शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी । भोगवटादार वर्ग 2 च्या जमिनी वर्ग 1 मध्ये रूपांतरण करण्यासाठी नवा कायदा, पहा, 3 ऑगस्ट पर्यंत आहे मुदत….

0

शेतीशिवार टीम : 12 जुलै 2022 :- शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे वर्ग – 2 च्या जमिनी वर्ग 1 मध्ये रुपांतरण करणं. आपण जर पाहिलं तर राज्यांमध्ये वर्ग – 2 च्या भाडेपट्ट्याने दिलेल्या जमिनी वर्ग – 1 मध्ये रूपांतरण करणं कायदा 2019 हा कायदा या ठिकाणी 8 मार्च 2020 रोजी राजपत्रक काढून प्रकाशित करण्यात आलेला होता. या राजपत्राच्या आधारे या कायद्याच्या आधारे वर्ग – 2 च्या जमिनी वर्ग – 1 मध्ये रूपांतरण केल्या जात होत्या, परंतु या कायद्याची मुदत 8 मार्च 2022 मध्ये संपलेली होती.

त्यामुळे राज्यांमध्ये आता वर्ग – 2 च्या जमिनी 1 मध्ये रूपांतर करण्यासाठी नवीन कायद्याची अपेक्षा होती. आणि यासाठी वर्ग – 2 च्या जमिनी वर्ग-1 मध्ये रूपांतरण करणं कायदा : 2022 हा काही महत्त्वपूर्ण बदल करून अंमलात आणण्यासाठी एक मसुदा तयार करण्यात आलेला आहे. आणि या संदर्भातील सविस्तर माहिती आपण ‘शेतीशिवार’ च्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

महाराष्ट्र जमीन महसूल (भोगवटदार वर्ग – 2 आणि भाडेपट्टयाने प्रदान केलेल्या जमिनी भोगवटदार वर्ग 1 मध्ये रुपांतरीत करणे) या अधिसूचनेची मुदत 8 मार्च रोजी संपली आहे. या अधिसूचनेस महाराष्ट्र जमीन महसूल भोगवटदार वर्ग 2 आणि भाडेपट्टयाने प्रदान केलेल्या जमिनी भोगवटदार वर्ग 1 मध्ये रुपांतरीत करणे

हा मसूदा महसूल व वन विभाग मंत्रालय मुंबई यांचेकडील महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार – ब दि. 5 जुलै 2022 मध्ये प्रसिध्द करण्यात आला असून अधिसूचना बाधा पोहचण्याचा संभव असलेल्या सर्व व्यक्तींच्या माहितीसाठी प्रसिध्द करण्यात आली असून अधिसुचनेमध्ये नमुद मसूदा 4 ऑगस्ट 2022 रोजी किंवा त्यानंतर विचारात घेण्यात येणार आहे.

या अधिसुचनेच्या मसुद्या संबंधात कोणत्याही व्यक्तीच्या प्राप्त होणा-या हरकती किंवा सूचना अपर मुख्य सचिव (महसूल), महसूल व वन विभाग, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय मुंबई 400 032 यांच्याकडे दि.3 ऑगस्टपर्यंत सादर करावे, असे आवाहन असे आवाहन महसूल विभागाकडून करण्यात आले आहे.

शेतकरी पुत्रांनो, तुमची जमीन नेमकी कोणत्या वर्गात मोडते, ते जाणून घ्या…

भोगावटा वर्ग 1 :-

जो खातेदार फार पूर्वी पासून जमिनीचा कब्जेदार असून त्याला सदर जमिन विकण्याचा पूर्ण अधिकार बहाल केला आहे. अशा जमीनींचा खातेदाराचा वर्ग 1 मध्ये समावेश होतो. या जमिनी विक्री / हस्तांतरण कामी कोणत्याही शासकीय पूर्वपरवानगीची गरज नाही. थोडक्‍यात, मुळ मालकीची वडिलोपार्जित आलेली जमीन भोगवटादार वर्ग 1 मध्ये मोडते.

भोगावटा वर्ग 2 : –

ज्या जमिनी खातेदाराला विकण्याचा अधिकार बहाल केला नाही. असा खातेदार म्हणजेच भोगवटादार वर्ग 2 होय. उदा. देवस्थान इमानी जमीन, हैद्राबाद अतियात जमिनी, वतन जमीन, वन जमीन, गायरान, पुन पुनर्वसनाच्या जमीनी व शासनाने दिलेल्या जमिनींचा समावेश होतो. अशा जमीनी विक्री साठी शासनाची पूर्व परवानगी घेणे आवश्यक असते.

भोगवटादार वर्ग 2 चे वर्ग 1 मध्ये रूपांतर कसे करतात ?

प्रारंभाच्या दिनांकास किंवा भोगवटादारास नवीन व अविभाज्य शर्तीवर / भोगवटादार वर्ग 2 धारण केलेला असा कोणताही भोगवटा, अशा जमिनीच्या चालू बाजाराच्या 50% इतकी रक्कम नजराणा म्हणून शासनाला प्रधान करून भोगवटादार वर्ग एक मध्ये रूपांतर करता येईल.आणि अशा रूपांतरानंतर भोगवटादार , महारास्ट्र जमीन महसूल सहिता 1966 याच्या तरतुदी अशी जमीन भोगवटादार वर्ग 1 म्हणून धारण करील.

भोगवटादार वर्ग 2 चे वर्ग 1 मध्ये रूपांतर करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :-

जमिन मालक यांचा विनंती अर्ज
विहीत नमुन्यातील प्रतिज्ञापत्र
जीमनाच 50 वषाचे उतार व खाते उतारा
7/12 उताऱ्यावर सर्व फरफार नोंदी
एकत्रीकरणाचा मूळ उतारा
आकारबंदाची मुळ प्रत
मुळधारकास जमिन कशा मिळाला याबाबत कबुलायत / आदेशाची नक्कल
तलाठी यांचेकडील वन जमीन नोंदवहीचा उतारा.

भोगवटादार वर्ग -2 चे वर्ग – 1 मध्ये अंतर्भाव करण्यासाठी करावयाचा अर्जाचा नमुना संच :-

अर्जाचा नमुना संच पाहण्यासाठी PDF :- इथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.