Take a fresh look at your lifestyle.

ऊन, पाऊस, वारा, अतिवृष्टी काहीही असो ‘या’ पिकाची करा लागवड ; 1 लिटर तेलाचा दर 2,700 रु. एकरी 3 महिन्यांत मिळवाल 3 लाखांचा नफा !

शेतीशिवार टीम : 22 जुलै 2022 :- Palmarosa Grass farming Tips : कोरोनाच्या काळात अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या. अनेकांचे व्यवसायही ठप्प झाले. आजारपणात कुठेतरी एवढा पैसा खर्च झाला की कुठलाही नवीन उद्द्योग सुरू करायला पैसेच उरले नाहीत. या सर्व परिस्थितीचा विचार करून आज आपण अशा Business Idea बद्दल जाणून घेणार आहोत, ज्यामुळे तुमचे उत्पन्न झपाट्याने वाढू शकतं.

कमी खर्चात, कमी मेहनत करूनही तुम्ही चांगला नफा मिळवू शकता. कसे ? गवताची लागवड करून. गवत खरोखर तुम्हाला श्रीमंत बनवू शकते ? हा प्रश्न तुम्हालाही पडला असणं.. पण होय ! हे खरं आहे. पाल्मारोसा गवताची लागवड तुम्हाला करोडपती बनू शकता. आज आपण या पाल्मारोसा गवताची लागवड कशी करावी, त्याचा कसा फायदा होतो, ते पीक कोणाला विकता येईल? ही माहिती जाणून घेणार आहोत…

पाल्मारोसा गवत (Palmarosa Grass) म्हणजे काय ?

पाल्मारोसा गवताला सायम्बोपोगन मार्टिनी (Cymbopogon martinii) असेही म्हणतात. हे एक सुगंधी गवत आहे. त्याची लागवड तुम्हाला चांगली कमाई देऊ शकते. पारंपारिक शेतीप्रमाणेच पेरणी, लागवड आणि कापणी देखील केली जाते. या गवताची लागवड पडीक जमिनीवरही करता येते. म्हणजेच तुमच्याजवळ काही नापीक, पडीक जमीन असेल तर तुम्ही त्यातही लागवड करू शकता…

पाल्मारोसा गवताचा (Palmarosa Grass) उपयोग :-

या गवताचा सर्वाधिक वापर कॉस्मेटिक उत्पादने बनवणाऱ्या कंपन्या करतात. याचा वापर साबण, गुलाबपाणी आणि इतर सुगंधी पदार्थांमध्ये केला जातो, त्यामुळे त्याची मागणी नेहमीच असते. या गवतापासून परफ्यूम तयार केला जातो ज्याचा वास गुलाबासारखा असतो. अन्नातही वापरतात. वैद्य आणि हकीम हे औषध बनवण्यासाठीही वापरतात. त्याचे तेल कॅन्सर सारख्या आजारांवर प्रभावी मानले जाते. परदेशातही याला मोठी मागणी आहे, म्हणजेच प्रचंड मागणीमुळे त्याची लागवड फायदेशीर ठरते…

कशी कराल पाल्मारोसाची लागवड :-

हे एक असिंचित पीक आहे, जे कोणत्याही जमिनीवर घेतले जाऊ शकते. परंतु पाल्मारोसा गवताची सर्वाधिक लागवड उतार असलेल्या जमिनीवर केली जात आहे. एकदा लागवड केल्यावर तुम्हाला पुढील 6 ते 7 वर्षे पेरण्याची गरज नाही. प्रत्येक वेळी फक्त कापणी करावी लागते. कधीतरी लागवड झाल्यानंतर गवताला थोडेसे सिंचन हवे असते, पण फारसे पाणी लागत नाही. गवत पेरताना जमिनीत ओलावा असणे आवश्यक आहे. त्याची मुळे असलेली कलमे सुमारे 30 ते 45 सेमी अंतरावर जमिनीत चांगली दाबून लावतात.

पाल्मारोसाची रोपणी कशी कराल ?

प्रत्यारोपणाबद्दल बोलायचे तर, तण साफ केल्यावर पुनर्लावणी केली जाते. सामान्य तापमानात आणि मैदानी भागात जुलै, ऑगस्ट महिन्यात आणि सिंचनाची सोय असलेल्या भागात फेब्रुवारी व मार्च महिन्यातही लागवड करता येते. पाल्मारोसा गवताच्या लागवडीसाठी कृषी विभागातर्फे अनेक शिबिरेही आयोजित केली जातात. 2 ते 3 महिन्यांचे प्रशिक्षणही दिले जाते. कृषी विभागाने दिलेले प्रशिक्षण घेऊन अनेकजण करोडपती झाले आहेत. या गवताच्या लागवडीबाबत तुम्हाला काही शंका असल्यास तुमच्या जवळच्या कृषी केंद्रातून याबाबत अधिक माहिती मिळवू शकता…

पाल्मारोसा गवत लागवडीचे फायदे आणि खर्च :-

हे गवत लावण्यासाठी सुमारे 15 ते 20 हजार खर्च येतो. फक्त 1 एकर जमिनीत 2 टन पेक्षा जास्त पाल्मारोसा गवत पिकवता येतं. आणि मोठी गोष्ट अशी आहे की, ते वर्षातून सुमारे 5 वेळा तयार होतं. एक टन गवतापासून सुमारे 15 लिटर तेल मिळते. या तेलाचा बाजारभाव प्रतिलिटर 2700 ते 3000 पर्यंत असतो. एवढेच नाही तर त्याच्या लागवडीसाठी सरकारकडून अनुदानही मिळते. तेल काढल्यानंतर उरलेला कचराही इंधन म्हणून वापरला जातो…

https://dir.indiamart.com/impcat/palmarosa-oil.html

सुगंधी तेल काढल्यानंतर उरलेली पाने पशुखाद्य म्हणूनही वापरता येतात. म्हणजेच एकदा छोटी गुंतवणूक करून तुम्ही दरवर्षी लाखोंची कमाई करू शकता. नैसर्गिक आपत्तीतही ते तुमचे नुकसान करत नाही. दुष्काळ असो वा अतिवृष्टी गवताला इजा करत नाही, पण हो जास्त पाणी गवताचे नुकसान करू शकते. बहुतांशी पाल्मारोसाची लागवड करताना जनावरांना हानी पोहोचत असल्याचे दिसून आले आहे. मात्र पाल्मारोसा पिकाच्या सुगंधीपणामुळे प्राणी त्यापासून दूर राहतात.

अनेक राज्यांमध्ये वाढता कल :-

राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र या राज्यांमध्ये त्याची लागवड झपाट्याने वाढत आहे. गुजरातमधील वहेलाल गाव पाल्मारोसा गवत लागवडीचे केंद्र बनले आहे. येथील बहुतांश शेतकऱ्यांनी पाल्मारोसा पिकवण्यास सुरुवात केली आहे. तुम्हालाही कमी खर्चात नवीन काही करायचे असेल तर तुम्ही ही शेती सहज करू शकता. या प्रशिक्षणासाठी शासनाकडून अनुदान दिले जाते.