Take a fresh look at your lifestyle.

Business Idea : तुमच्या आजूबाजूला असलेलं ‘हे’ झाड ; 1Kg चा दर 1000 ते 1500 रु. पानांची पावडर करा अन् करोडपती व्हा !

शेतीशिवार टीम : 31 जुलै 2022 :- आपल्या आजूबाजूलाचं दुर्लक्षित असणारं हे झाड तुम्हाला श्रीमंत करू शकतं ? अन् ते झाड म्हणजे कडुलिंब, हो खरंय… कडुलिंब कडू असलं तरी,पण त्याचे गुणधर्म असंख्य आहेत. कडुनिंबाला सर्वात चांगली औषधी वनस्पती म्हणून म्हटलं जातं. आत्तापर्यंत तुम्हाला कडुलिंबाच्या गुणधर्मांची माहिती तर असेलच, पण तुम्हाला माहित आहे का की, कडुलिंबाच्या पाने, बिया, साल, लाकूड, भागातून तुम्ही भरपूर कमाई करू शकता. होय, कडुलिंबाच्या पावडरला नेहमीच मागणी जास्त असते.

कोरोना महामारीच्या आगमनानंतर लोकांचा कल आयुर्वेदाकडे झपाट्याने वाढला आहे. कडुनिंबाचे अनेक गुणधर्म आयुर्वेदात सांगितले आहेत. हे अनेक रोगांच्या उपचारांमध्ये प्रभावी आहे. त्वचा, केस, डोळे आणि दातांसाठीही ते वरदान ठरलं आहे. मग आता यातून तुम्हाला मिळणाऱ्या कमाईबद्दलही जाणून घेउया…

आज आपण अशाच Business Idea बद्दल जाणून घेणार आहोत, ज्यामध्ये तुम्ही किरकोळ खर्चातचं 3 ते 4 पट किंवा त्याहूनही अधिक कमाई करू शकता…

कडुलिंबाच्या पानांची पावडर :-

कडुलिंबाचे झाड (Neem tree) कुठेही सहज सापडते. तुम्ही गावात राहत असाल तर तुम्हाला पाने गोळा करणे सोपं जाईल. अनेक पाने जंगलातही अशीच कुजतात, मग त्यांचा कमाईचे साधन म्हणून वापर का करू नये. कडुलिंबाच्या पानांची पावडर बनवून तुम्ही सहज करोडपती होऊ शकता. घरबसल्या सुरू करता येणारा हा व्यवसाय आहे. कडुनिंबाचा वापर जवळपास प्रत्येक घरात केला जातो…

फ्रीमध्ये करू शकता स्टार्टअप :-

नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमच्याकडे बजेट नसेल, तर कडुलिंबाच्या पानांची पावडर बनवण्याचे काम फ्रीमध्ये सुरू करता येते. यासाठी तुमच्या घराच्या आजूबाजूला कडुलिंबाचे झाड असेल तर त्याची पाने काढता येतात. किंवा तुम्ही त्याची पाने जवळपासच्या गावांमधून, शेतकऱ्यांकडूनही घेऊ शकता. मग तुम्ही त्याची पावडर घरीच बनवून विकू शकता…

घरच्या घरी पावडर कशी बनवाल ?

सर्वप्रथम पाने गोळा करून ती धुवून दोन ते तीन दिवस उन्हात वाळवावीत. पाने चांगले सुकणे महत्वाचे आहे. पाने कोरडी आहेत की नाही हे तपासण्यासाठी, आपल्या हाताने पान मॅश करून पहा. आता त्यांना मिक्सर ग्राइंडरमध्ये ठेवून बारीक वाटून घ्या. जर पाने बारीक होत नसतील तर पावडर गाळून त्याचा खडबडीत भाग वेगळा करावा. आता पावडर हवाबंद डब्यात ठेवा…

किती होईल नफा ?

कडूनिंब पावडर किती महागात विकली जाते हे तुम्ही सोशल मीडिया वेबसाइट Amazon आणि Flipkart वर तपासू शकता. 100 ग्रॅम पावडर 150 रुपयांना सहज विकता येते. म्हणजेच एक किलो पावडरची किंमत 1500 रुपयांना मिळते. आता तुमच्या नफ्याचा अंदाज घ्या. कडूनिंबाची पावडर 1000 ते 2000 रुपये प्रति किलो विकली जाते. फरक फक्त ब्रँडचा आहे. तुम्‍हाला हवे असेल तर मशिनच्‍या मदतीनेही हा व्‍यवसाय करून तुम्‍ही महिनाभरात लाखोंची कमाई करू शकता…

अन्यथा ही पावडर तुम्ही सौंदर्य प्रसाधने कंपन्यांना विकून चांगला नफा मिळवू शकता :- डाबर, हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनी, जॉन्सन अँड जॉन्सन, लॉरिअल etc 

आकर्षक पॅकिंगवर द्यावं लागेल लक्ष :-

एकदा तुम्ही पावडर बनवल्यानंतर तुमच्यासाठी चांगले पॅकिंग असणे महत्त्वाचे आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी प्रॉडक्शनचे पॅकिंग खूप महत्त्वाचे आहे. ब्रँड नावाने तुम्ही ते डबा किंवा प्लास्टिकच्या पिशवीत विकू शकता. यासाठी तुमच्याकडे जीएसटी क्रमांक, फूड लायसन्स आणि कंपनी रजिस्ट्रेशन असणे आवश्यक आहे. किंवा तुम्हाला हवे असल्यास तुम्ही औषधी कंपन्या, आयुर्वेदिक उत्पादने बनवणार्‍या कंपन्यांना पावडर विकू शकता…

तुम्हाला हवे असल्यास तुम्ही या व्यवसायातून हजार रुपये कमवू शकता आणि हवे असल्यास लाखो रुपयेही कमवू शकता. त्यासाठी तुम्हाला फक्त मेहनत करावी लागेल. तुम्ही जितके जास्त काम कराल तितके तुम्ही कमवाल. तुम्ही फक्त एका महिन्यात या व्यवसायातून भरपूर कमाई करू शकता. अमेरिका, जपान, चीन असे अनेक देश कडुनिंबाची बागायती वाढवत आहेत. कारण तिथे त्याचा वापर झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे, आपल्या देशात अजूनही या व्यवसायाला भरपूर वाव आहे.

कडुलिंबाचे फायदे :- 

कडुलिंबाचे झाड, पान, फूल, फळ, मुळे, साल, लाकूड यांचे असंख्य फायदे आहेत. यातून सौंदर्यप्रसाधनांच्या वस्तू तयार केल्या जात आहेत. साबण, तेल, क्रीम, फेस पॅक, शाम्पू बनवले जात आहेत. वेदना, मलेरिया, ताप, गर्भनिरोधकासाठी वापरला जात आहे. कडुलिंबाचा वापर कीटकनाशक, बुरशीनाशक म्हणून केला जात आहे त्यामुळे कंपन्यांना याचे खूप गरज असते.