Take a fresh look at your lifestyle.

पुणे महानगरपालिकेत नोकरीची मोठी संधी ! कनिष्ठ अभियंत्याची 113 पदे, पहा थेट ऑनलाईन अर्ज लिंक..

पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंतापदाच्या 113 जागांसाठी अर्ज भरण्यास आज मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. 113 पैकी 13 पदे माजी सैनिक अनुशेष भरून काढण्यासाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. 100 पदे ही सर्व संवर्गासाठी असणार आहेत. महापालिके ने कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), पदासाठी आवश्यक अटी आणि शर्ती उमेदवारांना महापालिकेच्या वेबसाईटवर उपलब्ध झाल्या आहेत. 

कनिष्ठ अभियंतासाठी 3 वर्षांची अनुभवाची अट ठेवण्यात आली होती. मात्र, याबाबत बऱ्याच दिवसांपासून ही अट रद्द करण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानुसार महापालिका प्रशासनाने अट रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला होता. सरकारने त्याला नुकतीच मंजुरी दिली आहे.

अनुभवाची अट कमी करण्यात येऊन पदवी किंवा पदविका उत्तीर्ण असण्याची अट ठेवण्यात आली आहे, याचा नुकतीच पदवी किंवा पदविका घेतलेल्या उमेदवारांना फायदा होणार आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेतली जाणार आहे.

200 गुणांची प्रश्नपत्रिका असेल. त्याचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असणार आहे. तोंडी परीक्षा घेतली जाणार नाही, अशी माहिती पालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे यांनी दिली.

अर्ज सादर करण्याचा आणि शुल्क भरण्याचा कालावधी  :- 16 जानेवारी ते 5 फेब्रुवारी 2024

वेतनश्रेणी : 38,600 ते 1 लाख 22 हजार 800

वयोमर्यादा : –

खुल्या प्रवर्गातील उमेदवार : 38 वर्ष ,

मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवार : 43 वर्ष

दिव्यांग उमेदवार : 45 वर्ष

दिव्यांग माजी सैनिक :  45 वर्ष

पुणे महापालिकेच्या स्थायी कर्मचाऱ्यांना वयोमर्यादा नाही

परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग : 1,000

मागासवर्गीय प्रवर्ग : 900

माजी सैनिक / दिव्यांग माजी सैनिक : शुल्क माफ असणार

संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :-  इथे क्लिक करा