शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना सिंचन करताना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी शासन शेतकऱ्यांना सिंचन यंत्रे आणि सिंचन उपकरणांवर अनुदान देते. सरकार शेतकऱ्यांना सिंचन उपकरणे आणि संसाधनांवर 90 टक्के पर्यंत अनुदान देते. या अनुषंगाने राज्यातील शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात इनवेल बोअरिंगसाठी 20,000 हजार रुपये अनुदान देण्यात येत आहे.
या योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतात मोफत बोअरिंग करून त्यांना पिकांना सिंचनासाठी पुरेसे पाणी मिळावे यासाठी राज्य शासनातर्फे बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत देण्यात येत आहे. ही योजना राज्य सरकारने मुंबई, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्हे वगळता राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये लागू केली आहे. राज्यातील शेतकरी या योजनेअंतर्गत अर्ज करून कोणताही खर्च न करता मोफत बोअरिंगचा लाभ घेऊ शकतात..
या बाबींसाठी मिळतंय अनुदान..
नवीन विहिरीचे बांधकाम करणे :- 2.50 लाख रु.
जुन्या विहिरीची दुरुस्ती करणे :- 50 हजार रु.
शेततळ्यांचे प्लास्टीक अस्तरीकरण करणे :- 1 लाख रु.
इनवेल बोअरींग करणे :- 20 हजार रु.
पंप संच :- 20 हजार रु.
ठिबक सिंचन :- 50 हजार रु. अनुदान
तुषार सिंचन :- 25 हजार रु. अनुदान
पीव्हीसी पाईप :- 30 हजार रु. अनुदान
परसबाग :- 500 रु. अनुदान
शेतकऱ्यांना मोफत बोअरिंगसाठी 100% अनुदानाचा लाभ दिला जातो. अशा स्थितीत या योजनेंतर्गत शेतकऱ्याला आपल्या शेतात बोअर करण्यासाठी स्वत:च्या खिशातून एकही पैसा खर्च करावा लागणार नाही. त्याचा संपूर्ण पैसा सरकार देणार आहे. याशिवाय पंपसेटची व्यवस्था करण्यासाठी शेतकऱ्यांना कर्ज व अनुदानही दिले जाणार आहे. योजनेंतर्गत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाते.
बातमी : विहिरीसाठी – 2.50 लाख रु, शेततळ्यासाठी – 1 लाख रु. अनुदान, असा करा अर्ज..
शेतात मोफत इनव्हेल बोरिंगसाठी अर्ज कसा करावा ?
शेतात मोफत बोरिंग मिळवण्यासाठी तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागेल आणि त्यासोबत आवश्यक कागदपत्रे जमा करावी लागतील. अर्ज केल्यानंतर 15 दिवसांच्या आत तुम्हाला मोफत बोअरिंगसाठी मंजुरी दिली जाईल.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र शासनाची अधिकृत वेबसाइट mahadbt.maharashtra.gov.in ला भेट देऊन अर्ज करावा लागेल.
महा डीबीटी पोर्टलला भेट दिल्यानंतर, तुम्हाला ‘बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना’ व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना हे ऑप्शन दिसेल. त्याच्या शेजारी ‘बाबी निवडा’ वर क्लिक करा..
या नंतर तुमच्यासमोर अर्ज ओपन होईल त्यामध्ये तुम्ही, तालुका / गाव / गट नंबर / मुख्य घटक / घटक निवड मध्ये (नवीन विहिरीचे बांधकाम) ही माहिती भरल्यानंतर ‘जतन करा’ वर क्लिक करा.
यानंतर संपूर्ण अर्ज भरल्यानंतर तुम्हाला 23.60 रुपयांचे पेमेंट करावे लागणार आहे, (टीप : हा अर्ज तुम्ही सेतू / CSC सेंटरमार्फतही करू शकता)