Take a fresh look at your lifestyle.

Indian Navy Agniveer Recruitment 2022 : 10 वी पास विद्यार्थीही आता होणार नेव्ही ऑफिसर ; पहा, पात्रता, पगार, व्हॅकन्सी डिटेल्स…

शेतीशिवार टीम : 25 जुलै 2022 :- भारतीय नौदलाने (Indian Navy Agniveer Recruitment) डिसेंबर 2022 च्या बॅचसाठी अग्निवीर मॅट्रिक रिक्रूट (MR) पदांसाठी एकूण 200 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत, ज्यामध्ये 40 जागा महिलांसाठी आहेत. या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जुलै 2022 आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट- joinindiannavy.gov.in द्वारे अर्ज करू शकतात…

पोस्ट, वॅकन्सी, पगार किती असेल ?

पोस्ट अग्निवीर (सेलर मैट्रिक रिक्रूट (MR)- डिसेंबर 2022 बॅच
वॅकन्सी 200 (40 महिला सहित)
 पगार 30,000 रुपये प्रति महीना
वय श्रेणी  1 दिसंबर 1999 से 31 मई 2000 के बीच जन्म

 

अधिकृत अधिसूचनेनुसार, अग्निवीर एमआर (MR) पदासाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवाराने भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाद्वारे मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळातून 10वी (मॅट्रिक) परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.

कोण करू शकतो अर्ज ?

इच्छुक उमेदवार 25 जुलै ते 30 जुलै या कालावधीत joinindiannavy.gov.in या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करू शकतात.

ऑनलाइन अर्ज भरताना उमेदवारांनी स्वतःशी संबंधित सर्व डिटेल्स अचूकपणे भरण्याचा सल्ला दिला आहे. अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेपूर्वी उमेदवाराकडून कोणतीही सुधारणा / दुरुस्ती केली जाऊ शकते.

अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेनंतर कोणतीही दुरुस्ती करण्याची परवानगी दिली जाणार नाही. कोणतीही माहिती चुकीची आढळल्यास, त्याची उमेदवारी रद्द केली जाईल अशी वार्निंग देण्यात आली आहे.

याशिवाय, उमेदवार कॉमन सर्व्हिस सेंटर्स (CSC) वरून 60+ रुपये शुल्क भरून देखील अर्ज भरू शकतात…

भारतीय नौदलातील अग्निवीर (MR) भरतीसाठी महत्त्वाच्या तारखा :-

ऑनलाइन फॉर्म सबमिशन तारीख : 25 जुलै 2022

ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख : जुलै 30, 2022

लेखी परीक्षेची तारीख : नोव्हेंबर 2022

हे लक्षात घेण्यासारखे आहे की, उमेदवारांची निवड शॉर्टलिस्टिंग, लेखी परीक्षा, पात्रता, शारीरिक फिटनेस चाचणी (PFT) आणि मेडिकल टेस्टच्या आधारे केली जाणार आहे.