Take a fresh look at your lifestyle.

वकिलाविना तुम्ही स्वतः जमिनीची नोंदणी (Registry) कशी कराल, मुद्रांक शुल्क कसं काढाल, किती येईल खर्च ? पहा सर्व A टू Z माहिती….

शेतीशिवार टीम : 18 जुलै 2022 :- How much does land registration cost? : जेव्हा आपण कोणतीही जमीन खरेदी करतो तेव्हा ती नोंदणी करण्यापूर्वी लक्षात येते की, नोंदणीसाठी किती खर्च येईल ? बरेच लोक यासाठी वकिलाचा सल्ला घेतात, ही खूप चांगली गोष्ट आहे. परंतु आपण स्वतः देखील अंदाज लावू शकता की, नोंदणीमध्ये (registration) किती पैसे खर्च केले जाऊ शकतात ? हे जर माहिती नसेल तर तुम्हाला फसवणुकीला सामोरं जावं लागू शकतं. यासाठी तुम्हाला याबाद्दल माहित असणे आवश्यक आहे.

आता राज्यांच्या महसूल विभागाने मुद्रांक शुल्क आणि नोंदणीची (Stamp Duty and Registration) अधिकृत वेबसाइट उपलब्ध करून दिली आहे. ज्या वेबसाइटच्या मदतीने तुम्ही घरबसल्या कोणत्याही जिल्ह्यातील जमिनीच्या रजिस्ट्रीची ऑनलाइन किंमत पाहू शकता. पण बहुतेक लोकांना त्याची माहिती नसते. त्यामुळे जमिनीची नोंदणी करण्यासाठी किती पैसे लागतात? याबद्दलची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत, चला तर मग सुरुवात करूया…

जमिनीची नोंदणी करण्यासाठी किती येतो खर्च ? 

जमिनीच्या नोंदणीमध्ये खर्च होणारा मुख्य खर्च म्हणजे मुद्रांक शुल्क (Stamp duty charge) म्हणजेच सरकार तुमच्याकडून जमिनीच्या रजिस्ट्रीची किंमत मुद्रांकाद्वारे घेते. वेगवेगळ्या जमिनीनुसार वेगवेगळे मुद्रांक शुल्क आकारले जाते.

उदाहरणार्थ, जर तुम्हाला गावात जमीन खरेदी करण्यासाठी कमी शुल्क आकारले जाते आणि शहरात जमीन खरेदी करण्यासाठी अधिक शुल्क द्यावे लागेल. हे मुद्रांक शुल्क आकारणी त्या जमिनीच्या सर्कल रेटनुसार किंवा जमिनीच्या सरकारी दरानुसार भरावी लागते. ते खालील मुद्द्यानुसार समजून घेऊया :-

तुम्ही गावात जमीन खरेदी केल्यास, तुम्हाला सर्कल रेटच्या किंवा जमिनीच्या सरकारी दराच्या 4-5% मुद्रांक शुल्क भरावे लागेल. समजा एखाद्या जमिनीचा सर्कल रेट 1 लाख असेल तर तुम्हाला 5 हजार रुपये मुद्रांक शुल्क भरावे लागेल.

शहरात जमीन खरेदी करताना सर्कल रेटच्या 6-7% मुद्रांक शुल्क भरावे लागते. समजा एखाद्या जमिनीचा सर्कल रेट 1 लाख असेल तर तुम्हाला 7 हजार रुपये मुद्रांक शुल्क भरावे लागेल.

ग्रामीण भागातील महिलेच्या नावावर जमीन खरेदी करण्यासाठी 4% फी भरावी लागेल. म्हणजेच कोणत्याही जमिनीचा सर्कल रेट 1 लाख असेल तर तुम्हाला 4 हजार रुपये मुद्रांक शुल्क भरावे लागेल.

शहरी भागातील महिलेच्या नावावर नोंदणी करण्यासाठी 6% मुद्रांक शुल्क भरावे लागते. म्हणजेच कोणत्याही जमिनीचा सर्कल रेट 1 लाख असेल तर तुम्हाला 6 हजार रुपये मुद्रांक शुल्क भरावे लागेल.

मुद्रांक शुल्काबरोबरच काही किरकोळ खर्चही आहेत. उदाहरणार्थ, पेपर तयार करण्यासाठी लागणारा खर्च, रजिस्ट्रीसाठी वकिलाची फी इ…

तुम्हाला वर नमूद केलेल्या मुद्द्यांवरून हे समजलं असेल की, मुद्रांक शुल्क (Stamp duty charge) हा रजिस्ट्री पूर्ण करण्याचा मुख्य खर्च आहे. आणि ही फी त्या जमिनीच्या सर्कल रेट किंवा सरकारी दरानुसार ठरवली जाते.

आता तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच येत असेल की, आपण जी जमीन विकत घेत आहोत त्याचा सर्कल रेट कसा कळणार ? चला तर मग आपण याबद्दलही जाणून घेउया…

जमिनीचा सर्कल रेट किंवा सरकारी दर त्याला आपल्या राज्यात (रेडी रेकनर दर) म्हणतात तो कसा कळणार ?

या आधी आपण हा रेडी रेकनर दर कसा पाहायचा याबद्दल माहिती पहिली आहे ती खालीलप्रमाणे…

शासनाने निश्चित केलेलं तुमच्या जमिनीचा रेडी रेकनर रेट ऑनलाईन फक्त 2 चं मिनिटात पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा

शेतकऱ्यांनो, आता फक्त 100 रुपयात करा जमिनीची वाटणी ; पहा कागदपत्रे, PDF फॉर्म आणि अर्ज ऑनलाईन प्रोसेस पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा