Take a fresh look at your lifestyle.

New GST Rates : आजपासून महागाईचा अमृतकाल । दुग्धजन्य, स्कुल स्टेशनरीसहित ‘या’ जीवनावश्यक वस्तू महागणार, जाणून घ्या संपूर्ण लिस्ट….

शेतीशिवार टीम :18 जुलै 2022 :- देशांतर्गत घडामोडीमुळे वाढत असलेल्या महागाईत आता आणखी भर पडणार आहे . केंद्र सरकारने वाढवलेला GST आजपासून लागू होणार आहे. वस्तू व सेवा कर अर्थात GST परिषदेच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाची अंमलबजावणी सोमवारपासून लागू करण्यात येणार असल्याने सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसणार आहे.

पॅक वस्तूंसह हॉटेलिंग आणि वैद्यकीय सेवांवरही GST भार लादला जाणार आहे. GST परिषदेची 28-29 जून रोजी बैठक झाली. ज्यामध्ये सरकारने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी सोमवार 18 जुलैपासून होणार आहे.

त्यामुळे महागाईत आणखी भर पडणार आहे. GST परिषदेच्या बैठकीत सामान्य लोक वापरत असलेल्या अनेक वस्तूंवरील कर दर वाढवण्यात आले आहे.

त्याचबरोबर काही वस्तूंवरील GSTसूट रद्द केली आहे. सामान्य जनतेला कॅन केलेले किंवा पॅकेज केलेले आणि लेबल केलेले (फ्रोझन वगळता) मासे, पनीर, दही, लस्सी, मध, सुका मखना, कोरडे सोयाबी, वाटाणे, गहू, इतर तृणधान्ये आणि तांदूळ यावर 5% GST आकारला जाणार आहे.

तर आतापर्यंत या वस्तूंना GST सूट मिळत होती. याशिवाय टेट्रा पॅकवर 18% जीएसटी आणि बँकेद्वारे चेक जारी करण्याच्या सेवेवर आणि. ॲटलससह नकाशे आणि चार्टवर 12% GST आकारण्याच्या निर्णयही लागू केले जाणार आहे. एवढेच नव्हे तर आता बाहेर फिरणेदेखील महाग होणार आहे.

पूर्वी हॉटेल्समधील एक हजार रुपयापेक्षा कमी भाड्याच्या रुमवर जीएसटी भरावा लागत नव्हता ; परंतु आता त्यावर 12% GST भरावा लागणार आहे. याशिवाय रुग्णालयात उपचार घेणेही महागणार आहे.

आता आयसीयू व्यतिरिक्त रुग्णांसाठी पाच हजार रुपयापेक्षा जास्त भाड्याच्या खोलीवर 5% GST भरावा लागणार आहे. त्यामुळे आता खासगी रुग्णालयातील उपचारही महागणार आहे.

आता मुलांच्या शिक्षणाशी संबंधित गोष्टीही महागणार आहे. प्रिंटिग – ड्रॉइंग शाई, पेन्सिल शार्पनर, एलईडी दिवा, ड्रॉइंग आणि मार्किंग उत्पादने, चाकू, पेपर कटिंग चाकू यावरही GST वाढणार आहे. आता या वस्तूंवर 18% GST भरावा लागणार आहे.

काय महागणार ? 

पॅक बंद मासे, पनीर, दही, लस्सी, मध, सुका मखना, कोरडे सोयाबी, वाटाणे, गहू, तांदूळ, बँकेचे चेक व्यवहार, हॉटेलिंग, वैद्यकीय सेवा, ॲटलस, चार्ट, प्रिंटिंग- ड्रॉइंग शाई, पेन्सिल शार्पनर, एलईडी दिवा, ड्रॉइंग, माकिंग उत्पादने, चाकू, पेपर – कटिंग चाकू…