Take a fresh look at your lifestyle.

BREAKING : खुशखबर ! शेतकऱ्यांच्या खात्यात 50000 रु. उद्यापासून होणार जमा ; लाभार्थी याद्याही आल्या, ‘या’ ठिकाणी चेक करा आपलं नावं !

शेतीशिवार टीम : 14 सप्टेंबर 2022 : आपल्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये शासनाच्या माध्यमातून 50 हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान वितरित केलं जाणार आहे. या आधी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेना बंडखोर – भाजप सरकारकडून विधिमंडळात 25 हजार 826 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या. यात 27 जुलै 2022 रोजी शासन निर्णय घेऊन महात्मा जोतिबा फुले कर्जमाफी योजनेंतर्गत 50 हजार रुपयांच्या अनुदानासाठी 4 हजार 700 कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आली होती. 

त्याबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून 15 सप्टेंबर 2022 पासून शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हे प्रोत्साहनपर अनुदान म्हणजे 50 हजार रुपयांची रक्कम वितरीत केले जाणार अशा प्रकारची माहिती देखील दिली होती.

आणि आता सर्व शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली होती ती म्हणजे मी पात्र होणार की अपात्र ? यामध्ये सर्वात महत्वाचा भाग होता तो म्हणजे या योजनेच्या लाभार्थी याद्या…

आणि या लाभार्थी याद्या साधारणपणे 8 सप्टेंबर पासून प्रकाशित केल्या जातील अशा प्रकारची माहिती देण्यात आली होती. मात्र, बँकेच्या माध्यमातून 8 तारखेपासून 12 तारखेपर्यंत या याद्या व्हेरिफाय करून 13 सप्टेंबर 2022 पासून शेतकऱ्यांसाठी प्रकाशित केल्या जातील, अशा प्रकारची माहिती देखील प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली होती.

आणि आता दिलेल्या माहितीनुसार, या लाभार्थी याद्या प्रकाशित करायला सुरुवात झालेली असून या याद्या बँकेच्या माध्यमातून बँकेच्या मुख्यालयाच्या ठिकाणी ज्या ठिकाणी आपली ब्रांच असेल त्या ठिकाणी, याचबरोबर सोसायटीच्या माध्यमातून आपल्या गावाच्या ठिकाणी याद्या प्रकाशित करण्यात आल्या आहेत.

ही योजना राबवत असताना 27 जुलै 2022 नुसार या योजनेची अंमलबजावणी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना (mjpsky karjmafi list 2022) च्या पोर्टलच्या माध्यमातून ज्या प्रमाणे करण्यात आली त्याच प्रमाणे करण्यात येईल अशी माहिती देण्यात आलेली आहे.

त्यामुळे हे 50 हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान वितरीत करत असताना सुद्धा तीच प्रक्रिया पार पाडली जाईल, अशा प्रकारची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 चे mjpsky.maharashtra.gov.in या पोर्टल वर याद्या प्रकाशित होतील. यावर काही अपडेट आलं तर ते आपण पाहणारच आहोत.

परंतु तोपर्यंत आपण ज्या बँकेचे ग्राहक आहात त्या ठिकाणी जाऊन तसेच सोसायटीच्या माध्यमातून कर्ज परतफेड करत असला तर त्याठिकाणी जाणून संपर्क साधावा अन् आपलं नाव यादीत आहे की नाही ते पाहावं. आणि हे अनुदान 15 सप्टेंबर म्हणजे उद्या गुरुवारपासून खात्यावर क्रेडिट व्हायला सुरुवात होणार आहे.

BREAKING : शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता ! ‘या’ दिवशी खात्यात जमा होणार 50,000 रुपये ; प्रोत्साहनपर अनुदानासाठी 4700 कोटींचा निधी मंजूर, पहा…