Take a fresh look at your lifestyle.

NLM उदयमित्र ऑनलाइन अर्ज : 2022

शेतीशिवार टीम,12 मार्च 2022 : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शासनाकडून सातत्याने प्रयत्न केले जातात. तसेच अनेकांना रोजगार मिळावा यासाठी शासनाकडून विविध योजना राबविल्या जातात. अशीच एक योजना केंद्र सरकारने सुरु केली आहे. ज्याचे नाव आहे राष्ट्रीय पशुधन अभियान योजना…  

राज्यात असे अनेक नागरिक आहेत, ज्यांना स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा आहे, पण पैशांअभावी ते आपला व्यवसाय सुरू करू शकत नाहीत, मात्र आता त्यांचे स्वप्न नक्कीच पूर्ण होणार आहे. कुकुट पालन योजनेसाठी अर्ज करून आणि कर्जाची रक्कम मिळवून आणि एक छोटा फॉर्म उघडून तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करू शकता…

राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत सुरु असलेल्या या योजनेचा लाभ मिळण्यासाठी सर्व इच्छुक व्यक्ती ऑनलाइन अर्ज भरू शकता. कर्जाची रक्कम कशी मिळवायची, कोणत्या बँकेकडून कर्ज घ्यायचे, कोणती कागदपत्रे लागतील, कोण आपला व्यवसाय सुरू करू शकेल ? याची संपूर्ण माहिती खालील लेखात दिली आहे. त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा….

राष्ट्रीय पशुधन अभियान : 2021 – 22 उद्देश काय आहे ?

केद्र शासनाच्या पशुसवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागामार्फत ही सन 2014-15 या आर्थिक वर्षांपासून राष्ट्रीय अभियान ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येत आहे. राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेची सध्याची गरज लक्षात घेऊन सन 2021-22 पासून राष्ट्रीय पशुधन अभियानाची सुधारित पुनरचना करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय पशुधन अभियानाच्या सुधारित योजनेचा उद्देश रोजगार उद्देश रोजगार निर्मिती उद्योजकता विकास, प्रती पशुची उत्पादकता वाढवणे आणि अशाप्रकारे विकास कार्यक्रम अंतर्गत एका छत्राखाली मांस, बकरीचे दूध, अंडी उत्पादन वाढवणे असा आहे.

या कार्यक्रमाअंतर्गत उत्पादन देश अंतर्गत मागणी पूर्ण केल्यानंतर निर्यात करता येईल. राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेची संकल्पना म्हणजे असंघटित क्षेत्रामध्ये उपलब्ध उत्पादनांसाठी विक्रीकरीता आणि कच्चा माल उपलब्ध होणेकरीता संघटित क्षेत्राशी जोडून उद्योजकता विकास साधणे हा आहे…

तुम्हाला अनुदानाअंतर्गत किती मिळेल रक्कम :-

ग्रामीण कुक्कुट पालनासाठी तब्बल 25 लाख रुपये अनुदान..

ग्रामीण कुक्कुट पालनातुन प्रजाती विकासाद्वारे उद्योजकता विकासासाठी केंद्राकडून तब्बल 25 लाख रुपये 50% अनुदानासह दोन टप्प्यात दिली जाते. परंतु यासाठी कमीत कमी 1,000 अंड्यावरील (लो इनपुट तंत्रज्ञान) कुक्कुट पक्षांचे संगोपन व अंडी उबवणे प्रोजेक्ट असायला हवा. यासाठी 50 % साठी बँकेकडून कर्ज उपलब्ध होऊ शकतं.

शेळी-मेंढी पालनासाठी 50 लाख रुपये अनुदान…

ग्रामीण शेळी-मेंढी पालनातुन प्रजाती विकास द्वारे उद्योजगता विकासासाठी केंद्राकडून तब्बल 50 लाख रुपये 50% अनुदानासह दोन टप्प्यात दिली जाते. परंतु यासाठी 500 शेळ्या / मेंढ्या आणि 25 नर मेंढे गटाची स्थापना करावी लागेल. यामध्ये उर्वरित 50 टक्के हिस्सा बँकेकडून कर्ज किंवा स्वहिस्सा टाकावा लागेल.

शेळी व मेंढीच्या वीर्यमात्रा निर्मितीसाठी विभागीय प्रयोगशाळेची स्थापना करण्याबाबत केंद्राकडून 60% तर राज्याकडून 40% अनुदान मिळत आहे. अजून
केंद्र व राज्यशासनाचे विविध योजनांविषयी माहितीसाठी खालील शासन निर्णयाची PDF पाहावी…

राष्ट्रीय पशुधन अभियानाची उदिष्टे :

1. छोटे रवंथ करणारे प्राणी, कुक्कुट पालन, वराह पालन क्षेत्र आणि वैरण क्षेत्राचा विकास करून रोजगार निर्मिती व उद्योजकता विकास करणे.
2. पशुधनाच्या वंशावळीमध्ये सुधारणा करून प्रती पशुधनाच्या उत्पादन क्षमतेत वाढ करणे .
3. मांस, अंडी, शेळीचे दूध, लोकर आणि वैरण यांच्या उत्पादनात वाढ करणे.

4. वैरण आणि वैरणीची उपलब्धता वाढवून मागणी लक्षणीयरित्या कमी करण्यासाठी चारा बियाणे पुरवठा साखळी मजबूत करणे आणि प्रमाणित चारा बियाप्रयांची उपलब्धता वाढविणे.
5. मागणी पुरवठ्यातील अंतर कमी करण्यासाठी वैरण प्रक्रिया युनिट्स स्थापन करण्यास प्रोत्साहन देणे.
6. शेतकऱ्यांसाठी पशुधन विम्यासह जोखीम व्यवस्थापन उपायांना प्रोत्साहन देणे.

7. कुक्कुटपालन, मेंढी, शेळी, पशुखाद्य आणि वैरण या प्राधान्यकृत क्षेत्रांमध्ये व्यावहारीक संशोधनाला प्रोत्साहन देणे.
8.पशुपालकांना दर्जेदार विस्तार सेवा पुरवण्यासाठी विस्तार यंत्रणा मजबूत करून राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांची आणि पशुधन मालकांची क्षमता वाढविणे.
9. उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आणि पशुधन क्षेत्राचे उत्पादन सुधारण्यासाठी कौशल्य आधारित प्रशिक्षण आणि तंत्रज्ञानाचा प्रसार करणे.

राष्ट्रीय पशुधन अभियानाची पात्रता :-  

उद्योजक संस्थांनी खालील निकष पूर्ण केल्यास उद्योजकता कार्यक्रमांतर्गत लाभ घेण्यासाठी त्यांना पात्र मानले जाईल .

उद्योजक संस्थांनी प्रकल्प संबंधित प्रशिक्षण प्राप्त केलेले असावे किंवा त्यांचेकडे प्रशिक्षित तज्ञ असावेत किंवा त्यांच्याकडे संबंधित क्षेत्राच्या व्यवस्थापनामध्ये आणि प्रकल्पाच्या व्यवस्थापनाच्या संबंधित क्षेत्रात पुरेसा अनुभव असलेले अनुभवी तज्ञ असावेत.

उद्योजक संस्थांना त्यांचे खाते असणाऱ्या शेड्यूल बँकेकडून मान्यताप्राप्त प्रकल्पासाठी कर्ज मंजूरी / कर्ज हमीपत्र / वित्तीय संस्थांची बँक गॅरंटी प्राप्त करून घेणे आवश्यक आहे .

उद्योजक संस्थांकडे प्रकल्पासाठी आवश्यक असणारी स्वतःची जमीन किंवा भाडेपट्टीची जमीन असावी. उद्योजक संस्थांकडे KYC साठी सर्व संबंधित कागदपत्रे असावीत …

राष्ट्रीय पशुधन अभियाना कागदपत्रे :-

अर्जदार व्यक्तीचे आधार कार्ड
रहिवासी प्रमाणपत्राची कॉपी
मतदार ओळखपत्राची फोटो कॉपी
रेशन कार्ड
जमिनीचे कागदपत्रे (7/12)
बँक खाते क्रमांक
मोबाईल नंबर
पासपोर्ट आकाराचा फोटो
प्रोजेक्ट रिपोर्ट

राष्ट्रीय पशुधन अभियानाअंतर्गत अर्ज कसा कराल ?

राष्ट्रीय पशुधन अभियानाअंतर्गत अर्ज करण्यासाठी तुम्ही https://ahd.maharashtra.gov.in/ या वेबसाइटला भेट द्या…

होम पेज वर तुम्हाला 7 व्या नंबरवर तुम्हाला NLM-new या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल. यावर तुम्हाला या योजनेबद्दल सर्व शासन निर्णयाच्या PDF फाईल दिसतील.

या नंतर PDF च्या खाली तुम्हाला 9 व्या नंबरला Click here to apply for NLM Schemes दिसेल.

या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला https://www.nlm.udyamimitra.in/ उदयमित्र ही नवी वेबसाईट ओपन होईल. या व्हेबसाईटला तुम्ही डायरेक्ट सुद्धा भेट देऊ शकता.

यानंतर https://www.nlm.udyamimitra.in/Login  वर जाऊन तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर वर OTP येईल. तो OTP फील करा. या नंतर तुमचा अर्ज फॉर्म तुमच्यासमोर उघडेल.

या फॉर्म मध्ये सर्व माहिती, कोणती कागदपत्रे लागतील ही सर्व माहिती समजून कागदपत्रे गोळा करा. हा अर्ज तुम्ही मोबाइलवरूनही पूर्ण करू शकता. परंतु अडथळा येत असेल तर तुम्ही जनसेवा केंद्राला (सेतू)  भेट द्या.

पशुपालक, शेतकरी समूह गट, महिला बचत गट व उद्योजक तसेच पशुसंवर्धन विषयक व्यवसाय करणारे शेतकरी असाल स्टार्टअप साठी 50 % अनुदानावर विविध योजने अंतर्गत ONLINE पद्धतीने अर्ज करू शकता…

सदर योजने विषयीची सखोल माहिती करून घेणे साठी राज्य शासनाचा नवा JR (PDF) स्वरूपात येथे पहा….

जी आर पहा