Take a fresh look at your lifestyle.

Maharashtra Rain : राज्यातील ‘या’ 7 जिल्ह्यांत गारपीटीसह भयंकर पाऊस! आणखी 5 दिवस हवामान खात्याकडून अलर्ट जारी..

राज्यात मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात पाऊस – गारपिटीने चांगलंच झोडपून काढलं आहे. वादळी पावसाने सर्वत्र शेतीपिकांचे नुकसान झालं आहे परंतु शेतकऱ्यांना अजूनही या अवकाळी पावसाचा सामना करावा लागणार आहे. हवामान विभागाने, राज्यात अजून पाच दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे.

10-11-12-13 एप्रिल रोजी बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात विजांच्या कडकटांसह गारपीटीचा इशारा दिला असून

तर उर्वरित विदर्भ, संपूर्ण मराठवाडा, संपूर्ण खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील नगर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला.

12-13 एप्रिल दरम्यान नव्याने मजबूत पश्चिम वारे सक्रिय झाल्यामुळे राज्यात गडगडाटी वादळाच्या हालचाली वाढण्याची दाट शक्यता आहे. 13-14 एप्रिल रोजी या राज्यात जास्तीत जास्त प्रभावामुळे, बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर विभागांमध्ये काही ठिकाणी जोरदार वादळी वाऱ्यांसह 50 ते 60 प्रति किलोमीटर वाऱ्याचा वेग नोंदवला जाऊ शकतो.

तर उर्वरित विदर्भ, संपूर्ण मराठवाडा, जळगाव आणि मध्य महाराष्ट्रातील नगर, सोलापूर, जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. तसेच पुणे, सांगली, सातारा, नाशिक, धुळे आणि नंदूरबाजार जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सरी पडण्याचा अंदाज आहे.

शनिवारी संपूर्ण विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर रविवारी पूर्व विदर्भ आणि मराठवाड्याच्या भागात काही ठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाज आहे. सोमवारीही विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी पाऊस पडू शकतो, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.

उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये पावसासोबत गारपीट..

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 48 तासांत देशातील अनेक राज्यांमध्ये पाऊस आणि गारपीट होऊ शकते. 13 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीर, पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि पश्चिम राजस्थानमध्येही काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. पश्चिम उत्तर प्रदेश आणि पूर्व राजस्थानमध्ये 14 एप्रिल रोजी पाऊस आणि गारपीट होऊ शकते. पूर्व मध्य प्रदेश आणि विदर्भात 11 आणि 12 एप्रिल रोजी पाऊस आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.

डोंगराळ राज्यांमध्ये हिमवृष्टीचा इशारा

हवामान खात्याने सांगितले की, 14 एप्रिल रोजी जम्मू – काश्मीर – लडाख आणि हिमाचल प्रदेशमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. याशिवाय बर्फवृष्टी होण्याचीही शक्यता आहे.

दिल्लीतील आतापर्यंतचा सर्वात उष्ण दिवस

दिल्लीच्या तापमानात सातत्याने वाढ होत आहे. राष्ट्रीय राजधानीतील कमाल तापमान बुधवारी ३९.१ अंश सेल्सिअसवर पोहोचले, जे या वर्षातील आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान आहे. IMD डेटा दर्शविते की दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च कमाल तापमान 9 मार्च रोजी 38 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. आकडेवारीनुसार, बुधवारी दिल्लीचे कमाल तापमान या हंगामाच्या सरासरीपेक्षा चार अंशांनी अधिक होते, तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस नोंदले गेले.

तापमान 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहचणार..

शास्त्रज्ञ आणि प्रादेशिक हवामान केंद्राचे प्रमुख कुलदीप श्रीवास्तव यांनी सांगितले की, या आठवड्यात तापमान 40 अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता आहे, परंतु सध्या उष्णतेची लाट येण्याची शक्यता नाही कारण 13 आणि 14 एप्रिल रोजी दिल्लीत गडगडाट होण्याची शक्यता आहे. . हवामान खात्याच्या कार्यालयाने गुरुवारी दिल्लीत अंशतः ढगाळ आकाश राहण्याचा अंदाज वर्तवला आहे, त्यामुळे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 39 आणि 19 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.