Take a fresh look at your lifestyle.

पुण्यात बनली बुलेटला टक्कर देणारी Electric Bike ! 180Km रेंज तर 105 चे टॉप स्पीड; किंमतही आहे स्वस्त, फक्त 999 मध्ये..

संपूर्ण जगात खऱ्या अर्थाने इलेक्ट्रिक वाहनांचे (EVs) युग आलं आहे.  झिरो उत्सर्जन असलेल्या EV केवळ वायू प्रदूषणावर थेट उपाय नाहीत तर ते तेल आयात कमी करण्यास देखील मदत करत आहे. भारतीय ऑटो मार्केटमध्येही इलेक्ट्रिक बाइक्स झपाट्याने विस्तारत आहेत. परंतु तेही स्कुटी मॉडेलमध्ये म्हणजे टीव्हीएस iQube, बजाज चेतक, ओला यांनी सध्या भारतीय मार्केटमध्ये जम बसवला आहे.

परंतु आता स्पोर्ट बाईक सेगमेंटमध्ये आता अशी बाईक मार्केटमध्ये आले आहे ती सध्याच्या पल्सर, युनिकोर्न, TVS Apache अशा 150cc बाईकशी परफॉर्मन्सच्या बाबतीत टक्कर देऊ शकते त्या स्पोर्ट EV बाईकचे नाव आहे पुण्यातील टॉर्क मोटर्सची Tork Kratos-R. या बाईकने सध्या अनेक विशेष फीचर्ससह सुसज्ज न्यू अर्बन व्हेरियंट समाविष्ट केले आहेत.

हे व्हेरियंट लाँच करण्यामागील कंपनीचा मुख्य उद्देश हा आहे की, रायडिंगचा अनुभव अधिक रोमांचक बनवणे आणि अनेक तांत्रिक फीचर्ससह सादर करणे. जर तुम्हीही सध्या स्वत:साठी 150cc बाईक्सही टक्कर देणारी शक्तिशाली बाईक शोधत असाल, तर Kratos-R अर्बन बाईक एक चांगला ऑप्शन ठरू शकतो.

जबरदस्त रेंज..

Tork Kratos R कंपनीने खास शहरांमध्ये वापरण्यासाठी डिझाइन केलं आहे. या ई – बाईकमध्ये फ्लक्स मोटर बसवण्यात आली आहे जी 12 बीएचपी पॉवर आणि 38 एनएम कमाल टॉर्क जनरेट करते. ही ई-बाईक 350cc बुलेटपेक्षा जास्त पॉवरफुल आहे. Royal Enfield बुलेटचे इंजिन जास्तीत जास्त 19 बीएचपी ची पॉवर आणि 27 Nm टॉर्क जनरेट करते..

या ई – बाईकला पॉवर देण्यासाठी, कंपनीने 4 kWh क्षमतेचा लिथियम आयन बॅटरी पॅक वापरला आहे. बाइकचे चार मोड आहेत – इको, सिटी, स्पोर्ट्स आणि रिव्हर्स. स्पोर्ट्स मोडमध्ये ती 105 किलोमीटर प्रति तास या वेगापर्यंत पोहोचू शकते. तर, एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ती 180 किलोमीटरपर्यंत रेंज देत आहे.

कमालीचे फीचर्स..

Kratos-R आर अर्बन केवळ डिझाइनमध्येच आकर्षक नाही तर त्यात अप्रतिम फीचर्सही आहेत. या इलेक्ट्रिक बाईकमध्ये मॅप नेव्हिगेशन, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, व्हेईकल लोकेटर, अँटी थेफ्ट सिस्टम, जिओफेन्सिंग, चार्जिंग पॉइंट लोकेशन, ओटीए अपडेट, राइड अँनालिटिक्स, गाईड लाईट यांसारखे फीचर्स देण्यात आली आहेत. या ई – बाईकला बाजारात ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. Tork Kratos बुक करण्यासाठी, तुम्ही फक्त 999 रुपये बुकिंग रक्कम म्हणून भरू शकता..

Tork Kratos R इलेक्ट्रिक बाईक बुक करण्यासाठी :- इथे क्लिक करा

किती आहे किंमत..

Kratos-R चे फीचर्स पहिले तर ती कोणत्याही सुपर बाईकपेक्षा कमी नाहीत. टॉर्क मोटर्स भारतात आपली परफॉर्मन्स इलेक्ट्रिक मोटरसायकल Tork Kratos R ची विक्री सुरु केली आहे. पेट्रोलवर चालणाऱ्या बाईकशी टक्कर देण्यासाठी ही ई – बाइक 1,67,499 रुपये (एक्स-शोरूम) किमतीत लॉन्च करण्यात आली आहे..