Take a fresh look at your lifestyle.

Pune : खराडीत IT Hub मुळे 10 वर्षांत कायापालट! बेरोजगारांचा ओढा वाढला, फ्लॅटचे दर 25 लाखांपासून पुढे, खरेदी करण्यासाठी करा क्लिक..

आयटी हबमुळे पुणे शहराच्या पूर्व भागातील खराडी गावाची गेल्या 12-15 वर्षांत ओळख पार बदलून गेली. नामांकित बांधकाम व्यावसायिकांचे मोठमोठे प्रकल्प उभे राहिल्याने व्यावसायिक प्रकल्पासह निवासी सदनिकांची निर्मिती मोठ्या प्रमाणात झाली. गेल्या 12-15 वर्षांत जगभरातील नामांकित कंपन्यांची कार्यालये येथे आली आहेत.

त्यामुळे स्थानिकांसह राज्यभरातील तरुणांना येथे रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीयांचा ओढा खराडीकडे अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र आहे.

पुणे (लोहगाव) आंतरराष्ट्रीय विमानतळापासून खराडी अगदी दोन किलोमीटर अंतरावर आहे. अनेक आयटी कंपन्यांच्या उपस्थितीमुळे या परिसराला व्यावसायिकांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. खराडीलगत मगरपट्टा केशवनगर आणि यांसारखी व्यावसायिक केंद्र मुंढवा जवळच असल्यानेदेखील गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय बनला असल्याने मोठी गुंतवणूक होत आहे.

खराडी परिसरातून पुणे – अहमदनगर हा राष्ट्रीय महामार्ग जात आहे. तर, पाच किलोमीटरवर पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्ग, लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळ तसेच पुणे रेल्वे स्टेशन अगदी हाकेच्या अंतरावर असल्याने रस्त्यांचे जाळे चांगले आहे.

पुणे रेल्वे स्टेशन खराडीपासून फक्त किलोमीटर अंतरावर आहे. आता मेट्रोचे जाळेदेखील पुणे शहरात निर्माण होत आहे त्यामुळे नगर रस्त्यावर महामेट्रोलाइनचे वनाज ते रामवाडी (वैकफिल्ड चौक) पर्यंत काम पूर्ण झाले आहे येत्या काही दिवसांत बंडगार्डन रुबी हॉल ) ते रामवाडी मेट्रोदेखील सुरू होणार आहे. रामवाडी ते वाघोली (10 किमी) मेट्रोचे काम लवकरच सुरू होणार आहे.

परिणामी, खराडी परिसरातील कनेक्टिव्हिटी नेटवर्क आणखी सुधारणार आहे. खराडी परिसर पूर्व पुण्याचे आयटी हब आहे. मगरपट्टा शहराच्या जवळ असल्यामुळे खराडीमधील बहुतांश घरांची मागणी या भागात काम करणाऱ्या आयटी प्रोफेशनलकडून होत आहे. पुणे शहराच्या या भागात आपले पहिले घर घेण्यासाठी किंवा शोधणाऱ्यांसाठी, उत्तम परतावा मिळत असल्याने उच्च जीवनशैली जीवन जगण्यासाठी सर्व सुविधा खराडीमध्ये उपलब्ध होत आहेत.

खराडीमध्ये रेडिरेकनरचा दर काय ?

खराडीमध्ये काही भागामध्ये रेडिरेकनरचा दर हा वेगवेगळा आहे. खराडी गावठाण, थिटेवस्ती, राजाराम पाटीलनगर, वर्ल्ड ट्रेड सेंटर, ईऑन आयटी पार्क, खराडी बायपास ते हडपसर रस्ता या भागात रेडिरेकनरचा दर वेगवेगळा आहे. साधारणपणे 4,000 ते 10,000 रुपयांचा दर आहे.

खराडीमध्ये फ्लॅटचा दर काय ?

1 बीएचके – 35 ते 50 लाख रुपये
2 बीएचके – 50 लाख ते 1 कोटी रुपये
3 बीएचके – 80 लाख ते दीड कोटी रुपये
4. बंगलो रो – हाउसेस – 1 कोटी ते 2.5 कोटी रुपये

फ्लॅट खरेदीसाठी खालील लिंक पहा..

andromeda-realty.com

puravankara.com

kumarworld.com 

reliantinfraspace.in