Take a fresh look at your lifestyle.

BREAKING : खुशखबर ! 2350 कोटींचा निधी वितरित ; 50,000 रु. अनुदान खात्यात जमा होण्यास सुरुवात, पण ‘हे’ शेतकरी अनुदानास मुकणार ? पहा…

शेतीशिवार टीम : 17 सप्टेंबर 2022 : आपल्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये शासनाच्या माध्यमातून 50 हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान काल 15 सप्टेंबरपासून वितरित केलं जाणार होतं. या आधी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेना बंडखोर – भाजप सरकारकडून विधिमंडळात 25 हजार 826 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या होत्या.

यात 27 जुलै 2022 रोजी शासन निर्णय घेऊन महात्मा जोतिबा फुले कर्जमाफी योजनेंतर्गत 50 हजार रुपयांच्या अनुदानासाठी 4 हजार 700 कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आली होती, परंतु आतापर्यंत निधी पहिला किंवा पहिला हप्ता वितरित करण्यास मान्यता मिळाली नव्हती, त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला होता.

परंतु, शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक शासन निर्णय आज 16 सप्टेंबर 2022 निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे आता हे कंफर्म झालं आहे की, शेतकऱ्यांच्या खात्यात 50000 रु. हप्ता वितरित होणारचं आहे.

आज 16 सप्टेंबर 2022 रोजी अल्पमुदत पीक कर्जाची पुर्णतः परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या रक्कमेवर जास्तीत जास्त रु. 50 हजार पर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना – 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी 2022-23 या वित्तीय वर्षासाठी रु. 4700.00 निधींपैकी पहिला हप्ता हा 2350.00 कोटी निधी वितरित करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

शासन निर्णय पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा

आता हा हप्ता नेमका खात्यात जमा कधी होणार ? याच्या लाभार्थी याद्या आल्या का ? हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे ?

तर शेतकरी मित्रांनो, यासाठी तुम्हाला जास्त प्रतीक्षा करावी लागणार नाही. कारण, या लाभार्थी याद्या राष्ट्रीय बँक, जिल्हा बँक, सोसायट्यांकडे जमा झाल्या आहेत. बँकेत जाऊन तुम्ही त्या याद्या पाहू शकता, परंतु निधी वितरित करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपली आधार E-KYC केली आहे का ? तसेच कोरोनाकाळात ज्या शेतकऱ्यांचे मृत्यू झाले आहे, त्यांचा खरा वारसदार कोण ? हे काही प्रश्न प्रलंबित असल्याने या अनुदानास उशीर झाला आहे. परंतु जे पात्र शेतकरी आहेत अन् त्यांचे आधार E-KYC व्हेरिफिकेशन झालं आहे त्यांच्या खात्यावर सोमवारपासून म्हणजे 19 सप्टेंबरपासून खात्यावर क्रेडिट व्हायला सुरुवात होणार आहे.

ज्या पात्र शेतकऱ्यांनी या योजनेसाठी अद्यापही आपले कर्जखाते (Loan Account) मोबाइल आणि आधारशी लिंक केलं नसेल त्यांच्या खात्यात हप्ता येणार नाही. त्यामुळे आपण एकदा आपल्या बँकेत जाऊन याची नक्की पडताळणी करावी…

या योजनेअंतर्गत अहमदनगर जिल्ह्यात जिल्हा बँकेचे 1 लाख 14 हजार 321 शेतकरी तर औरंगाबाद जिल्ह्यातील जिल्हा बँकेचे 75 हजार तर राष्ट्रीयकृत बँकेचे 1 लाख शेतकरी पात्र ठरण्याची शक्यता असून त्यांना जवळपास 550 कोटी रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान मिळण्याची शक्यता आहे.

तसेच या सर्व याद्या सोमवारपासून mjpsky.maharashtra.gov.in या पोर्टल वर याद्या प्रकाशित होणार आहे, त्यामुळे आपलं यादीत नाव आहे की नाही हे पण समजणार आहे. याबाबतही सोमवारी काही अपडेट आलं तर ते आपण पाहणारच आहोत.