Take a fresh look at your lifestyle.

KBC 14 : एक हजारापासून ते 75 लाखांपर्यंत विचालेले ‘हे’ 15 सोपे प्रश्न ; पहा, तुम्हाला किती उत्तरे येतात, चेक करा तुमची GK लेव्हल

शेतीशिवार टीम : 04 सप्टेंबर 2022 :- टीव्हीचा सर्वात लोकप्रिय गेम शो ‘कौन बनेगा करोडपती 14’ दिवसेंदिवस रंजक होत आहे. रोज नवे स्पर्धक आणि नवनवे प्रश्न प्रेक्षकांना आकर्षित करत आहेत. या शोचे सूत्रसंचालन करणाऱ्या अमिताभ बच्चन यांची चर्चा सर्वांनाच आवडत आहे.

गुरुवारच्या लेटेस्ट एपिसोडची सुरुवात रोलओव्हर स्पर्धक कोमल गुप्ता पासून सुरू झाली. ती वेटलिफ्टर आहे आणि स्टेट-नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये सहभागी झाली आहे. तिचे सामान्य ज्ञान (General Knowledge) ही खूप चांगलं आहे. या शोमधून तिने 50 लाखांचं बक्षीस जिंकलं. 75 लाखांच्या प्रश्नावर ती गोंधळली अन् तिला आणि शो सोडावा लागला. KBC च्या लेटेस्ट एपिसोडचे एक हजार ते 75 लाखांपर्यंतचे 15 प्रश्न जाणून घ्या आणि तुम्ही तुम्हीही करोडपती झाला असता का ? तपास तुमची GK लेव्हल….

1 हजारांचा प्रश्न – यापैकी अशी कोणती क्रिया आहे जी ‘बत्तीसी दिखाना’ या हिंदी वाक्प्रचाराशी संबंधित आहे ?
पर्याय :-
A. लिहिणे
B. धावणे
C. हसणे
D. झोपणे

बरोबर उत्तर : C. हसणे

3 हजारांचा प्रश्न – साइन, कोसाइन आणि टॅजेन्ट यापैकी कोणत्या क्षेत्रात प्रामुख्याने वापरली जातात ?
पर्याय :-
A. जीवशास्त्र
B. त्रिकोणमिती
C. पुरातत्व
D. सेंद्रिय रसायनशास्त्र

बरोबर उत्तर – B. त्रिकोणमिती

5 हजारांचा प्रश्न – बेंच प्रेस व्यायामामध्ये शरीराच्या कोणत्या अवयवांचा व्यायाम इतरांपेक्षा जास्त केला जातो ?
पर्याय :-
A. मांडी
B. पोटरी
C. छाती
D. पोट

बरोबर उत्तर – C. छाती

10 हजारांचा प्रश्न – यापैकी कोण ‘क्राइम पेट्रोल’ शोचे नियमित होस्ट आहे ?
पर्याय :-
A. अनूप सोनी
B. पंकज त्रिपाठी
C. अनु कपूर
D. राम कपूर

बरोबर उत्तर : A. अनूप सोनी

20 हजारांचा प्रश्न – कशाचे सेवन केल्याने भगवान शिव चा कंठ निळा झाला आणि त्यांना नीळकंठ हे नाव पडले ?
पर्याय :-
A. फळे
B. अमृत
C. विष
D. मध

बरोबर उत्तर – C. विष

40 हजारांचा प्रश्न – यापैकी कोणती अभिनेत्री कान फिल्म फेस्टिव्हलच्या ज्युरीची सदस्य आहे ?
पर्याय :-
A. आलिया भट्ट
B. दीपिका पदुकोण
C. श्रद्धा कपूर
D. अनुष्का शर्मा

बरोबर उत्तर : D. दीपिका पदुकोण.

80 हजारांचा प्रश्न – छत्तीसगड राज्य हे भारतातील सर्वात मोठे….उत्पादकां पैकी एक आहे ?
पर्याय :-
A. ऊस
B. चंदन
C. गहू
D. कोळसा

बरोबर उत्तर : कोळसा

1 लाख 60 हजारांचा प्रश्न – 2022 मध्ये यापैकी कोणत्या खेळाडूला राज्यसभेसाठी नामांकन मिळालं आहे ?
पर्याय :-
A. मेरी कोम
B. पीटी उषा
C. अभिनव बिंद्रा
D. धनराज पिल्लई

बरोबर उत्तर – B. पीटी उषा

3 लाख 20 हजारांचा प्रश्न – भारतातील कोणत्या राज्याच्या राजधानीचे नाव ‘अतरौली’ शहरासोबत जोडल्याने हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत घराण्याचे नाव येते ?
पर्याय :-
A. भोपाळ
B. चंदीगड
C. जयपूर
D. पाटणा

बरोबर उत्तर – C. जयपूर

6 लाख 40 हजारांचा प्रश्न – भारतीय सशस्त्र दल वापरत असलेली ‘रेवती’ आणि ‘आश्लेषा’ यापैकी कोणाची नावे आहेत ?
पर्याय :-
A. रडार
B. टॉर्पेडो
C. पाणबुडी
D. विमानवाहू जहाज

बरोबर उत्तर : रडार

12 लाख 50 हजारांचा प्रश्न – खालीलपैकी ‘फिअरलेस गव्हर्नन्स’ नावाचे पुस्तक कोणी लिहिले ?
पर्याय :-
A. निर्मला सीतारामन
B. स्मृती इराणी
C. किरण बेदी
D. शीला दीक्षित

बरोबर उत्तर : C. किरण बेदी

25 लाखांचा प्रश्न –कोणत्या’ संघर्षात सहभागी झालेल्या लोकांना ‘समर सेवा स्टार’ मिळण्याचा हक्क आहे ?
पर्याय :-
A. 1947 काश्मीर युद्ध
B. 1999 कारगिल युद्ध
C. 1962 चीन-भारत युद्ध
D. 1965 भारत-पाकिस्तान युद्ध

बरोबर उत्तर – D. 1965 चे भारत-पाकिस्तान युद्ध

50 लाखांचा प्रश्न – श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी ओडिशात आमदार म्हणून यापैकी कोणते मंत्रीपद भूषवलं होतं ?
पर्याय :-
A. वाणिज्य आणि परिवहन
B. घर
C. महिला आणि बाल विकास
D. वित्त

बरोबर उत्तर : A. वाणिज्य आणि परिवहन

75 लाखांचा प्रश्न – 1973 मध्ये अराबेला आणि अनीटा नावाचे दोन प्राणी अंतराळात काय करणारे पहिले प्राणी बनले ?
पर्याय :-
A. घरटे बांधणे
B. जाळी विणणे
C. पंखांनी उडणारे
D. जन्म देणारे

बरोबर उत्तर – B. जाळे विणणे