Take a fresh look at your lifestyle.

Ahmednagar Job 2022 : अहमदनगर महापालिकेत नोकरीची सुवर्णसंधी ; ‘या’ 36 पदांसाठी होणार भरती, पगार 60,000 रु. पहा, डिटेल्स

AMC Recruitment 2022 :- महाराष्ट्र राज्यातील आणि अहमदनगर जिल्ह्यातील सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक चांगली संधी चालून आली आहे. अहमदनगर महानगरपालिकेकडून (AMC Recruitment 2022) 36 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 ऑगस्ट 2022 आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार cच्या अधिकृत वेबसाइट amc.gov.in वर जाऊन अधिक माहिती जाणून घेऊ शकता…

व्हॅकन्सी डिटेल्स :-

या भरती प्रक्रियेद्वारे विविध पदांसाठी 36 पदे भरण्यात येणार आहेत. ज्या पदांवर भरती करण्यात आली आहे त्यात वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी या पदांचा समावेश आहे. इच्छुक उमेदवार फक्त ऑफलाईन अर्ज करू शकतात. याशिवाय कोणत्याही प्रकारे केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत…

जागा :-

वैद्यकीय अधिकारी :- 12 :- शिक्षण : (MBBS उत्तीर्ण) :- दरमहा पगार – 60,000 रुपये
बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (पुरुष) .:- 12 : शिक्षण (12 वी विज्ञान शाखा उत्तीर्ण) : दरमहा पगार – 18,000 रुपये
स्टाफ नर्स महिला :- 11 शिक्षण : GNM नर्सिंग : दरमहा पगार – 20,000 रुपये
स्टाफ नर्स पुरुष :- 1 शिक्षण : GNM नर्सिंग : दरमहा पगार – 20,000 रुपये

कागदपत्रे :-

खालील प्रमाणे आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित केलेल्या छायांकित प्रती अर्जासोबत जोडाव्यात .

1) शैक्षणिक अर्हते बाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र
2) जातीचे प्रमाणपत्र
3) शाळा सोडल्याचा / जन्मतारखेचा दाखला
4) प्रमाणित केलेले केवळ शासकीय अनुभव प्रमाणपत्रे
5) पासपोर्ट आकाराचा फोटो
6) महाराष्ट्र कौन्सिलचे वैध रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र
7) लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र

नोकरी ठिकाण : अहमदनगर.

अर्ज कुठे अन् कसा कराल ?

राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद अहमदनगर, (National Health Mission Cell, Health Department, Zilla Parishad Ahmednagar) :- फोन नंबर – 02412329542 या ठिकाणी अर्ज करावा…

अधिक परिपूर्ण माहितीसाठी तसेच अटी शर्ती जाहिरात पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा