Take a fresh look at your lifestyle.

Samruddhi Mahamarg : प्रवाशांनो लक्ष द्या ! समृद्धी महामार्ग आजपासून 2 नोव्हेंबरपर्यंत ‘या’ टप्प्यात बंद, पहा असा आहे पर्यायी मार्ग..

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर पॉवर ग्रिड ट्रान्समीमिशन अती उच्चदाब वाहिनी टॉवरचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी जालना ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान दोन्ही बाजूंची वाहतूक मंगळवारी 31 ऑक्टोबर, बुधवारी 1 नोव्हेंबर व गुरुवारी 2 नोव्हेंबर असे तिनही दिवस दुपारी बारा ते साडे तीन यावेळात बंद राहणार आहे.  

उर्वरित कालावधीत वाहतुक सुरळीत सुरु राहील. बंद कालावधीत पर्यायी मार्गावरुन वाहतूक वळविण्यात आली आहे, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता व प्रकल्प संचालक रामदास खलसे यांनी कळविले आहे.

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर पॉवर ग्रिड ट्रान्समीशन अती उच्चदाब वाहिनी टॉवरचे काम करण्यात येणार आहे. हे काम मंगळवारी 31 ऑक्टोबर, बुधवारी 1 नोव्हेंबर, गुरुवारी 2 नोव्हेंबर असे तीन दिवस दुपारी 12 ते साडेतीन यावेळात होणार आहे.

असा असणार पर्यायी रस्ता..

हे तीनही दिवस काम सुरु असलेल्या कालावधीत (दुपारी 12 ते 3.30 ) जालना ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान समृद्धी महामार्गावरील जालना इंटरचेंज (आयसी – 14) ते सावंगी इंटरचेंज (आयसी -16) दरम्यान नागपूरकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक निधोना (जालना) इंटरचेंज (आयसी-14 मधून बाहेर पडून निधोना एमआयडीसी मार्गे – राष्ट्रीय महामार्ग 753 अ (जालना छत्रपती संभाजीनगर) मार्गे केंब्रीज शाळेपर्यंत नंतर ती उजवीकडे वळून सावंगी बायपासमार्गे सावंगी इंटरचेंज क्र. आयसी -16 (छत्रपती संभाजीनगर) येथे समृद्धी महामार्गावर प्रवेश करुन शिर्डीकडे रवाना होईल.

तर समृद्धी महामार्गावरील शिर्डीकडून नागपूरकडे जाणारी वाहतूक, सावंगी इंटरचेंज क्र. आयसी – 16 (छत्रपती संभाजीनगर) येथून बाहेर पडून वर नमूद केलेल्या मार्गावरुन (विरुद्ध दिशेने) निधोना (जालना) इंटरचेंज क्र. आयसी – 14 या ठिकाणी समृद्धी महामार्गावर प्रवेश करुन नागपूरकडे रवाना होईल..