Take a fresh look at your lifestyle.

21 व्या शतकातील भारत : देशातला सर्वात मोठा सागरी पूल होणार खुला; दिड तासांचा प्रवास फक्त 20 मिनिटांत, पहा असा आहे Road Map..

देशातील सर्वात मोठा सागरी पूल ज्याला मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL), शिवडी – न्हावा शेवा ट्रान्स हार्बर लिंक असेही म्हटले जाते, हा एक अंडर -कंस्ट्रक्शन सागरी पूल आहे जो मुंबईला – नवी मुंबईशी जोडला आहे. या सागरी पुलाचे अधिकृत नाव “श्री अटल बिहारी वाजपेयी ट्रान्स हार्बर लिंक” असे ठेवण्यात आलं आहे. या 21.8 किमी लांबीच्या सुंदर पुलाबद्दल एक ताजे आणि मोठे अपडेट आले आहे की, तो आता लवकरच सर्वसामान्यांसाठी खुला होणार आहे.

1 तासाचा प्रवास अवघ्या 20 मिनिटांत होणार पूर्ण..

टाईम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, एकूण 21.8 किमी लांबीच्या MTHL पैकी 16 किमी लांबीचा भाग समुद्राच्यावर आहे. जो मुंबईला नवी मुंबईशी जोडला आहे. वाशी पुलावरून 1.30 तासाचा प्रवास अवघ्या 20 मिनिटांत होणार आहे. विशेष बाब म्हणजे MTHL ब्रिज मुंबई – गोवा महामार्ग, मुंबई – पुणे द्रुतगती मार्ग, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ तसेच जेएनपीटी बंदर यांना उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी प्रदान करणार आहे.

सेंट्रल मुंबईतील शिवरीहून नवी मुंबईतील शिवाजी नगरला या पुलावरून अवघ्या 20 मिनिटांत पोहचता येणार आहे. पूर्वी हे अंतर कापण्यासाठी दीड तास लागत होता. मुंबई ट्रान्स हार्बर लिंकद्वारे (MTHL) पुणे, गोवा आणि बेंगळुरूचे अंतरही कमी होईल, मीडिया रिपोर्ट्सनुसार, आता हा पूल 25 डिसेंबर 2023 रोजी उघडला जाणार असून पूल पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर, या पुलावरून एका दिवसात 70,000 वाहने धावतील.

22Km साठी तब्बल 18000 कोटींचा खर्च..

अहवालानुसार, पुलावर ओपन रोड टोलिंग (ORT) सिस्टीम देखील असेल, ज्यामुळे वाहनांना टोल बूथवर वेग वाढवण्याची गरज भासणार नाही. 100 किमी प्रतितास वेगाने टोलमधून जात असताना टोल शुल्क भरले जाऊ शकते. या पुलावरून दररोज सुमारे 70 हजार वाहनांची ये – जा अपेक्षित आहे. हा पूल 18,000 कोटी रुपये खर्चून बांधला जात आहे.

मुंबई ट्रान्स हार्बर लिंकची वैशिष्ट्ये :-

पुलावर बसवलेले 1212 लाइटिंग पोल खोल समुद्रातील हवामानाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी डिझाइन केले आहेत. हे दिवे केंद्रीय नियंत्रण आणि देखरेख प्रणाली (CCMS) ने सुसज्ज आहेत आणि कठोर वातावरणातही ते आरामात चालतील. या लाइटिंग खांबांवर पॉलीयुरेथेनचा लेप करण्यात आला आहे, ज्यामुळे ते गंजण्यापासून वाचतील आणि त्यांना दीर्घायुष्य मिळेल. याव्यतिरिक्त, विजेच्या खांबांवर विजेमुळे होणारे संभाव्य धोके टाळण्यासाठी वीज संरक्षण प्रणाली देखील असणार आहे.

रिव्हर्स सर्कुलेशन ड्रिलिंग :-

भारतात पहिल्यांदाच या टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. पाइल फाउंडेशनमध्ये वर्टिकल ड्रिलिंग पद्धत वापरली जाते. यामध्ये मोठा आवाज होत असून आजूबाजूच्या वातावरणावरही परिणाम होत आहे. याच कारणामुळे शिवडी मडफ्लॅटमधील या प्रकल्पाला पर्यावरणप्रेमींनी विरोध केला होता. गेल्या काही वर्षांपासून या भागात फ्लेमिंगोचे मोठ्या प्रमाणात आगमन होत आहे. रिव्हर्स सर्क्युलेशन ड्रिलिंगमुळे स्थलांतरित पक्ष्यांच्या संख्येत कोणताही फरक पडला नसल्याची माहिती एमएमआरडीएने दिली आहे.