Take a fresh look at your lifestyle.

भाडेकरारासाठी मुद्रांक शुल्क विभागाची राज्यभरात 2.0 प्रणाली सुरु ; पहा ऑनलाइन करारनामासाठी थेट लिंक..

राज्याच्या नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाकडे भाडेकरार (लिव्ह ॲण्ड लायसन्स) नोंदवण्याची 1.9 ही प्रणाली कार्यरत असून, ती जुनी झाल्याने सातत्याने तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे ‘लिव्ह ॲण्ड लायसन्स 2.0’ ही प्रणाली विकसित केली आहे.

या प्रणालीची अंमलबजावणी राज्यात मुंबईतून जानेवारीत करण्यात येणार आहे. त्यानंतर टप्प्याटण्याने प्रत्येक जिल्ह्यातही प्रणाली सुरू केली जाणार आहे या नव्या प्रणालीवर राज्यभरातून 700 सूचना प्राप्त झाल्या आहेत.

राज्यात दरवर्षी दहा लाखांपेक्षा जास्त ऑनलाइन भाडेकरार नोंद होतात भाडेकरू नियंत्रण कायदा 1999 च्या कलम 55 नुसार ऑनलाइन भाडेकरारांच्या दस्ताची नोंदणी करणे अनिवार्य आहे मात्र भाडेकरार नोंदवण्याची 1.9 ही प्रणाली सध्या कार्यरत असून, ती जुनी झाल्याने सातत्याने तांत्रिक अडचणी येत आहेत.

नवीन प्रणाली https://igrmaharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली होती केवळ अभिप्राय जाणून घेण्याकरिता प्रणाली उपलब्ध केल्यानंतर नागरिकांचे त्यावर 700 अभिप्राय नोंदणी विभागाला प्राप्त झाले आहेत.योग्य अभिप्राय सूचनांनुसार प्रणालीत सुधारणा करण्यात यणार आहे.

याबाबत बोलताना नोंदणी उपमहानिरीक्षक (संगणक) अभिषेक देशमुख म्हणाले, ही प्रणाली राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राने (नॅशनल इन्फॉरमेटिक्स सेंटर – एनआयसी) तयार केली आहे. प्रणालीचे सुरक्षाविषयक लेखापरीक्षण केंद्र सरकारची मान्यता असलेल्या संस्थांपैकी एका संस्थेकडून कोडच्या करण्यात येणार आहे. त्यानंतर डिसेंबर महिन्यात राज्यभरातील दुय्यम निबंधकांना नव्या प्रणालीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

नव्या वर्षात जानेवारीला मुंबईतून नव्या प्रणालीच्या अंमलबजावणीला सुरुवात होईल त्यानंतर राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने प्रणाली सुरू करण्यात येईल. या प्रणालीअंतर्गत भाडेकरार नोंदवल्यानंतर त्याची माहिती क्राईम ॲण्ड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क आणि सिस्टिम्स (सीसीटीएनएस) या पोलिसांच्या संगणक प्रणालीत आपोआप माहिती मिळणार आहे.

प्रत्येक पोलीस ठाण्यासाठी सांकेतिक क्रमांक देण्यात आल्याने स्थानिक पोलिसांना तातडीने भाडेकरारांची माहिती मिळेल. परिणामी, भाडेकराराची प्रत प्रत्यक्ष पोलीस ठाण्यात नेऊन देण्याची गरज राहणार नाही.

नव्या प्रणालीची वैशिष्ट्ये..

आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय जेनेरिक दस्तऐवज नोंदणी प्रणालीवर आधारित शुल्क आकारणीसाठी ‘पेटू आयजीआर’ या नवीन विकसित प्रणालीचा वापर केल्याने शूल्क भरणे सुलभ..

पोलीस विभागाच्या सीसीटीएनएस प्रणाली सोबत संलग्नता भाडेकरूंची माहिती पोलीस ठाण्यात जाऊन देण्याची गरज नाही.

वेगवान पद्धतीने दस्त नोंदणी करता येणे शक्य

क्यूआर कोडच्या माध्यमातून दस्ताची खात्री पटवणे शक्य

टोकन ट्रॅकिंग सिस्टिमचा वापर..

भाडेकरारासाठी अशी करा नोंदणी प्रक्रिया..

नोंदणी आणि मुद्रांक विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

लिंक :- https://efilingigr.maharashtra.gov.in/ereg/

New Entry वर जा, आणि मालमत्ता जेथे आहे तो जिल्हा निवडा.

थंब स्कॅनर वापरून अंगठ्याचा ठसा घ्या आणि पासवर्ड तयार करा..

यांनंतर पुढील स्टेप फॉलो करून भाडेकराराची नोंद करा.