BREAKING : राज्यासाठी पुन्हा एक वाईट बातमी ! वेदान्त-फॉक्सकॉन’नंतर आता ‘या’ दिग्गज कंपनीनेही गाशा गुंडाळला, पहा डिटेल्स…
पुण्यातील तळेगावात होणारा वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्प तर रायगडातील बल्क ड्रग पार्कने महाराष्टातून काढता पाय घेतल्याने आता पुन्हा एक मोठा झटका महाराष्ट्राला बसला आहे. ऑनलाइन पेमेंटसाठी प्रसिद्ध असलेल्या फोनपे (PhonePe) कंपनी व्यवस्थापनाने कंपनीचे मुख्य कार्यालय मुंबईहून कर्नाटकात हलवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने आपले मुंबई कार्यालय कर्नाटकात हलवण्याबाबत जाहिरातही प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे पुन्हा एवढी मोठी कंपनी राज्याबाहेर गेल्याने राजकारण तापलं आहे.
कंपनीने आपले नोंदणीकृत कार्यालय महाराष्ट्रातून कर्नाटकात स्थलांतरित करण्यासाठी कंपनी कायदा, 2013 च्या कलम 13 अन्वये या संदर्भात केंद्र सरकारकडे अर्ज केला आहे. 16 ऑगस्ट 2022 रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत कंपनीच्या मेमोरँडम ऑफ असोसिएशनमधील दुरुस्तीला मान्यता देण्यासाठी विशेष ठराव मंजूर करण्यात आला होता.
कंपनीचे कार्यालय कर्नाटक राज्यात स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतल्याचे कंपनीच्या सर्वसाधारण सभेत नमूद करण्यात आले आहे. वेदांत ग्रुप आणि फॉक्सकॉन ग्रुपचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये हलवण्यात आल्याने अजून त्याच वादावर राज्यात राजकारण तापलं असल्याने अजून तर हा वाद निवळालाही नाही तर आता PhonePe सारख्या ऑनलाइन पेमेंटसह मोठ्या कंपनीचे कार्यालय कर्नाटक मध्ये गेल्याने मुंबईसह महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे
यानंतर वातावरण चांगलंच तापलं असून राष्ट्रवादीचे आ. रोहित पवार यांनी वृत्तपत्रामध्ये छापलेल्या एका नोटीसच्या आधारे ‘वेदान्त-फॉक्सकॉन’नंतर PhonePe’ ही ऑनलाइन व्यवहारांसंदर्भातील कंपनीही महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये गेल्याची पोस्ट केली आहे.
या पोस्टमध्ये रोहित यांनी राज्यामध्ये सत्तेत असणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारलाही लक्ष्य केलं आहे.