Take a fresh look at your lifestyle.

नांदेड – बिदर नवीन ब्रॉडगेज प्रकल्पाला वेग, 157Km अंतरात हे आहेत 14 स्टेशन्स, या गावांतून जाणार रूट, पहा डिटेल्स..

महाराष्ट्रातील संभाजी नगर येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारने विविध योजनांना मंजुरी दिली आहे. मराठवाड्यासाठी तब्बल 59 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. त्यापैकी 14 हजार कोटी रुपये सिंचन प्रकल्पासाठी मंजूर झाले आहेत. त्याद्वारे नद्या जोडण्याचे काम केले जाणार आहे. बैठकीत संभाजी नगर व धाराशिव जिल्ह्याची अधिकृत नावेही देण्यात आली..

समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यासाठी 14 हजार कोटी रुपये वापरण्यात येणार आहेत. यामध्ये 13 हजार कोटी रुपये खर्च होणार असल्याचा अंदाज आहे. सार्वजनिक कामांसाठी 12938 कोटी रुपये दिले आहेत. 1608 कोटींची योजना, कृषी विभागासाठी 709 कोटी पर्यटनासाठी पैठण संत ज्ञानेश्वर उद्यान आणि शहरातील 3 प्राचीन पुलांसाठी 95 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे..

नांदेड – बिदर नवीन ब्रॉडगेज प्रकल्पाला वेग देण्यासाठी राज्य शासनाच्या हिश्शाच्या 750 कोटींच्या खर्चास मान्यता देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या नवीन ब्रॉडगेज मार्गासाठी जमिनीच्या किमतीसह 150 कोटी 98 लाख इतका खर्च येणार असून त्याच्या 50 टक्के म्हणजे 750 कोटी 49 लाख इतका राज्य शासनाचा आर्थिक सहभाग असणार आहे.

राज्याच्या ग्रामीण आणि अविकसित भागात रेल्वे प्रकल्पांना गती मिळावी, यासाठी निवडक प्रकल्पात 40 ते 50 टक्के खर्च उचलण्याचे धोरण राज्य शासनाने स्वीकारले आहे. बिदर – नांदेड हा 157 किमी नवीन रेल्वेमार्ग असून त्यापैकी 100 किमी मार्ग महाराष्ट्रातील आहे आणि उर्वरित 57 किमी मार्ग कर्नाटकमध्ये आहे. या सरळ रेल्वेमार्गामुळे बिदर ते नांदेड हे अंतर 145 किमीने कमी होईल. या मार्गावर एकूण 14 रेल्वे स्थानके असतील..

नांदेड – देगलूर – बिदर रेल्वे रूट मॅप आणि स्टेशन्स..

नांदेड, मुगट, आमदुरा, मारतळा, कृष्णूर नायगांव, नरसी, कामरसपल्ली, आदमपूर, खानापूर, देगलूर,करडखेड, मरखेल, हाणेगाव, औराद, संतपूर, धुपत माणगांव, बालूर, हलबर्गा, बिदर