Take a fresh look at your lifestyle.

New Edible Oil Price : दिवाळीत खाद्यतेलाच्या दरात निम्म्याने घसरण ! 15 लिटर तेलाच्या डब्याचे नवे दर लगेच पहा..

बहुतांश अन्नधान्यांच्या दरात वाढ झालेली असताना खाद्यतेलाच्या दरात मोठी घट झाल्याने गृहिणींना दिलासा मिळाला आहे. गेल्या दिवाळीच्या तुलनेत सूर्यफूल, पाम, सोयाबीन, सरकी तेलाच्या दरात 30 ते 35 टक्क्यांनी घट झाली आहे तर शेंगदाणा तेलाचे दर टिकून आहेत.

गेल्या वर्षी दिवाळीत खाद्यतेलांचे दर तेजीत होते. परदेशातून सूर्यफूल, पाम, सोयाबीन तेलाची आवक नियमित सुरू आहे. खाद्यतेलाची आयात वाढलेला आहे. इस्त्रायलमधील युद्धजन्य परिस्थिती, तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खाद्यतेलाला मागणी कमी झाल्याने खाद्यतेलाच्या दरात टप्याटण्याने 30 ते 35 टक्क्यांनी घट झाली आहे.

बहुतांश अन्नधान्याचे दर तेजीत आहेत, मात्र खाद्यतेलाच्या दरात घट झाल्याने दिवाळीत गृहिणींना दिलासा मिळाला आहे. पामतेलाची आयात मलेशिया, इंडोनेशियातून केली जाते. सोयाबीन तिलाची आवक दक्षिण अमेरिकेतील अर्जेंटिनातून होते. रशिया – युक्रेनमधून सूर्यफूल तेलाची आवक होते.

गेल्या वर्षी खाद्यतेलाच्या दरांत मोठा बदल झाला होता. त्या वेळी केंद्र शासनाने देशातील प्रमुख आयतदारांना 20 लाख टन तेलाच्या आयातीवर आयातशुल्क माफ केले होते. आयातशुल्क माफ केल्याने तेलदरात घट झाली. तसेच जागतिक बाजारपेठेतून खाद्यतेलाचा पुरवठा सुरळीत झाल्यानंतर गेल्या वर्षभरापासून खाद्यतेलाच्या दरात टप्प्याटप्प्याने घट झाली आहे. किरकोळ बाजारात एक किली सोयाबीन, सूर्यफूल, पाम, सरका तेलाचे दर 90 ते 100 रुपयांदरम्यान आहेत.

खाद्यतेलाचे नवे दर..

खाद्यतेलांचे 15 किलो दर ( गेल्या वर्षी दिवाळीतील दर )

पाम – 1350 ते 1500 रुपये (2100 ते 2150 रुपये)
सोयाबीन- 1400 ते 1500 रुपये (2300 ते 2400 रुपये)
सूर्यफूल – 1500 ते 1600 रुपये (2300 ते 2400 रुपये)

सरकी – 1400 ते 1550 रुपये ( 2200 रुपये)
वनस्पती तूप – 1400 ते 1600 रुपये (1900 ते 2000 रुपये)
शेंगदाणा तेल – 2700 ते 2800 रुपये (2800 ते 2900 रुपये )

दिवाळीत बाजारपेठांत तोबा गर्दी..

दिवाळीनिमित्त नातेवाईक मित्रमंडळींना, लहान मुलांना भेटवस्तू देण्यासाठी आकर्षक आणि विविध वस्तू बाजारपेठेत दाखल झाल्या असून, त्यांच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी वाढत आहे. भेटवस्तूंमध्ये सुकामेवा, मिठाई, चॉकलेट, शो पीस, कपडे इलेक्ट्रॉनिक उपकरणे आदींना मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

भेटवस्तू देण्यासाठी दैनंदिन जीवनात वापरता येतील, अशा वस्तू खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल आहे. वेगवेगळ्या स्वादाचे चॉकलेट बॉक्स सुकामेवा स्वयंपाकघरातील इलेक्ट्रॉनिक साहित्य, सजावटीचे यांना जास्त मागणी असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.

साहित्य सान्या बादाच दद्यांगन चांदीच्या ताट – बाटीचा सेट छोटे स्पीकर, परफ्यूम, अत्तर, डिजिटल फोटो फ्रेम, सजावटीचे शो – पीस दुचाकी – चारचाकी वाहनांचे मॉडेल, लहान मुलांसाठी इलेक्ट्रिक खेळणी या भेटवस्तूंनाही चांगली मागणी आहे.

स्मार्टफोन, हेडफोन लॅपटॉप, टॅब पॉवर बँक, पेनड्राइव्ह या वस्तूही युवकांच्या दैनंदिन जीवनात महत्वाच्या झाल्या आहेत त्यांचाही खरेदी करून त्या भेटवस्तू देण्याचा ट्रेंड आता रूढ झाला आहे. दररोजच्या वापरातील वस्तूंशिवाय काचच्या हंड्या, भिंतीवर लावण्यासाठी चित्रे, हॅप्पी मॅनचा पुतळा, फॅन्सी लहान – मोठ्या मूर्ती, डेकोरेटिव्ह डायनिंग मॅट आदी वस्तूही ग्राहक खरेदी करत आहेत.