Take a fresh look at your lifestyle.

MHADA Pune Lottery 2023: पुण्यात आता फक्त 8 लाखांत मिळणार स्वतःचं घर ! 5,863 घरांसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरु..

म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे, पिंपरी – चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर, सांगली येथील विविध गृहनिर्माण योजनेंतर्गत उभारलेल्या ५८६३ सदनिकांच्या विक्रीकरता १८ ऑक्टोबर २०२३ रोजी आयोजित संगणकीय सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आला.

म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात आयोजित या कार्यक्रमात बोलताना संजीव जयस्वाल यांनी जाहीर केले की, पुणे मंडळाच्या या सोडतीतील प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेतील म्हाळुगे येथील सदनिकांच्या किमती १० टक्क्यांनी कमी करण्यात आल्या आहेत. यामुळे अधिकाधिक अर्जदारांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तसेच याप्रसंगी पुणे मंडळाच्या अधिकाऱ्यांना सोडत प्रक्रिया सुलभ आणि सुरळीत पार पाडण्याकरता शुभेच्छा दिल्या.

या सोडतीच्या माध्यमातून ५८६३ नागरिकांना हक्काची घरे मिळणार आहेत, त्यामुळे त्यांच्या स्वप्नपूर्तीप्रती आपले उत्तरदायित्व अधिक ठरत असल्याचे जयस्वाल यांनी सांगितले. संगणकीय प्रणालीद्वारे पुणे मंडळ सदनिका विक्रीकरता सोडतीची प्रक्रिया राबवली जात आहे. पुणे मंडळाची सोडत सर्वसामान्य नागरिकांना म्हाडाच्या सुलभ, लोकाभिमुख, प्रशासकीय कार्यप्रणालीची प्रचिती द्यावी, असे निर्देश जयस्वाल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

या वेळी पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी अशोक पाटील, म्हाडाचे सचिव राजकुमार सागर, मुख्य अभियंता -३ शिवकुमार आडे, वित्त नियंत्रक अजयसिंह पवार, मुख्य माहिती व संचार तंत्रज्ञान अधिकारी सविता बोडके, मुख्य जनसंपर्क अधिकारी वैशाली गडपाले आदी उपस्थित होते.

मंगळवारी १२ वाजेपासून ऑनलाइन अर्ज नोंदणीला सुरुवात झाली असून, २६ सप्टेंबर २०२३ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज नोंदणी करण्याचा पर्याय मंडळातर्फे नागरिकांकरता खुला राहणार आहे.

म्हाडा पुणे मंडळाच्या सोडतीत पुणे जिल्ह्यातील ५४२५ सदनिका, सोलापूर जिल्ह्यातील ६९ सदनिका, सांगली जिल्ह्यातील ३२ सदनिका व कोल्हापूर जिल्ह्यातील ३३७ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

या सोडतीत म्हाडा गृहनिर्माण योजनेतील ४०३ सदनिका, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अतगत ४३१ सदनिका, २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत २५८४ सदनिका प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेंतर्गत २४४५ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

5 लाखांपासून ते 1.11 कोटी रुपयांपर्यंत घरे विकले जात आहेत. 5,863 परवडणाऱ्या घरांपैकी 2,445 प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्याच्या आधारावर घरे मिळणार आहे.

घरे 1 RK, 1 BHK, 2 BHK आणि 3 BHK च्या कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्ध आहेत. सर्वात लहान घर 204 चौरस फूट कार्पेट क्षेत्रफळाचे आहे आणि सर्वात मोठे 1,087 चौरस फूट कार्पेट क्षेत्रफळाचे आहे. सर्वात स्वस्त अपार्टमेंट, सुमारे 312 चौरस फूट कार्पेटचे आहे, ज्याची किंमत कोल्हापूर जिल्ह्यातील कागल शहरात आहे..

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :-

मोबाइल नंबर (नंबर हा आधारशी लिंक असावा.)

ईमेल आयडी

आधार कार्ड
पॅन कार्ड

विवाहित असल्यास पती / पत्नीचे आधार कार्ड

विवाहित असल्यास पती / पत्नीचे पॅन कार्ड

महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र

अर्जदाराचा स्वतःचा उत्पन्न पुरावा

अर्जदाराची पती / पत्नी नोकरी / व्यवसाय करीत असल्यास त्यांचा उत्पन्न पुरावा

तहसिलदार उत्पन्न प्रमाणपत्र असल्यास ( अर्जदार किंवा त्यांची पती / पत्नी यापैकी कोणाही एकाचे)

जात प्रवर्गातील आरक्षण

विशेष आरक्षित प्रवर्ग

अर्ज कसा कराल ?

अर्जदारांना 12 ऑक्टोबर रोजी दुपारी 3.00 वाजेपर्यंत ऑनलाइन दावे आणि बदल सादर करण्याची संधी आहे. सोडतीसाठी स्वीकारलेल्या अर्जांची अंतिम यादी 16 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 07:00 वाजता म्हाडाच्या वेबसाइटवर उघड केली जाणार आहे.

अर्ज लिंक :- https://housing.mhada.gov.in