Take a fresh look at your lifestyle.

IAS I – Q : भारतात 3 राजधान्या असलेलं पाहिलं राज्य कोणतं ? अन् त्या 3 राजधान्यांची नावे सांगा ?

UPSC / MPSC परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षा आहे. जे उत्तीर्ण होण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. आणि जो या परीक्षेत उत्तीर्ण होतो तो देशाचा (IAS) अधिकारी होतो. या परीक्षेचे एकूण तीन टप्पे आहेत. ज्यामध्ये लेखी बरोबर इंटरव्हिव्ह हि घेतला जातो. प्रत्येकजण लेखी परीक्षा पास तर होतो पण इंटरव्हिव्ह मध्ये अडकतात.

खरं तर असे अनेक प्रश्न या UPSC / MPSC इंटरव्यू दरम्यान विचारले जातात. ज्याची उत्तरे प्रत्येकाच्या डोक्यात बसत नाहीत. हे प्रश्न खूप गुंतागुंतीचे आणि गुंफलेले असतात. भल्याभल्यांचं मन हेलावतं. तर आज आम्ही या पोस्टमध्ये तुमच्यासाठी असेच काही प्रश्न घेऊन आलो आहोत जे तुम्हाला इंटरव्हिव्ह मध्ये अन् परीक्षेमध्ये खूप मदत करू शकतात.

प्रश्न : देशातलं पाहिलं वृत्तपत्र कधी व कोणतं प्रकाशित झालं ?
उत्तर : देशातील पहिले वृत्तपत्र 29 जानेवारी 1780 रोजी प्रकाशित झालं. हे बंगाल गॅझेटियर (Bengal Gazetteer) म्हणून ओळखले जात असे.

प्रश्न : सर्च (Search) आणि रिसर्च (Research) मध्ये नेमका काय आहे फरक ?
उत्तर : सर्च म्हणजे तुम्ही आधीपासून अस्तित्वात असलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधणे होय.
तर रिसर्च म्हणजे नवीन विषयावर शोध घेणे किंवा निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी नवीन माहिती गोळा करणे.

प्रश्न : विमानाचे टायर आणि इलेक्ट्रिक बल्बमध्ये कोणता वायू भरला जातो ?
उत्तर : विमानाच्या टायरमध्ये नायट्रोजन (Nitrogen) आणि इलेक्ट्रिक बल्बमध्ये आर्गन गॅस (Argon gas)

प्रश्न : Google एका सेकंदात किती पैसे कमावतो ?
उत्तर : गुगलचे जुने नाव “बेकरब” होतं. 1996 पासून ते Google म्हणून ओळखलं जाऊ लागलं. Google हे जगातील सर्वात मोठं आणि जगातील प्रथम क्रमांकाचं सर्च इंजिन आहे, जगातील सर्वात मोठ्या सर्च इंजिनच्या एका सेकंदाची कमाई सुमारे $807 आहे, जी भारतीय रुपयांनुसार सुमारे 59 हजार 607 रुपये आहे. आणि Google ची प्रति मिनिट कमाई सुमारे 35 लाख 76 हजार 420 रुपये आहे.

प्रश्न : UPSC ची स्थापना कधी झाली? आणि त्याचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर : UPSC ची स्थापना 1 ऑक्टोबर 1926 रोजी झाली. याचं मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. आणि प्रदीपकुमार जोशी (Pradeep Kumar Joshi) हे त्याचे विद्यमान अध्यक्ष आहेत.

प्रश्न : असा कोणतं देश आहे, त्याच्या 3 राजधान्या आहेत ?
उत्तर : दक्षिण आफ्रिका असा एक देश आहे त्याच्या एक नाही तर तीन राजधान्या आहे. प्रिटोरिया (Pretoria) , ब्लोमफॉन्टेन (Bloemfontein) आणि केप टाउन (Cape Town) या त्याच्या राजधानी आहेत.

प्रश्न : अवघ्या दहा दिवसांत कोणत्या देशाचे पाच वेगवेगळे राष्ट्रपती झाले ?
उत्तर : “अर्जेंटिना” (Argentina) हा असा देश आहे, जिथे 2001 मध्ये, दहा दिवसांत, पाच वेगवेगळ्या राष्ट्राध्यक्षांची निवड झाली होती.

प्रश्न : मानवी शरीरात रक्त किती असतं ?
उत्तर : निरोगी माणसाच्या शरीराच्या वजनापैकी सुमारे 7% रक्त असतं. त्याचप्रमाणे ज्या निरोगी व्यक्तीचे वजन 70-80 किलो असतं, त्याच्या शरीरात सुमारे 5 ते 5.5 लिटर रक्त असतं.

प्रश्न : भारतातील कोणत्या राज्यात प्रथम राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली ?
उत्तर : भारतात 1951 मध्ये पहिल्यांदा ‘पंजाब’ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली.काँग्रेसमधील फुटीमुळे येथे 20 जून 1951 ते 17 एप्रिल 1952 दरम्यान राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली.

प्रश्न : भारत देशात 3 राजधान्या असलेलं पाहिलं राज्य कोणतं ?
उत्तर : 3 राजधानी असलेलं आंध्र प्रदेश हे देशातील पहिले राज्य ठरलं आहे. आंध्र प्रदेश 3-राजधानी विधेयकाला मंजुरी दिली. आंध्रमध्ये आता अमरावती, विशाखापट्टणम आणि कुर्नूल या तीन राजधान्या असणार आहे.