Business Idea : ‘या’ स्पेशल दुधाला जबरदस्त डिमांड; 1 लिटरचा दर 150 ते 200 ; फक्त 1 लाख गुंतवा, डेरीवर दूध न घालता करोडपती व्हाल !

1

जर तुम्ही बिझनेस सुरू करण्याचा विचार करत असाल तर आज आपण अशी बिझिनेस आयडिया जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही नक्कीच हा बिझिनेस करण्याचा विचार कराल. तो बिझनेस म्हणजे सोया मिल्क चा (Soya Milk).

मात्र हा बिझनेस सुरू करण्यापूर्वी तुम्हाला या बिझनेसची पूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. सोया मिल्क (Soya Milk) हे सर्वात किफायतशीर पेय प्रॉडक्शन पैकी एक आहे. सोया मिल्क पूर्णपणे कोलेस्ट्रॉल फ्री असते. आजकाल लोकांमध्ये हेल्थ विषयी जागरुकता निर्माण झाल्याने या प्रोड्युस मिल्कची मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. त्यामुळे सोया मिल्कचा (Soya Milk) बिझनेस करून तुम्ही चांगला नफा कमवू शकता…

हा बिझनेस कसा सुरू करायचा ?

सोया मिल्कचा बिझनेस सुरू करण्यासाठी, प्रथम तुम्हाला जागेची आवश्यकता भासेल, एक छोटे सोया मिल्क युनिट स्थापित करण्यासाठी सुमारे 100 चौरस मीटर जागा पुरेशी आहे. अशी जागा तुमच्या मालकीची नसेल तर तुम्ही ती भाड्याने घेऊ शकता. सोया मिल्क तयार करण्यासाठी सोयाबीन, साखर, आर्टिफिशियल फ्लेवर, सोडियम बायकार्बोनेट आणि पॅकेजिंग मटेरियल आवश्यक आहे.

सोयाबीन ग्राइंडर, बॉयलर, मेकॅनिकल फिल्टर, सोकिंग टेंक, पॅक सीलर मशीन, व्हॅक्यूम पॅकिंग मशिन आणि वेईंग बेलंस यांसारख्या मशीन्सची देखील आवश्यकता भासते. सोया मिल्क तयार करण्यासाठी सोयाबीन धुऊन ग्राइंड करावे लागते…

सोया दूध तयार करण्याची प्रक्रिया (Soya milk making process) :-

सर्वप्रथम सोयाबीनच्या बिया एका मोठ्या भांड्यात 8 ते 10 तास गरम पाण्यात भिजवून ठेवाव्या लागतात.

यानंतर सोयाबीनच्या बिया पाण्यातून काढून स्वच्छ पाण्याने दोन-तीन वेळा धुवाव्यात.

यानंतर आरओ वॉटरसह सोया ग्राइंडर मशीनमध्ये बियाणे टाकले जाते, मशीन चालू केले जाते, मशीन एका बाजूला दूध तयार करते आणि दुसरीकडे ओक्या तयार करते.

सोयाबीनच्या सर्व बिया बारीक करून घेतल्यावर दुस-या वेळेस जे दूध मिळाले होते तेच दुध पुन्हा ग्राइंडर मशीनमध्ये टाकले की दूध तयार होते.

आता दूध बॉयलर मशीनमध्ये टाकून टेम्परेचर मशीन गरम करून दूध उकळले जाते.

जेव्हा बॉयलर मशीनचे तापमान 100 किंवा 110 अंश सेंटी ग्रेडपर्यंत पोहोचते तेव्हा बॉयलर मशीनमधून दूध दुसऱ्या मोठ्या भांड्यात काढावे.

आता तुम्हाला हवे असल्यास तुम्ही फ्लेवर्ड सोयामिल्क देखील बनवू शकता, यासाठी त्यात घातलेली साखर, चव आणि सोयामिल्क थंड झाल्यावर मिसळले जाते.

आता फ्लेवर्ड सोयामिल्क देखील विक्रीसाठी तयार आहे जे पॅक करून विकता येते.

याबाबत तुम्ही हे पूर्ण युनिट या soya milk making machine लिंकवरून खरेदी करू शकता किंवा गूगल. युट्युब वर अधिक माहिती घेऊ शकता…


तुम्हाला बिझनेस रजिस्ट्रेशनही करावं लागेल… 

कोणत्याही अडचणीशिवाय बिझनेस सुरळीतपणे चालवण्यासाठी FSSAI लायसेन्स आणि इतर आवश्यक लायसेन्स तुम्हाला मिळवावे लागतील. परंतु उत्पादनाने PFA (अन्न भेसळ प्रतिबंधक) कायदा, 1955 [1] चे पालन केले पाहिजे. तसेच, संपूर्ण प्रक्रियेदरम्यान पर्यावरणाला कोणतीही हानी होणार नाही याची खात्री करण्यासाठी प्रदूषण विभागाकडून एनओसी NOC देखील आवश्यक आहे.

सोया मिल्क व्यवसायासाठी लाइसेंस :-

FSSAI License
GST Registration
Udyog Aadhar Registration
Trademark Registration

Soya Milk ची मागणी मोठी अगदी सहज होणार विक्री…

आरोग्य आणि इतर फायद्यांसाठी, सोया मिल्कला केवळ भारतातच नाही तर जगभरात मोठ्या प्रमाणावर डिमांड आहे. डिमांड जास्त असल्याने सोया मिल्कची विक्री सहज होणार आहे. आजकाल ग्रोफर्स, बिगबास्केट, डंझो आणि अनेक डेअरी उत्पादन तसेच दूध बूथ यांसारख्या विविध ऑनलाइन पोर्टलवर सोया मिल्क आणि त्याचे डेरिव्हेटिव्ह मोठ्या प्रमाणावर विकले जातात. त्यामुळे तुम्ही त्यावर अकाउंट बनवूनही विकू शकता. किंवा तुम्ही किराणा दुकान, जिम सेंटर, सुपर मार्केट इत्यादींमध्ये ते सहजपणे विकले जाऊ शकते.

यातून किती होईल कमाई ? 

सोया मिल्क बिझनेस हा भारतातील सर्वात फायदेशीर बिझनेस बनला आहे. यामध्ये तुमच्या क्वालिटीवर आणि फ्लेवर वर याचा भाव ठरवला जातो. जर तुम्ही व्यवस्थित पॅकेजिंग करून विकलं तर 100 ते 200 रु. लिटर दराने तुम्ही विक्री केली तर महिन्याला 50 हजार लिटर सोया मिल्कचे उत्पादन आणि विक्री केली तर 10 ते 15 लाखांची सहज कामे करू शकता….

1 Comment
  1. […] जर तुम्हाला फक्त सोया मिल्क चा व्यवसाय करायचा असेल तर त्यासाठी सोयाबीन + दूध + साखर + फ्लेवर + सोडियम बायकार्बोनेट + पॅकेजिंग मटेरियल एवढ्या पदार्थांची गरज पडेल. या सोया मिल्क च्या युनिट ची किंमत 1 लाख 70 हजारा दरम्यान असून याबद्दलची साविस्थर माहिती पाहण्यासाठी :-  इथे क्लिक करा.  […]

Leave A Reply

Your email address will not be published.