Take a fresh look at your lifestyle.

सर्वसामान्यांना महागाईचा पुन्हा मोठा झटका । आता गृहकर्ज, वाहन कर्ज घेणं महागणार ; पहा, Home Loan चे EMI कॅल्क्युलेशन

शेतीशिवार टीम : 6 ऑगस्ट 2022 :- देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडींमुळे मागील काही महिन्यांपासून वाढत चाललेली महागाई नियंत्रणात आणण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने व्याज दरात अर्धा टक्क्याने वाढ केली. रेपो रेट आता कोविडपूर्व स्तर 5.4 टक्क्यांवर पोहोचला आहे.

व्याज दरवाढीचा फटका थेट सर्व स्तरांवरील जनतेला बसणार असून गृहकर्ज, वाहन, वैयक्तिक कर्ज घेणे आता महागणार आहे. त्याचबरोबर आधीच घेतलेल्या कर्जाचे हप्तेदेखील यामुळे वाढणार असल्याने महागाईत आणखीच खिशाला कात्री लागणार आहे.

बुधवारपासून सुरू झालेल्या रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समिती आढावा बैठकीच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी याबाबतची घोषणा केली.

मे 2022 मध्ये आरबीआयने रेपो रेटमध्ये 0.40 टक्क्यांची वाढ केली होती. त्यानंतर जून महिन्यात 0.50 % आणि आता ऑगस्ट महिन्यात पुन्हा 0.50 % रेपो रेट वाढला आहे. विशेष म्हणजे गेल्या 4 महिन्यात 1.40 टक्क्यांनी रेपो रेटमध्ये वाढ करण्यात आली आहे.

दरम्यान, जवळपास 2 वर्ष रेपो रेट 4 टक्क्यांपर्यंत स्थिर होता, तो आता 5.40% एवढा पोहोचला आहे. दरम्यान, कोरोना महासाथीच्या पूर्वपातळीवर रेपो दर पोहोचला आहे. गेल्याच महिन्यात घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती वाढल्याने आधीच महागाईने त्रस्त झालेल्या जनतेचे बजेट कोलमडले आहे. तर आता सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न आणखी महागले आहे.

लाचबरोबर वाहन व वैयक्तिक कर्जदेखील महागणार आहे. त्याचबरोबर कर्ज घेतलेल्यांच्या मासिक हप्त्यात देखील वाढ होणार आहे. जून महिन्यात शक्तिकांत दास यांनी पतधोरण जाहीर केले होते. त्यामध्ये मध्यवर्ती बँकेने 0.50 टक्क्यांनी रेपो रेट वाढवला होता. त्यामुळे गृह कर्जापासून सर्व प्रकारची कर्जे महाग होणार आहेत. त्यामुळे गेल्या चार महिन्यांत तब्बल 1.40 टक्क्यांनी रेपो दर वाढला आहे.

जाणून घ्या, किती वाढणार EMI :-

20 वर्षांकरिता 30 लाखांच्या घर कर्जासाठी 8.50% व्याजदराने 950 रुपये एक्स्ट्रा वाढल्याने 26,035 मोजावे लागतील.

20 वर्षांकरिता 50 लाखांच्या घर कर्जासाठी 8.50% व्याजदराने 1,569 रुपये एक्स्ट्रा वाढल्याने 43,393 मोजावे लागतील.