बीज भांडवल कर्ज योजना : 2022। ‘या’ लाभार्थ्यांना मिळणार बिनव्याजी 5 लाखांपर्यंत कर्ज…

0

शेतीशिवार टीम,18 मे 2022 :- वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या, आर्थिकदृष्टया दुर्बल कुटुंबातील व्यक्तींना राष्ट्रीय मागासवर्ग विकास महामंडळाच्या सहकार्याने अल्प व्याजदराने रू. 5 लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. ही योजना राष्ट्रीय मागासवर्ग विकास महामंडळाची असून जिल्ह्याच्या ठिकाणी वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळातर्फे राबविली जाते.

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेली बीज भांडवल कर्ज योजनेमध्ये विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील घटकांची आर्थिक उन्नती करणे, स्वयंरोजगारास प्रोत्साहित करणे, आर्थिकदृष्ट्या सक्षम करून तात्काळ वित्त पुरवठा करणे हा योजनेचा उद्देश आहे.

योजनांसाठी लघु व्यवसाय उदा .मत्स्य व्यवसाय, कृषी क्लिनिक, पॉवर टिलर, हार्डवेअर व पेंट शॉप, सायबर कॅफे, संगणक प्रशिक्षण, झेरॉक्स, स्टेशनरी, सलुन, ब्युटी पार्लर, मसाला उद्योग, पापड उद्योग, मसाला मिर्ची कांडप उद्योग, वडापाव विक्री केंद्र, भाजी विक्री केंद्र, ऑटोरिक्षा, चहा विक्री केंद्र, सॉफ्ट टॉईज विक्री केंद्र, डी. टी. पी. वर्क, स्विट मार्ट, ड्राय क्लिनिंग सेंटर, हॉटेल, टायपिंग इन्स्टीटयुट, ऑटो रिपेअरींग वर्कशॉप, मोबाईल रिपेअरिंग, गॅरेज, फ्रिज दुरुस्ती, ए. सी.दुरुस्ती, चिकन / मटन शॉप, इलेक्ट्रिकल शॉप, आईस्क्रिम पार्लर व इतर..

मासळी विक्री, भाजीपाला विक्री, फळ विक्री, किराणा दुकान, आठवडी बाजारामध्ये छोट दुकान, टेलिफोन बुथ किंवा अन्य तांत्रिक लघु उद्योग अशा लघु व्यवसायासाठी ही योजना सुरू करणे, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील निराधार, विधवा महिला इ. लाभार्थीना तात्काळ / प्राथम्याने लाभ देणे.

बीज भांडवल कर्ज योजनेच्या प्रमुख अटी आणि शर्ती :-

1) अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजे.
2) अर्जदार विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातीलच असावा.
3) अर्जदाराचे वय 18 ते 45 पर्यंत असावे.

4) अर्जदाराकडे कोणत्याही शासकीय, निमशासकीय अथवा वित्तीय संस्थेचे कर्ज बाकी असू नये.
5) राज्य महामंडळाच्या योजनांकरीता शहरी व ग्रामीण भागातील अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रु. 1,00,000/- व केंद्रीय
6) महामंडळाच्या योजनांकरीता शहरी भागाकरीता रु. 1,20,000/- व ग्रामीण भागाकरीता रु. 98,000/- पर्यंत असावे.

7) या योजनेअंतर्गत एकाच शासकीय उपक्रमांकडून लाभधारकाला कर्ज / अनुदान घेता येणार नाही.
8) महामंडळाने वेळोवेळी घालून दिलेल्या अटी अर्जदारास बंधनकारक राहतील.
9) कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला एकदाच कर्ज मिळेल.

10) अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल, त्या व्यवसायाचे त्याला ज्ञान किंवा अनुभव असावा.
11) कर्जाच्या अटी व शर्ती महामंडळ ठरवेल त्याप्रमाणे राहतील.

तपशिल प्रकल्प :-

मर्यादा रु. 5 लाख पर्यंत
लाभार्थींचा सहभाग 5%
महामंडळाच्या कर्जावर 6%
व्याज परतफेडीचा कालावधी 5 वर्षे
महामंडळाचा सहभाग 20%
बँकेचा सहभाग 75% 75%
रक्कमेवर बँकेचा दराने व्याज (साधारणतः : (12 ते 14%)

बीज भांडवल कर्ज योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :-

1) जातीचा दाखला ( Cast Certificate )
2) उत्पन्नाचा दाखला कुटुंबाचे वार्षीक उत्पन्न मर्यादा रु .१,००००० /
3) आधार कार्ड
4) CIBIL Credit Score Report (सिबील स्कोर 500 पेक्षा जास्त असावा )
5) PAN Card
6) DOMICLE CERTIFICATE
7) शिधापत्रिका (रेशन कार्ड)
8) दरपत्र ( GST चे कोटेशन अनिवार्य )
9) प्रकल्प अहवाल ( Project Report )
10) Bank Pass Book Xerox ( आधार लिंक )
11) व्यवसायाकरीता लागणारे ना हरकत प्रमाणपत्र (नगरपालीका, ग्रामपंचायत नगर पंचायत)
12) व्यवसाय स्थळाचा जागेचा पुरावा (टॅक्स पावती, भाडे पावती, 100 रु.पेपरवर करारनामा / संमतीपत्र )
13)शाळा सोडण्याचा दाखला (School Leaving Certificate)
14)तांत्रिक व्यवसायाकरीता प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्र शैक्षणिक पात्रतेचा दाखला
15) 2 पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज कसा कराल ?

  PDF फॉर्म :-  http://www.msobcfdc.org/download/obc/bij_bhandwal.pdf  हा PDF फॉर्म डाऊनलोड  करून भरून कागदपत्रांसह वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (मर्यादित) जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा. 

अर्ज केल्यानंतर कर्ज मंजुरीसाठी….  

अर्जदाराच्या राहत्या घराची तसेच व्यवसायाच्या जागेची पडताळणी केली जाते.

तद्नंतर प्राप्त कर्ज प्रकरणे मा.जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा लाभार्थी निवड समितीमार्फत प्रकरणांची छाननी करुन मान्यता प्रदान केली जाते.

जिल्हा लाभार्थी निवड समितीमध्ये मंजूर झालेली कर्ज प्रकरणे संबंधित जिल्हा कार्यालयामार्फत राष्ट्रीयीकृतबँकेकडे मंजूरीस्तव शिफारस करण्यात येतात.

राष्ट्रीयीकृत बँकांकडून अशा प्रकरणांना मंजूरी प्राप्त झाल्यानंतर अर्जदाराकडून महामंडळाचे बीज भांडवल कर्ज वितरणाच्या अनुषंगाने आवश्यक कागदपत्रे (जसे, वैद्यानिक दस्ताऐवज, जामीनदार, जामिनदाराचे वेतन कपात हमीपत्र-वेतन प्रमाणपत्र, मालमत्ता धारक जामिनदार असल्यास संपत्तीची नोंद असलेले दस्ताऐवज, जामिनदार पडताळणी अहवाल, जामिनदारांचे इलेक्शन कार्ड, विभागाने निर्गमित केलेले ओळखपत्र तसेच कर्ज वसुलीच्या अनुषंगाने अर्जदाराचे उत्तर दिनांकित धनादेश इत्यादी) पूर्तता करुन घेतली जाते.

अशा मंजूर कर्ज प्रकरणात कर्ज वितरणापूर्वी आवश्यक सर्व कागदपत्रांची/जामिनदारांची इत्यादी पूर्तता झाल्यानंतर संबंधित जिल्हा कार्यालयामार्फत कर्ज प्रस्ताव वितरणाच्या मंजूरीकरिता प्रादेशिक व्यवस्थापक यांचेकडे सादर केले जाते.

प्रादेशिक व्यवस्थापक यांचेकडून कर्ज वितरणाकरिता मंजूरी प्राप्त झालेनंतर संबंधित जिल्हा कार्यालयामार्फत कर्ज वितरणाच्या अनुषंगाने संबंधित राष्ट्रीयीकृत बँकेच्या नावे बीज भांडवल (कर्ज) व अनुदान अशा दोन रकमांचे दोन स्वतंत्र धनादेश काढणेत येवून बँकेकडे पाठविला जातो.

Leave A Reply

Your email address will not be published.