Take a fresh look at your lifestyle.

US ने 400 Chinook Helicopter वापरणं केलं बंद ; कारण काय ? भारताकडे किती आहेत C – Helicopter, लष्करासाठी का आहे इतकं खास, पहा…

शेतीशिवार टीम : 1 सप्टेंबर 2022 : अमेरिकेने आता आपल्या 400 चिनूक हेलिकॉप्टरचा (Chinook Helicopters) ताफा बंद केला आहे. चिनूक्सचे इंजिन बनवणारी कंपनी हनीवेलने तांत्रिक कारणामुळे हा निर्णय घेतल्याचे सांगितले. चिनूक हेलिकॉप्टरच्या इंजिनला आग लागल्याच्या घटना घडल्या होत्या. ओ रिंग्जमधील (O Rings) तांत्रिक त्रुटींमुळे हे घडत होतं. ओ रिंग्सचा वापर लिक्विड आणि गॅसपासून होणारी गळती रोखण्यासाठी केला जातो. तांत्रिक बिघाडामुळे गळती थांबत नव्हती…

यूएस आर्मीच्या प्रवक्त्या सिंथिया स्मिथ (Cynthia Smith) यांनी सांगितलं की, अधिकाऱ्यांनी काही हेलिकॉप्टरच्या इंजिनला आग लागल्याच्या चुका ओळखल्या. विमानातील तांत्रिक त्रुटी दूर करण्यात आल्या आहेत. सध्या सावधगिरी म्हणून अमेरिकन सैन्याने 400 चिनूक हेलिकॉप्टर वापरणे बंद केलं आहे.

चिनूक हेलिकॉप्टरचा वापर भारतात मोठ्या प्रमाणावर केला जातो. भारताकडे अनेक चिनूक हेलिकॉप्टर आहेत जे संकटाच्या परिस्थितीत सैन्यासाठी उपयुक्त ठरतात. भारतीय हवाई दलाने आपल्या प्रॉडक्शन कंपनी बोईंगला (Boeing Aerospace company) विचारलं आहे की, अमेरिकेने त्याचा वापर का बंद केला आहे, तर आता पुढें काय ?

भारतीय हवाई दलाकडे किती आहेत Chinook Helicopters ?

भारतीय हवाई दलाकडे (IAF) 15 बोईंग निर्मित चिनूक हेलिकॉप्टर आहेत. चिनूक हेलिकॉप्टरबाबत देशाने मार्च 2019 मध्ये अमेरिकेसोबत करार केला होता. परंतु, अमेरिकेने त्यांच्या विमानांचा ताफा वापरण्यास बंदी केली आहे, असा प्रश्न भारतीय लष्कराने बोइंगला विचारला आहे. अधिका-यांनी सांगितले की, भारताने इंजिनला आग लागल्याचा संशय असलेल्या कारणांचा तपशील मागवला आहे. अमेरिकेने या कारणास्तव चिनूक CH-47 हेलिकॉप्टरचा संपूर्ण ताफा थांबवला आहे.

भारताचा चिनूक ताफा देशाच्या उत्तर आणि उत्तर- पूर्व भागात तैनात आहे. चंदीगड आणि आसामच्या हवाई तळांवर तैनात असलेले हे हेलिकॉप्टर देशातील दुर्गम ऑपरेशन्समध्ये वापरले जाते.

चिनूक हेलिकॉप्टरने लडाख आणि सियाचीनमध्ये केलेल्या अनेक कठीण बचाव कार्यात लष्कराचा मार्ग सुकर केला आहे.

किती पॉवरफुल आहे Chinook Helicopters ?

चिनूक्समध्ये टँडम रोटर नावाची सिस्टीम असते. यात दोन रोटर आहेत ज्याद्वारे जड वजन उचललं जाऊ शकतं. ओरेगॉन आणि वॉशिंग्टन येथील मूळ अमेरिकन लोकांच्या नावावरून हे नाव देण्यात आले आहे. हे 1960 च्या दशकाच्या सुरुवातीस यूएस आर्मीमध्ये दाखल झालं आहे.

चिनूक जड भार उचलण्यास सक्षम आहे. हे एक कार्गो स्पेशलाइज्ड हेलिकॉप्टर आहे. त्याला अनेक दरवाजे आहेत. चिनूकमध्ये तीन बाह्य वेंट्रल कार्गो हुक आहेत, ज्यामुळे जड भार उचलणे सोपं होतं. त्याचा टॉप स्पीड 310 Km /h आहे. हे जगातील सर्वात वेगवान हेलिकॉप्टरपैकी एक आहे.

प्रत्येक कठीण ऑपरेशन पार पाडण्यास सक्षम :-

लॉकहीड C-130 हर्क्युलस व्यतिरिक्त, हे 1960 मध्ये डिझाइन केलेलं एकमेव मालवाहू विमान आहे जे मोठ्या प्रमाणावर वापरलं गेलं. हेलिकॉप्टरची सिव्हिल व्हर्जन प्रवासी सेवांसाठी देखील वापरलं जातं. याद्वारे, ते वाहतूक आणि अग्निशमन ऑपरेशनमध्ये देखील वापरलं जातं.

त्याच्या प्रचंड भार वाहून नेण्याच्या क्षमतेमुळे, राष्ट्रीय आपत्तीच्या वेळी बचाव आणि मदत कार्यात देखील ते खूप प्रभावी ठरत आहे. नागरी उड्डाणासाठी देखील याचा वापर केला जातो. अमेरिका, ब्रिटन, इटली, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, भारत आणि इतर अनेक देशांचे सैन्य हे विमान वापरतात.