महत्वाची माहिती मिळवायची असेल, तर तुम्हाला विनंती आहे की आमचा हा लेख शेवटपर्यंत वाचा…

FPO म्हणजे म्हणजे नेमकं काय :-

एफपीओ (FPO) ही एक प्रकारची शेतकरी उत्पादक संस्था आहे जी शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करते आणि कंपनी कायद्यांतर्गत रजिस्टर्ड आहे. पीएम किसान एफपीओ योजनेअंतर्गत कृषी संस्थांना प्रोत्साहन दिलं जातं.

या योजनेच्या माध्यमातून संस्थांना सरकारकडून 15 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार जाते.आता देशातील शेतकऱ्याला शेती व्यवसायाप्रमाणे नफा मिळणार आहे. PM किसान FPO योजनेचा लाभ घेण्यासाठी किमान 11 शेतकर्‍यांना संघटित करून त्यांची कृषी कंपनी स्थापन करावी लागणार आहे. एफपीओ संघटनांनाही सरकारकडून कंपनीला दिलेले सर्व फायदे दिले जातील. या योजनेंतर्गत दिलेली रक्कम टप्प्याटप्याने थेट कृषी कंपनीच्या अकाउंट वर ट्रान्सफर करण्यात येते. या योजनेच्या माध्यमातून देशात 2019-20 ते 2023-24 या पाच वर्षांच्या कालावधीत 10,000 FPO तयार करण्याचे सरकारने लक्ष्य ठेवलं आहे.

PM किसान FPO योजना 2022 चा (PM Kisan FPO) उद्देश :-

देशात असे अनेक शेतकरी आहेत ज्यांची आर्थिक स्थिती ठीक नाहीये, त्यांना शेतीतून फारसा फायदा मिळत नाही, या शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने ही पीएम किसान एफपीओ योजना 2022 (PM Kisan FPO) सुरू केली. या योजनेद्वारे, केंद्र सरकारने केंद्र सरकारकडून 15 – 15 लाख रु आर्थिक मदत दिली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश कृषी क्षेत्राला प्रगत करणे हा आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून शेतकऱ्यांच्या हिताचे काम करणे हा आहे. या प्रधानमंत्री किसान एफपीओ योजना 2022 च्या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांना व्यवसायाप्रमाणेच फायदा होणार आहे…

आत्तापर्यंत देशात किती FPO ची झाली स्थापना :-

केंद्र सरकारने 2023-24 पर्यंत देशभरात 10,000 शेतकरी उत्पादक संघटना (FPOs) स्थापन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यामध्ये केंद्र सरकार प्रत्येक तालुक्यात एक FPO उघडणार आहे. आतापर्यंत देशातील विविध राज्यांमध्ये सुमारे 6419 FPO उघडण्यात आले आहेत. यापैकी अनेक FPO खूप यशस्वीही झाले आहेत. 2020 मध्ये, 10,000 शेतकरी उत्पादक संघटनांच्या निर्मिती आणि प्रोत्साहनासाठी केंद्रीय क्षेत्र योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेसाठी 6865 कोटी रुपये खर्च होणार आहेत.

क्र.सं      राज्य   FPO ची संख्या
1 कर्नाटक 551
2 मध्य प्रदेश 534
3 महाराष्ट्र 524
4 आंध्र प्रदेश 364
5 असम 148
6 बिहार 335
7 गुजरात 259
8 हरियाणा 175
9 हिमाचल प्रदेश 150
10 झारखंड 227
11 केरल 163
12 ओडिशा 394
13 . पंजाब 115
14 राजस्थान 323
15 तमिलनाडु 395
16 तेलंगाना 436
17 उत्तराखंड 142
18 उत्तर प्रदेश 416
19 पश्चित बंगाल 402

पीएम किसान एफपीओ योजनेतील प्रमुख तथ्ये :-

केंद्र सरकारने PM किसान FPO योजना सुरू केली आहे.
FPO चा फुल फॉर्म म्हणजे (Farmer Producer Organization) आहे.
ही एक अशी संस्था आहे ज्याचे सदस्य शेतकरी आहेत.
SPO च्या माध्यमातून शेतकऱ्यांना तांत्रिक,मार्केटिंग, कर्ज, प्रोसेस, सिंचन इ. सुविधा पुरविल्या जातात.
या योजनेद्वारे शेतकरी 15 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेऊ शकतात.
भारतीय कंपनी कायद्यांतर्गत एफपीओचे (FPO) रजिस्ट्रेशन करता येते.
याशिवाय बियाणे, खते, यंत्रसामग्री, मार्केट लिंकेज, प्रशिक्षण, नेटवर्किंग, आर्थिक मदत आदी सुविधाही या संस्थेमार्फत शेतकऱ्यांना पुरविल्या जातात.
शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करणे हे या संस्थेचे ध्येय आहे.
ही संस्था शेतकऱ्यांना उत्पादन वाढवण्यासाठीही मदत करते.
या योजनेअंतर्गत प्रत्येक तालुकास्तरावर एक एफपीओ (FPO) असावा असं ध्येय आहे.

1 हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी शेतजमिनीवर मालकी हक्क असलेल्या शेतकऱ्यांसाठी PM किसान FPO योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेला 5 वर्षे पूर्ण झाल्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी 15,0000 रुपयांपर्यंतची आर्थिक मदत कर्जाच्या स्वरूपात दिली जाते.

2023-24 पर्यंत या योजनेअंतर्गत 10,000 FPO गट तयार करण्याची घोषणा सरकारने केली आहे. हा गट सरकार आणि तिची स्वायत्त संस्था SFAC इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने स्थापन केला जाईल. केंद्र सरकारने 10000 SPO साठी 4496 कोटींची तरतूद केली आहे…

याशिवाय 2027-28 पर्यंत 2370 कोटी रुपयांची अतिरिक्त आर्थिक मदत देण्याचे उद्दिष्टही सरकारकडून ठेवण्यात आले आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना 2027-28 पर्यंत एकूण 6886 कोटी रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पादनातही वाढ होऊन ते आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावं हा या योजनेचा उद्देश आहे.

शेतकऱ्यांना जास्त व्याज द्यावे लागणार नाही..

पीएम किसान एफपीओ योजनेचा लाभ मिळवू इच्छिणारे सर्व शेतकरी अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. या योजनेशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकता. 1800 270 0224 हा टोल फ्री क्रमांक आहे. या योजनेचा लाभ सर्व अल्पभूधारक शेतकऱ्यांना मिळू शकतो. या योजनेच्या माध्यमातून शेतकरी सावकारांपासून वाचू शकणार आहेत. शेतकर्‍यांनी पात्रता निकष पूर्ण केल्यास शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी 11 इच्छुक शेतकर्‍यांचा गट तयार करावा लागेल. 11 शेतकऱ्यांचा हा गट एफपीओ म्हणून काम करेल…

पीएम किसान एफपीओ (FPO) योजनेची पात्रता :-

अर्जदार हा व्यवसायाने शेतकरी असावा.
अर्जदार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
पठारी भागातील FPOमध्ये किमान 300 सदस्य असावेत.

डोंगराळ भागातील एका SPO मध्ये किमान 100 सदस्य असावेत.

FPO कडे स्वतःची लागवडीयोग्य जमीन असणे बंधनकारक आहे आणि समूहाचा भाग असणे देखील बंधनकारक आहे.

FPO योजनेची महत्वाची कागदपत्रे :-

आधार कार्ड
पत्त्याचा पुरावा
जमिनीची कागदपत्रे
शिधापत्रिका
उत्पन्न प्रमाणपत्र
बँक खाते डिटेल्स
पासपोर्ट आकाराचे 2 फोटो..
मोबाईल नंबर

किसान एफपीओ योजनेची वैशिष्ट्ये :-

केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी सांगितले की, केंद्र सरकार 10,000 नवीन शेतकरी उत्पादक संघटना स्थापन करणार आहे. 2024 पर्यंत यासाठी 6865 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. प्रत्येक एफपीओ (FPO) शेतकऱ्याला ५ वर्षांसाठी सरकारी मदत दिली जाईल. या शेतकरी संस्थेचे काम पाहून केंद्र सरकार 15 लाख रुपयांची मदत देणार आहे.

पीएम किसान एफपीओ (FPO) योजनेअंतर्गत अर्ज करण्याची प्रोसेस :-

सर्वप्रथम तुम्हाला राष्ट्रीय कृषी बाजाराच्या ऑफिशिअल वेबसाईट वर जावे लागेल.
आता तुमच्या समोर होम पेज ओपन होईल.
होम पेजवर तुम्हाला FPO च्या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल.
त्यानंतर तुम्हाला ‘Registration’च्या ऑप्शन वर क्लिक करावं लागेल.
आता तुमच्या समोर ‘Registration’ फॉर्म उघडेल.

आपल्याला फॉर्ममध्ये खालील माहिती प्रविष्ट करणे आवश्यक आहे…

रजिस्ट्रेशन टाइप
रजिस्ट्रेशन लेवल
पूर्ण नाव
लिंग
पत्ता
जन्मतारीख
पिन कोड
जिल्हा
फोटो आयडी प्रकार
मोबाईल नंबर
ई – मेल आयडी
कंपनीचे नाव
राज्य
तहसील
फोटो आयडी क्रमांक
पर्यायी मोबाईल नंबर
परवाना क्र.
कंपनी रजिस्ट्रेशन
बँकेचे नाव
खातेधारकाचे नाव
बँक खाते क्रमांक
IFSC कोड

यानंतर, तुम्हाला स्कॅन केलेले पासबुक किंवा रद्द केलेला चेक आणि आयडी प्रूफअपलोड करावा लागेल.
आता तुम्हाला Submitted ऑप्शनवर क्लिक करावं लागेल.
अशा प्रकारे तुम्ही FPO योजनेअंतर्गत अर्ज करू शकाल…

लॉगिन (Login) प्रोसेस :- 

सर्वप्रथम तुम्हाला राष्ट्रीय कृषी बाजाराच्या ऑफिशिअल वेबसाईट वर जावे लागेल
आता तुमच्या समोर होम पेज ओपन होईल.
त्यानंतर तुम्हाला FPO च्या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.
आता तुम्हाला Login ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.
यानंतर, तुमच्या समोर (Login form) येईल.
आता तुम्हाला युजरनेम, पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकावा लागेल.
त्यानंतर तुम्हाला लॉगिन पर्यायावर क्लिक करावे लागेल.
अशा प्रकारे तुम्ही लॉगिन करू शकाल…