Take a fresh look at your lifestyle.

पंजाब डख नवीन हवामान अंदाज : वातावरणात अचानक बदल ! 3 ते 9 जानेवारी दरम्यान महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस..

सध्या देशातील महाराष्ट्रासह उत्तर भारतीय राज्यांमध्ये कडाक्याच्या थंडीबरोबरच धुक्यांची लाट पसरली आहे. हवामान खात्यानेही अनेक राज्यांमध्ये थंडीच्या दिवसांचा इशारा दिला आहे. दरम्यान, वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि पूर्वेकडील वाऱ्यांच्या संपर्कामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये दाट धुक्यासोबत पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभाग IMD नुसार, 3 ते 7 जानेवारी दरम्यान देशातील अनेक जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, 2 ते 4 जानेवारी दरम्यान महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये आणि दक्षिण भारतातील तामिळनाडू, केरळ आणि लक्षद्वीप या राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. या काळात पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधील अनेक जिल्ह्यांमध्ये दाट धुके पडण्याची शक्यता असल्याने रब्बी हंगामातील पिकांना फटका बसण्याची दाट शक्यता आहे.

महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता..

हवामान खात्यासोबतच जेष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनीनी आपला हवामान अंदाज प्रसिद्ध केला आहे. त्यांच्या मते महाराष्ट्रात 3 जानेवारी ते 9 जानेवारी दरम्यान ढगाळ वातावरण राहणार असून अवकाळी पाऊस बरसणार आहे.

राज्यात 3 जानेवारी ते 9 जानेवारी दरम्यानतील 7 दिवसांत पूर्व – पश्चिम विदर्भासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर बुलढाणा, वर्धा, अमरावती -परतवाडा, नागपूर, या जिल्ह्यांत अवकाळी जोराचा पाऊस होण्याची शक्यता पंजाबरावांनी व्यक्त केली केली असून संत्रा बागायतदारांनी काळजी घ्यावी असे आवाहन केलं आहे.