सोन्यापेक्षा महाग असं हे लाकूड ; 1 लिटर तेलाचा दर तब्बल 80 हजार रु. कोणत्याही ऋतुत लागवड करा अन् व्हा करोडपती…

0

एखाद्या झाडाच्या लाकडाची किंमत सोन्यापेक्षा महाग आहे असं जर तुम्हाला सांगण्यात आलं तर तुमचा विश्वास बसेल का ? पण हे खरं आहे. जगात असं एक झाड आहे ज्याचे लाकूड सोन्यापेक्षा जास्त महागात विकलं जातं. सध्या तुम्ही एक किलो सोने सुमारे 43 लाख रुपयांना खरेदी करू शकता, परंतु या झाडाच्या 1 किलो लाकडासाठी तुम्हाला 73 लाख 50 हजार रुपये मोजावे लागतील…

हे सामान्य झाड नाही. त्याचे नाव आगरवुड (Agarwood) आहे. आगरवुड लाकडाला ‘Woods of the God’ असं म्हटलं जातं. यावरून त्याचे महत्त्व काय आहे याचा अंदाज येऊ शकतो. अगरवुडच्या खऱ्या लाकडाची किंमत 1 हजार डॉलर्स (सुमारे 79 हजार 681 रुपये) प्रति किलोग्राम आहे. हे झाड आग्नेय आशियातील पावसाच्या जंगलात आढळते. भारतामध्ये या झाडाची लागवड आसाम , नागालँड , मणीपुर , बंगाल, त्रिपुरा या राज्यांमध्ये केली जाते.

या शेती मधून एकरी करोडो रुपयांचे उत्पन्न मिळते हे समजल्यावर गेली आठ ते दहा वर्षे केरळ, तमिळनाडू, आंध्रप्रदेश , कर्नाटक , गुजरात , आणि राजस्थान मधे देखील अगरवुड ची लागवड चालू झाली आहे. महाराष्ट्रात देखील शेतकरी अत्यंत तुरळक प्रमाणात लागवड करत असून हे प्रमाण नक्कीच वाढणार आहे.

याच्या मुख्यतः 17 जाती व पोट जाती आहेत. यापैकी अगरवुड च्या Aquileria malaccensis आणि Aquileria khasiana या दोन जाती आपल्या भारतात टिकतात अगदी 45 डिग्री तापमान, अतिवृष्टी असलेल्या, तसेच थंड वातावरण असलेल्या भागात देखील अगरवुड चांगले येते.

मध्य पूर्व देशांमध्ये आदरातिथ्य करण्यासाठी अगरवूडचा केला जातो वापर :-

झाडाच्या आत आगरवूड तयार झाल्यावर झाड तोडले जाते. यानंतर, त्याचा भाग वेगळा केला जातो आणि गडद रंगाचा विशेष भाग काढून टाकला जातो. ही प्रक्रिया व्यक्तिचलितपणे केली जाते आणि यास अनेक तास लागतात. त्याचा थोडासा भाग धूप म्हणून वापरला जातो. मध्यपूर्वेतील देशांमध्ये, आदरातिथ्य करण्यासाठी लहान भाग जाळले जातात आणि कपड्यांवर परफ्यूम म्हणून वापरले जातात…

अगरवूड बनवलेल्या तेलाला लिक्विक गोल्ड असं म्हणतात…

अगरवूडची लागवड करणारे म्हणतात की, त्याच्या अगरबत्तीच्या सुगंधाची बरोबरी जगात कोणीही देऊ शकत नाही. ते सांगतात की, झाडाचे छोटासा पीस जाळल्यानंतर हळूहळू त्याचा सुगंध गोड होतो. त्याचा थोडासा धूर बंद खोलीला किमान चार-पाच तास सुगंधित ठेवू शकतो. तेल देखील ओड चिप्सपासून बनवले जाते, ज्याची किंमत प्रति लिटर 80 हजार पर्यंत आहे.

त्याच्या किमतीमुळे व्यापारी त्याला लिक्विड गोल्ड म्हणतात. आता पाश्चात्य देशांमध्येही त्याची लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे. आता मोठ-मोठे ब्रँड त्यापासून बनवलेले सुगंध आणि परफ्यूम विकत आहेत, ज्याची किंमत खूप आहे.

या झाडाला का आहे एवढी मागणी :-

अगरवुड हे झाड आपल्याला ऐकून नवीन असले तरी त्याचा उपयोग आपण हजारो वर्षांपासून करत आलो आहोत.अगरबत्ती ,उदबत्ती हे नाव अगर या वृक्षा पासून पडलं आहे.

अगरवुड पासुनच उद, धूप तयार केले जातात देवपूजेत व धार्मिक कार्यक्रमात उद, धूप, व अगरबत्ती अथवा उदबत्ती या अविभाज्य घटक असतात. त्यामुळे अगरवुड ही रोजच्या वापरातील वनस्पती आहे.

अगरवुड च्या वनस्पती चे तीन भाग उपयोगात आणले जातात . 1) पाने 2) वरचे लाकूड 3) आतला गाभा.

1)अगरवुड च्या पानांपासून प्रचंड औषधी असलेला ग्रीन टी , ग्रीन कॉफी , फुडसप्लीमेंट , टॉनिक , उत्साह वर्धक औषधे तयार केली जातात.

2) अगरवुड च्या आतल्या गाभ्या पासून अत्यंत महागडी सुगंधी तेले, अत्तरे, सेंट, परफ्युम, कॉस्मेटिक तयार केली जातात.

3) अगरवुड च्या वरील लाकडा पासून सुगंधी, औषधी तेले, उद, धूप, वाईन, औषधे अशी 12 प्रकारची उत्पादने घेतली जातात.

अगरवुड च्या सर्वच उत्पादनांना फार मोठ्या प्रमाणात मागणी आहे. अरबकंट्री, युरोपियन देश, अमेरिकन देशात तसेच जगातील इतर 112 देशात ही उत्पादने वापरली जातात.

अगरवुड ची पाने, लाकूड, तसेच आतला गाभा या पासुन कँन्सर, एड्स, अल्झायमर, मेंदु विकार, ह्रदय विकार, मधुमेह, संधीवात, अशा अनेक प्रकारच्या व्याधींवर औषधे तयार केली जातात.

भारतातील 9100 पेक्षा जास्त कंपन्या अगरवुड पासून 500 पेक्षा जास्त उत्पादने तयार करतात. या कंपन्या बाहेरील देशातून अगरवुड आयात करतात. त्यांना आपल्याच देशात अगरवुड ची पाने, लाकुड व गाभा मिळु लागल्यावर त्यांचा, आपला व परकीय चलन वाचल्याने देशाचा सर्वांचा फायदा होईल.

तुम्हीसुद्धा अगरवुड रोपांची लागवड करू इच्छित असाल तर तुम्हाला या व्हेबसाइट्वरुन फक्त ३९ रुपयांत एक रोप मिळेल. तुम्ही या झाडांची लागवड १ एकर शेतात करू शकता किंवा शेताच्या बांधावर लागवड करून करोडपती होऊ शकता…

रोपे खरेदी करण्यासाठी इथे क्लिक करा. https://dir.indiamart.com/impcat/agar-plant.html

Leave A Reply

Your email address will not be published.