Take a fresh look at your lifestyle.

शेतातल्या मोटारीला ऑटोस्विच असेल तर थेट कारवाई होणार ! फक्त 500 रुपयाचा हा उपाय करा अन् वीजबिलातही 30% सूट मिळवा..

कृषी पंप चालू करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपापल्या मोटर घरामध्ये ऑटो स्विच बसवले असल्याने वीज पुरवठा सुरू झाल्यानंतर सर्वच कृषी पंप तत्काळ सुरू होत आहेत. त्यामुळे परिसरातील सर्व कृषी पंप एकाच वेळी सुरू होऊन डीपी वरील लोड अचानक वाढत असल्यान परिणामी डीपी जळणे, नादुरुस्त होणे, 11 केव्ही किंवा लो टेंशन लाईन्सच्या तारा तुटणे या प्रमाणात वाढ होत आहे. यातून होणारी गैरसोय व नुकसान टाळावे तसेच सुरक्षित व योग्य दाबाचा वीज पुरवठा मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी कृषी पंपांना ऑटो स्विच ऐवजी कॅपॅसिटर बसवून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

प्रत्येक कृषी पंपांना क्षमतेनुसार कॅपॅसिटर बसवावे त्यामुळे डीपी जळणे व नादुरुस्त होण्याचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी एक सोपा उपाय आहे. कॅपॅसिटर मुळे कमी दाबाचा वीज पुरवठा, डीपी न जळण्याचे शिवाय नादुरुस्त होण्याचे प्रमाण कमी होते. दुरुस्ती कालावधी मधील खंडित वीजपुरवठा या समस्या सुटण्यास मदत होणार आहे.

कृषी पंपांना कॅपॅसिटर बसवणे बंधनकारक आहे. सर्व विभागीय अधिकाऱ्यांना याविषयी जनजागृती करण्यासंदर्भात महावितरण कडून सूचना देण्यात आलेल्या असून ऑटो स्विचचा वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असून त्यासाठी आता एक विशेष टीम नेमण्यात आली आहे.

बहुतांश कृषी पंपांना कॅपॅसिटर बसवलेले नाहीत. बसवलेल्या पैकी काहींचे बंद तर काहींनी थेट जोडणी केली असल्याने ज्यांनी कॅपॅसिटर बसवले नाहीत त्यांनी ते बसवून घ्यावेत आणि कॅपॅसिटर बंद किंवा थेट जोडणे असल्यास ते दुरुस्त करून घ्यावत असे आवाहनही महावितरण तर्फे करण्यात आले आहे.

पंप जळण्याला बसतोय आळा..

वीज पंपाला कॅपॅसिटर बसवल्याने पंप जळण्याचे प्रकार थांबतात. सोबतच डीपी नादुरुस्तीचे प्रमाणही कमी होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होत नाही. कॅपॅसिटरच्या नोंदणीकृत भारापेक्षा अधिक विद्युत भाराचा वापर होतो. डीपीच्या क्षमतेपेक्षा अधिक वीज वापरली गेल्यास डीपी नादुरुस्तीचे प्रमाण वाढते. नादुरुस्त होणाऱ्या डीपीच्या दुरुस्तीचा खर्च वाहतूक आणि मजूरीचा खर्च शिवाय डीपी दुरुस्ती प्रक्रियेत अनेक दिवस वाया जातात. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी अडचणी निर्माण होऊन त्यात शेतकऱ्यांचे नुकसान होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी पंपांना कॅपॅसिटर बसवणे काळाची गरज असल्याचे महावितरणन सांगितले आहे.

शेतकऱ्यांनो कॅपॅसिटर बसवण्याआधी हा व्हिडीओ नक्की पहा, लिंक – Capacitor For Agri..

वीजबिलात होते 30 टक्के कपात..

कृषी क्षेत्रातील कार्यक्षम ऊर्जा वापरात कॅपॅसिटर हे उपकरण महत्त्वाचे आहे. कृषी पंपांना कॅपॅसिटर बसवल्यामुळे विद्युत केबल जळण्याचे प्रमाण कमी होते. कॅपेसिटर स्थापित केल्याने विद्युत पंपाचा बर्न रेट कमी होतो, ज्यामुळे भार 30 टक्के कमी होतो. योग्य विद्युत दाब केवीए मागणी वीज प्रमाणात बचत हे फायदे होतात. कृषी पंपांच्या क्षमतेनुसार कपॅसिटर बसवणे गरजेचे असल्याचेही महावितरण स्पष्ट केले आहे..